सदस्य प्रवेश |
जायके का सफर-औरंगाबादआता आम्हा सगळ्या औरंगाबादकरांचा लाडका म्हणजे भोलेशंकर चाटवाला. खरंतर सहजासहजी सापडेल किंवा पोचता येईल अश्या ठिकाणी अजिबात नाहीये पण याच्याकडच्या पदार्थांची चव एकदा एखाद्यानी घेतली तर सहजा सहजी दुसरीकडे भेळ,दहिपुरी इत्यादी पदार्थ खायला जाणार नाही याची फुल्ल ग्यारंटी . याच्याकडची भेळ म्हणजे आहाहा....... गेली कित्येक वर्ष फक्त थाळीच देऊनही अजून तेवढ्याच जोरात चालणारं माझं अतिशय आवडतं ठिकाण म्हणजे bus-stand जवळचं भोज राजस्थानी भोजनालय. ४०ते५० रुपयात अमर्यादित थाळी. सुरवातीला जलजीरा, २सुक्या भाज्या, २ रस्सा भाज्या, डाळ, कढी, १ स्नॅक (बटाटावडा, समोसा किंवा ढोकळा) याच्याबरोबर चटणी, ठेचा, पापड, सॅलड, गरमा गरम आणि मऊ असे तुप लावलेले फुलके, बाजरीची छोटीशी रोटली (भाकरी) यावरही तुप. यातल्या सगळ्या भाज्या छान असतात पण मला खास आवडते ती इथली कढी. फारच चविष्ठ असते अगदी पुन्हा पुन्हा घेऊन सुद्धा समाधान होत नाही. आणि शेवटी भात / खिचडी तुम्ही दोन्हीही टेस्ट करु शकता. मस्त घोटून केलेली सरसरीत खिचडी आणि वर पुन्हा तूप. इथलं वैशीष्ठ म्हणजे सगळा स्टाफ राजस्थानी वेशभुषेत असतो. आणि लांब लांब मिशा असलेला मॅनेजर (मालक?) स्वत: पुन्हा पुन्हा येउन घरच्यासारखा आग्रह करत असतो. रेल्वेस्टेशनरोडला असणारं फुड लव्हर्स आणि जालनारोडला असलेलं मास्टर्स कुक ही हॉटेलंपण माझ्या आवडत्या होटेल्सपैकी आहेत. हल्ली फौजी ढाबा जास्त लोकप्रिय झालाय पडेगावच्या थोडंस पुढे असलेला हा ढाबा फॅमीली पार्टीसाठी एकदम मस्त इथे लंच ला जाऊन दिवसभर मस्त टाईमपास करता येतो. मुलांना खेळायला खेळणी बसवलीयेत. पण हा ढाबा किंवा आजकालचे नविन ढाबे व्हायच्या आधीचा अस्सल ढाबा म्हणजे मिटमिट्याला असणारा पाशाभाईचा ढाबा फार सुरेख चव होती याच्याकडच्या चिकन मसालाची. आता हाही कमर्शीअल झालाय साधारण नोव्हेंबर डिसेंबरमधे लायन्स क्लबतर्फे आयोजीत होणा-या आनंदनगरीमधे मिळणारा पापड कधिही न विसरता येणारा आहे. अजुनही मिळतो. फक्त या पापडासाठी पुन्हा एकदा या दिवसात औरंगाबादला जायची इच्छा आहे. सध्या माझं फ़ेवरेट असणारं हॉटेल म्हणजे वाळुजला असणारं लुधियाना ढाबा पिवर पंजाबी चव असते सगळ्या पदार्थांना, आणि हवं तसं बनवूनही देतो हा. आणि शेवटी औरंगाबादची शान असलेलं तारा पान सेंटर कुठेही कधीही स्पेशल जेवण झालं की तारापान ची पानं घरी आलीच पाहिजेत असा दंडकच आहे बहुतेक औरंगाबादकरांचा. आणि तीथे जाऊन पान खाणं हा तर एक राजेशाही अनुभव असतो. गाडी तारापानच्या जवळपास उभी करायची कि लगेच याचा माणुस येउन order घेतो, पाचच मिनिटात सुंदर तबकामधे गुलाबाच्या पाकळ्या,चांदिचा वर्ख लावलेली रसदार पानं तुमच्या समोर हजर असतात. अगदी नवाबी थाटात तशी ही खाद्य यात्रा न संपणारी आहे कारण चवी बदलतात, हात बदलतात आणि आपण खातच असतो . बरचसं राहून गेलय ब-याच आठवणी धुरकट झाल्या आहेत बरीचशी नावं आता आठवतही नाहियेत, हो पण चव मात्र जिभेवर रेंगाळत असते अजूनही. म्हणून किमान सध्या जेवढ आठवलं तेवढतरी जपायचा एक छोटासा प्रयत्न. तुर्तास औरंगाबाद खाद्ययात्रा ईथेच समाप्त |
|
येस श्यामली
मी त्या भोज राजस्थानी भोजनालयात सहकुटुंब जेवलोय. छानच असतं जेवण.. आणि तू म्हणतेस तसं तो मिशावाला मालक खरंच आवर्जून चौकशी करतो. काय हवय काय नको ते जातीनं बघतो. आमच्या जवळच्या बॅगा पाहिल्यावर तर ही परगावची मंडळी आहेत यांच्या कडे आवर्जून लक्ष द्यायला हवं अशी मनाशी खूणगाठ बांधून तो आमच्या कडे खूपच लक्ष देत होता. अब्ब करत आम्ही जेव्हा बाहेर पडत होतो तेव्हा आवडलं का, परत या असं पण बोलला...
आणि बस स्टॅण्ड रस्त्यावरच हॉटेल कार्तिकीच्या ओळीत (स्टेशन कडे जाताना) खाली एक छोटंसं गुजराती हॉटेल आहे. तिथे गुजराती जेवण ही छान मिळतं.
तारा पान सेंटरची तर बातच कुछ और आहे. तिथं गेल्यावर मला उगीचच आपण कुणीतरी शाही व्यक्ती आहोत असं वाटायला लागलं होतं
घाटी हॉस्पिटलाच्या बाहेर कुण्या मुसलमानाचं एक हॉटेल होतं रस्त्याच्या खाली उतरून जावं लागायचं, तळघरात होतं ते. हा बाबा कोफ्ता करी अल्टिमेट करायचा. आता ते हॉटेल आहे की नाही माहीत नाही. वडील घाटीला admit होते तेव्हा इथेच येऊन जेवावं लागायचं कारण यापेक्षा चांगलं (पक्षी: त्यातल्या त्यात स्वच्छ) दुसरं हॉटेल जवळ कुठेच नव्हतं..
ते जालना रोडवरचं मिंगलिंग चायनीज आहे का ग अजून? मी गेलो नाहिये तिथे पण नुसतं चायनीज मिळणारं एक जुनं हॉटेल आहे ते.
महेश इकडेपण बघायचं असतं हेच विसरले होते मी
धन्यवाद अभिप्रायाबद्दल.
मिंगलिंग नाहि आठवत मला. मी कधि गेले नाहि बहुदा.
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/109672.html?1194012718