मराठी नववर्ष शुभेच्छा !

Submitted by प्रकाश काळेल on 22 March, 2009 - 12:11

शिशीरातली सारी आखड होळीने जाळली
वसंतानेही बघ चहुकडे रंगपंचमी आरंभली

नव्या पालवीचा साज लेउन सृष्टीही नटली
नववर्ष स्वागता पक्षांनीही मैफील थाटली

यावर्षी किती हसलो,किती रडलो
हे गणित आता संपले !
सुखदु:खाची शिदोरी बांधून पदरी
हे वर्ष आता सरले !

चाखून गूळासोबत कडुनिंब,
या वर्षासही देउ प्रेमे अलिंगन

चल विसरु सारे तंटे, सोडू सार्‍या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !

-----------------------------------------
सर्व मायबोलीकरांना मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हर्दिक शुभेच्छा !

-प्रकाश

गुलमोहर: 

मस्त गुढी उभारली प्रकाश. तंटामुक्ती आंदोलनाचा अध्यक्ष केले पाहिजे तुला.

प्रकाश,
कविता आवडली, आणि पोहोचवू इच्छित असलेला संदेश ही मिळाला... :)

फक्त एक बदल सुचवला तर चालेल का?
>>पक्षांनीही महफिल थाटली << यात महफिल च्या ऐवजी मैफल ही चपखल बसेल. योग्य वाटलं तर बदल कर, महफिल हा हिंदी किंवा मराठी कोणताच शब्द वाटत नाही. (निदान मला तरी, हिंदी शब्द बहुतेक मेहफिल आहे. )

चला, नववर्षाची सुरेख सुरूवात !! छान :-)

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही :-) )

गुढीपाडव्याच्या तमाम मा.बो.करांना शुभेच्छा !!!
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

सुंदर.....
सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन् नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

प्रकाश छान.
जर चाखून गूळासोबत कडुनिंब, ऐवजी कडुनिंबासोबत गुळ केल तर ?

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" जागुताई,
गोडानंतर कडू आवडत नाही वाटतं?
कवितेत चालतं बरं!
चल विसरु सारे तंटे,
उंच गुढी उभारु !
हार्दिक शुभेच्छा!!!
"

सुंदर.....प्रकाश तुलाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! :)

सर्व मायबोलीकरांना गुढीपाडवा अन मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

उमेशराव, तुम्ही बहाल केलेल्या पदाला मी जाहीर राजीनामा देतोय ! ;)

दक्स :) आभारी आहे बदल करतो !

जागू ते सोबत आहे गं ! नंतरआधी काही नाही ! :)

सर्वांना पुनश्चः शुभेच्छा !

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

प्रकाश शुभेच्छा आवडल्या :)
सर्व माबोकरांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा :)

खुप छान.
गुढीपाडव्याच्या मा.बो.करांना शुभेच्छा :)

या गुढीपाडव्याच्या सर्व मायबोलीकरांना शुभेच्छा.....
हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना
सुखा
समाधानाचे
आनंदाचे
भाग्याचे
आरोग्याचे
आणि सौख्याचे जावो.

----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....

शुभेच्छांबद्दल आभारी.

चल विसरु सारे तंटे, सोडू सार्‍या अढी
ऋणानुबंधांची उभारु उंचच उंच गुढी !
आवडले.

गुढी उभारू सुखाची
मरगळ घालवू गतवर्षाची

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

प्रोफेसरांच्या शब्दात
कबाबातली हड्डी गेली सोडून गेले बुडाबुडी
लंगोट बांधून तुले उचलतो उंचच्या उंच बांध गुढी