एक जाणीव

Submitted by Akshayaj on 24 June, 2017 - 02:54

"एक जाणीव''

कलत्या उन्हाच्या आडोशाआड दडल्यासारखी,
एक जाणीव पाहता पाहता विरून गेल्यासारखी..

मावळतीच्या पंखाखाली लपल्यासारखी,
अजाणताच प्रौढ होऊ घातल्यासारखी..

चिंब पावसात भिजूनही कोरडीठक्क राहिलेली,
वरून हिरवा रंग लेवूनही अंतरंगात गेरूने माखलेली..

संधिप्रकाशाचे कवडसे पांघरून उगवतीकडे डोळे लावून बसलेली,
बघता बघता दिशांचे भान हरवून बसलेली..

ऋतूबदलाच्या निव्वळ चाहुलीने हरखून गेलेली,
प्रत्यक्षात मात्र जगरहाटीच्या चक्रात अखंड भरडून निघालेली..

या जाणिवेला जाणवणारी तगमग कधीच न संपणारी,
सरतेशेवटी माणसातलं माणूसपण हरवलंय हेच अनुभवणारी..

Group content visibility: 
Use group defaults