सूर नवा जुळताना

Submitted by अनुया on 17 June, 2017 - 15:52

जुनेच सर्व भास ते वळण नवे वळताना
जुनेच गीत ओठी का सूर नवे जुळताना

नवीन चंद्र आज हा नवीन आणि तारका
चांदणे जुने तसेच पानातुनी गळताना

नवी दिशा नवे तरंग नवीन लाट सागरी
जुनी व्यथा तीरी फुटे वाळूतून विरताना

नवी निशा नवी उषा नवीन सांज रंगली
तसाच खिन्न सूर्य तो क्षितिजाशी ढळताना

लपेटुनी धुके दुधाळ पहाट नाहते दवात
वाऱ्यावर गंध तोच फूल नवे फुलताना

नवीन आस मानसात आठव परि ते उदास
जुनेच स्वप्न लोचनात गालावर झरताना

Group content visibility: 
Use group defaults