!! आरती श्री स्वामी समर्थ !!

Submitted by शिवाजी उमाजी on 20 July, 2017 - 02:02

!! आरती श्री स्वामी समर्थ !!

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ!!धृ!!

कृपा तुमची सदैव असता, ना हो कुणी कष्टी
राहुनी अक्कलकोटी, असते आम्हावरी दृष्टी
गाउ किती, वर्णु किती, करू किती स्वार्थ
तुम्ही दिला, तुम्ही घडविला, जीवनासी अर्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!१!!

भिऊ नकोस म्हणता, नेमे पाठीशी असता
संकट काळी, बळ देउनी, हरविल्या चिंता
वेळोवेळी प्रत्यय देउन, दिले कृपा तिर्थ 
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ

श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ
तुम्हा कृपेने, जीवन आमुचे होउ दे सार्थ !!२!!
©शिवाजी सांगळे, मो.+91 9545976589

Group content visibility: 
Use group defaults

Nidhii ji, मेघा जी, दीपा जोशीजी व चैत्राली उदेगजी सस्नेह श्री स्वामी समर्थ...

छान..आवडली..
होउन आता कृष्ण, करा शिवास कृतार्थ >>>>
ह्यामध्ये गहन अर्थ सामावलेला आहे.. गुरुशिष्य परंपरा!

खूप छान... सुंदर.... जय श्री स्वामी साई समर्थ माऊली की जय हो!!
स्वामींची कृपा आहे आपल्यावर!!