सदस्य प्रवेश |
माचिस...दहा वर्षापूर्वीची गोष्ट. पुण्यातल्या 'डेक्कन'ला माझ्या दोन मित्रांबरोबर मी हा सिनेमा पाहायला गेले होते. चित्रपट tax free होता... साडेतीन रुपये तिकीट, संपूर्ण थेटरमधे आम्ही तिघे धरून जेमतेम १०-१२ माणसं असतील. सिनेमा संपून बाहेर आलो, तर धो धो पाउस कोसळत होता. 'डेक्कनच्या' बाहेर, hongkong लेनच्या सुरुवातीला एक चहाची टपरी असायची, तिथे चहा घेतला. पत्र्यावर वाजणारा पाउस, भर पावसात चहाच्या कपात पडणारे पाण्याचे थेंब आणि चहावाल्याच्या किटलीतून निघणारी वाफ़... तिघंही शांत.. आपल्याच नादात, एकटे. तशीच पावसात भिजत घरी आले. घराच्या गेटमधून गाडी आत घेण्याच्या आणि park करण्याच्या style वरून माझे बाबा, मी पाहून आलेला सिनेमा हा 'बात कुछ जमी नही' पासून 'बर्यापैकी बरा' ते ' ultimate' ह्यातल्या कोणत्या category मधे होता हे बरोब्बर ओळखत असंत. माचिस... कोणताही सिनेमा पाहताना माझं पहिलं लक्ष असतं ते सिनेमाच्या screenplay कडे. माचिसच्या पटकथेमधे संवादाइतकीच महत्व गाण्याच्या शब्दांनाही आहे, नव्हे, सिनेमात अनेक situations मधे ही गाणीच जास्त प्रभावीपणे त्या त्या वेळच्या परिस्थीतीशी आपली ओळख करून देतात. माचिसमधल्या taking मधली मला आवडलेली गोष्ट म्हणजे नैसर्गीकपणा. अगदी चंद्रचूड सिंग सारख्या कोणत्याही angle नी 'हीरो' न वाटणार्या माणसाची मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड ते तब्बूची 'याद न आये कोई' किंवा भेज कहार पियाजी बुलाओ' ह्या गाण्यातली अतिशय natural expressions . ओम पुरीचा 'सनातन' असाच खूप natural . एकूणच ओम पुरी हा माणूसच अभिनयाची, भूमिकेची खूप चांगली जाण असणारा माणूस आहे हे सतत जाणंवतं त्याची एकूणच body language , आवाज वापरण्याची आणि संवाद म्हणायची पद्धत नुसतं बघूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. माचिस मला आवडला कारण लहान लहान seenes मधून, गाण्यांच्या शब्दामधून "कधी directly तर बर्याच वेळा indirectly नुसती indications देत, न कळत आपल्यालाही विचार करायला वाव देत सिनेमाची कथा पुढे सरकते. खूप प्रसंग सांगता येतील, पण उदाहरणच द्यायचं तर हा एक सीन... आतंकवादी गटात कृपाल (चंद्रचूड सिंग) खूप नवीन आहे. 'आपल्या मित्राच्या जखमांचा, त्या छळाचा बदला घ्यायचा आहे' ह्या पलिकडे त्याला काही माहीत नाहीये. त्याने अजून कधी बंदूक चालवली नाहीये, की बाॅंब बनवण्याबद्दल त्याला काहीही माहीती नाही. अशा गोंधळलेल्या मनस्थितीत असलेल्या त्याच्याबरोबर आहे सनातन (ओम पुरी). कधी गच्चीवर गप्पा मारताना, कधी नदीवर आंघोळीला गेले असताना, सनातन त्याला 'त्याचे स्वत्:चे विचार ' सांगत आहे, आणि ह्या संभाषणातून कळत्-नकळत कृपाल त्याच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करत आहे. "जब किसी आदमी साथ बिन्साफ़ी होती है, और होती चली जाती है, अकेले वो लढ नही पाता. तब वो अपनी तरह के और लोगोंको इकठ्ठा कर लेता है..... असं बोलणं सुरु असतानाच शेजारून एक ट्रेन जाते. ट्रेनच्या आवाजात आपला आवाज ऐकू यावा ह्यासाठी साहजिकच ओम पुरी चढलेल्या आवाजात बोलायला लागतो. हेच सगळे संवाद नुसते दाखवले असते, तर ते धर्मविरोधी भावना भडकवणारं एक typical भाषण वाटलं असतं. पण त्या ट्रेनच्या वापरामुळे एक तर चढलेला आवाज असूनही ते बोलणं 'भडक' वाटत नाही, शिवाय कृपालच्या मनातले धावणारे विचारही दर्शवतं. परिणामी आधी बंदूकीला हातही लावायला तयार नसलेला कृपाल 'आता' एका निष्पाप सश्याचा बळी घ्यायला सहजतेने 'तयार होतो'. मला स्वत्:ला माचिसची गाणी जितकी गुलजारच्या शब्दांकरता आवडतात तितकीच विशाल भारद्वाजच्या संगीताकरताही. हरिहरनच्या base असलेल्या गंभीर पण तरीही soft आवाजाकरता, लताच्या आवाजापेक्षा तिच्या ह्या गाण्यातल्या expressions, mood करता, त्या 'तुम गये सब गया' मधल्या संजीव अभ्यंकरच्या आलापाकरताही. एक संगीतकार म्हणून विशाल ते आजचा विशाल भारद्वाज ह्या प्रवासाविषयी लिहायला मला अतिशय आवडेल. पण आत्ता इथे त्याला माझ्याकडून 'योग्य न्याय' दिला जाणार नाही असं वाटतंय..म्हणून त्याविषयी नंतर कधीतरी! परवा सिनेमा पाहताना 'छोड आये हम वो गलिया' गाणं सुरु झालं आणि reflex action व्हावी त्याप्रमाणे मी म्हणून गेले ' अरे, हा तर आपला के.के'! परवा 'माचिस' बघितला आणि वाळवंटात राहत असूनही पुण्याच्या 'त्या दिवशीच्या' पावसात मी परत एकदा भिजले... आपल्याच नादात, एकटी! 'डेक्कनला' माचिस बघून आल्यानंतर मी जो writeup लिहिला असता, तोच आज मी दहा वर्षांनी लिहीतीये. हे शब्द, ही वाक्य 'जशीच्या तशी' डोक्यात होती... फ़क्त ती कागदावर यायला दहा वर्ष लागली इतकंच! |
|