ते खोट्यांचे खरे अंदाज होते !!

Submitted by प्रकाशसाळवी on 27 June, 2017 - 07:43

ते खोट्यांचे खरे अंदाज होते !

वेदनेच्या सागराचे ते गाज होते
वंचनेने पोळलेले ते साज होते
**
त्या वेड्याच्या शब्दात काही अर्थ आहे
शहाण्याच्या त्या कर्जाचे ते व्याज होते
**
फासलेस सर्वांगास सुगंध जरीही
मनाच्या त्या दुर्गंधीचे ते माज होते
**
दावूनी आमिष मोठे लावी गळाला
ते खोट्यांचे काही खरे अंदाज होते
**
ऐकावी गझल भटांचीच असावी
गझलांचे एकमेव ते ताज होते
**
प्रकाश साळवी
२६-०६-२०१७
०९१५८२५६०५४

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users