Removal of heart blockages without surgery उपचाराबद्दल माहिती हवी आहे.

Submitted by चिन्नु on 5 June, 2017 - 22:04

पुणे येथे अशी आयुर्वेदिक स्वरूपाची उपचार पद्धत असल्याचे समजते. याचा कुणाला अनुभव आहे का? हा खात्रीशीर इलाज आहे का? Angioplasty न करता हे blockages remove होतात का? तिथे जाऊन रहावयाची सोय आहे असे समजते. याबद्दल कुणी जाणकार आहेत का? कुणा नातेवाईकांचे अनुभव शेअर केलेत तरी चालतील.
मधुमेह आणि रक्तदाब असून ब्लॉकेजेस असणार्‍या व्यक्तीसाठी, तातडीने ही माहिती हवी आहे. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मधुमेह आणि रक्तदाब
आयुर्वेदिक उपचार ते करतात. शीव येथील शेठ वरजीवनदास आयुर्वेदिक हॅास्पिटल आणि कॅालेज येथे वडिलांना नेले असता त्यांनी स्पष्ट सांगितले अॅलपथीची औषधांची सवय झाल्यावर या औषधांचा काही उपयोग नाही शिवाय ते औषध (?) बंद केले की बिपी लगेच वाढतो.

वैद्यनाथचे पुस्तक ( आरोग्य प्रकाश : वै रामनारायण शर्मा .भाग दुसरा पाहा) दोन भागात नागपूरला मिळते. या औषधांशिवाय ते दुसरे देत नसावेत. त्रिफळा चूर्ण आणि अर्जुनारिष्ट ही दोन पारा न वापरलेली औषधे आहेत.

दुरुस्ती: >>मधुमेह आणि रक्तदाब
आयुर्वेदिक उपचार ते करतात>>
असे वाचावे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
माधवबाग पुणे येथील उपचाराबद्दल प्रश्न आहे. तिथे उपचार घेतल्याने angioplasty करण्याची गरज न पडता हृदयातले ब्लॉकेजेस दूर किंवा कमी होतात असे ऐकले आहे. यात किती तथ्य आहे माहीत नाही. युट्युबवर त्यांची उपचारपद्ध्त तसेच त्यांच्या टीव्हीवर घेण्यात आलेल्या मुलाखती आहेत.

मधुमेह आणि रक्तदाब असून ब्लॉकेजेस असणार्या व्यक्तीसाठी, तातडीने ही माहिती हवी आहे. धन्यवाद!
>>>>
आयुर्वेद,युनानी,होमिओपदी यांच्या नादाला लागू नका.हे सगळे गैरप्रकार आहेत.यातून ब्लॉकेज नाहीसे होत नाहीत.
माझ्या वडीलांची दीड वर्षापुर्वी ॲंजिओप्लास्टी झाली आहे.तेव्हा सगळे पर्याय चेक केले होते. मल्टीपल ब्लॉकेज व सिविअर असतील तर ॲंजिओप्लास्टीशिवाय पर्याय नाही.बायपासही करावी लागू शकते.
ॲंजिओप्लास्टी सेफ आणि non invasive आहे.पथ्य पाळली तर रुग्ण निरोगी व नैसर्गीक आयुष्य पुर्ण करु शकतो.
तुमच्या पेशंटला शुभेच्छा!

मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आहे पण प्रॅक्टिस करत नाही. तरी एव्हढेच सांगेन की अशा पद्धतींच्या मागे अजिबात लागू नका आणि मौल्यवान वेळ फुकट घालवू नका.

संपदा,
छेछे!
तुम्ही आयुर्वेद विरोधी दिसता.
म्हणूनच प्रॅक्टिस करीत नाही.
Lol

>>
शीव येथील शेठ वरजीवनदास आयुर्वेदिक हॅास्पिटल आणि कॅालेज येथे वडिलांना नेले असता त्यांनी स्पष्ट सांगितले अॅलपथीची औषधांची सवय झाल्यावर या औषधांचा काही उपयोग नाही शिवाय ते औषध (?) बंद केले की बिपी लगेच वाढतो.
>>

हे इतके ऑथेंटिक अनुभवाचे बोल वाचूनही काहीच समजत नाही काय?
अहो, अ‍ॅलोपथी वाईट्ट. त्याची सवय अजून वाईट्ट्ट.

सगळ्या "स्पष्ट" सांगणार्‍यांची क्रेडीबिलिटी काय? तर ते असोच.

हा वरचा प्रतिसाद बघून हल्ली कोणाला नीट बोलताच येत नाही का असं वाटायला लागलं. सगळीकडे उपरोधिक्/आततायी सूर.

>>डाॅ. साती यांनी चांगली माहिती दिली असती.
त्यांनीही वरच्या प्रतिसादापेक्षा काही वेगळ्या शब्दांत सांगितलं नसतं.

शेठ वरजिवनदास जवळच आम्ही राहायचो शीवला. तिथे खोकला ,सर्दी,कावीळ इतर पोटाचे आजारावर घेतलेल्या औषधाचा चांगला गुण येत असे. शिवाय धर्मादाय असल्याने एक रुपयाच घेत. त्यांना पैशाची हाव असण्याचा संबंध नव्हता . तिथले शिकवणारे वैद्यच तपासायला बसत असत.
रुग्ण आपल्या औषधांवर अवलंबून राहणार तर त्याला स्पष्ट सल्ला द्यायला घाबरत नसत.
ते दुसरे पुस्तक सुचवले आहे ते वाचण्यासारखे आहे. रोगाची माहिती देऊन औषधांचे विधि दिलेले आहेत.
स्पष्ट सल्ला देणारे एमबीबीएस डॅाक्टरही असतात. उदा० कुर्ला इथले जोशी डॅाक्टर.

माझ्या वाचनातून समजलेल्या माहितीतून--
भारतात मधुमेह पुर्वीपासून होता. रक्तदाब म्हणजे नाडीपरीक्षेतून वैद्या लोकांना समजायचे बहुतेक. परंतू त्यास ते पित्तदोष समजत असावेत कारण उच्च रक्तदाबाने डोके दु:खते. त्रिदोषनाशक त्रिफळा चूर्ण लागू. परंतू हे झटपट बरे करणारे नसून वाजिकरण/ रसायन आहे.

आयुर्वेदिक उपचार याबद्दल विषय आला त्यामुळे लिहिले. अन्यथा मुंबईच्या लोकमान्य टिळक(सायन हॅास्पिटल), केइएम(परळ) इथे ही ओपरेशन्स चोखपणे केली जातात एवढे खात्रीने सांगतो.

सर्वांना खूप खूप धन्यवाद.
मानव, युट्युबवर त्यांच्या उपचाराचे विडीओ उपलब्ध आहेत.
सिंथेटिक, थँक यु!
संपदा, मेनी थँक्स! कन्फ्युझ्ड अवस्थेमध्ये तुझा आणि इतरांचा रिप्लाय पाहून बरे वाटले.
srd, हो. आयुर्वेदिक औषधं नीट पथ्य पाळता येत असेल तरच घ्यावीत.

लोकमान्य टिळक व परळ इस्पितळातले आयुर्वेदिक? त्ज्ज्ञ ही "ऑपरेशन्स" चोखपणे करतात हे वाचून आनंद झाला.
विना ऑपरेशन वाल्या आयुर्वेदिक उपचारांबद्दलचा धागा आहे. त्यात चोख ऑपरेशनचा संबंध कुठे येतो?

मी शोधून काढलेल्या काही नव्या शब्दांपैकी एक शब्द "ऑटो-पॅरोटिझम" असा आहे.

स्वतःचा पोपट करणे.

विना ऑप्रेशन ब्लॉकेज वगैरे पोपटी प्रकार यातच बसतात.

अँजिओप्लास्टी, करोनरि बायपास या नव्या शोधांमुळे जीवनमान वाढले, हे नाकारणे शक्य नाही.

२०-२५ वर्षांपूर्वी जेव्हा भारतात या ट्रीटमेंट्स खूप महाग व सहज उपलब्ध नव्हत्या त्या पूर्वीच्या काळी कितवा अ‍ॅटॅक आला हे मोजत बसत असत. तिसरा आला की मरणार हे नक्की होते. पण पहिला येऊन गेल्यानंतर, पेशंट लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसह अनेक वर्षे जगू शकत होता.

हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर काहीच उपचार केले नाहीत, तरीही अनेक लोक कित्येक वर्षे जगू शकतात, लगेच उद्या उद्सरा अ‍ॅटॅक येत नाही, या नैसर्गिक बाबीचा फायदा हे विनाऑपरेशन ब्लॉकेजेस वाले घेतात अन दुकाने चालवित असतात.

इतकी वर्षे विना ऑपरेशन चालू असलेले दुकान अ‍ॅलोपथिक, अर्थात, शास्त्रीय व खरेच उपयोगी असते, तर आतापर्यंत १०० कार्डिओ कॉन्फरन्सेसमधे डंका वाजवून ही उपचारपद्धती जगभर प्रचलित झाली असती. अनेक ट्रॅडिशनल उपचार अ‍ॅलोपथी उर्फ मॉडर्न मेडिसिनने सर्वांसाठी खुले केले आहेत.

सापडलेला नवा उपचार लपवून ठेवणे हा धंदा मॉडर्न मेडिसिन करीत नाही. रिसर्च कॉस्ट वसूल करण्यासाठी फार्मा सेक्टर वाजवऊण पैके घेतो, पण सर्जिकल/ट्रीटमेंट टॅक्निक दुनियेची मक्तेदारी असते...

असो.

हॅप्पी (मॉडर्न माधवबाग्/तांबे) आयुर्वेद टु यू.

>>इतकी वर्षे विना ऑपरेशन चालू असलेले दुकान अ‍ॅलोपथिक, अर्थात, शास्त्रीय व खरेच उपयोगी असते, तर आतापर्यंत १०० कार्डिओ कॉन्फरन्सेसमधे डंका वाजवून ही उपचारपद्धती जगभर प्रचलित झाली असती. अनेक ट्रॅडिशनल उपचार अ‍ॅलोपथी उर्फ मॉडर्न मेडिसिनने सर्वांसाठी खुले केले आहेत.

सापडलेला नवा उपचार लपवून ठेवणे हा धंदा मॉडर्न मेडिसिन करीत नाही. रिसर्च कॉस्ट वसूल करण्यासाठी फार्मा सेक्टर वाजवऊण पैके घेतो, पण सर्जिकल/ट्रीटमेंट टॅक्निक दुनियेची मक्तेदारी असते... >>
बेस्ट रिझनिंग.

आ.रा.रा. चांगली माहीती.
ते लहानपणी ऐकल्याचं आठवतं की अमक्याला तीन attack आलेत आता चौथा आला तर सम्पलंच सगळं. लोक लिटरली मोजायचे attacks.

>विना ऑप्रेशन ब्लॉकेज वगैरे पोपटी प्रकार यातच बसतात.

एक ताजी बातमी. पण ती इतकी ताजी आहे की पुण्यात अगोदरच ती वापरून उपचार होत असतील हे शक्य नाही. पण जी गोष्ट पूर्णपणे आधुनिक वैद्यकशास्त्राला अशक्यच वाटत होती ति शक्य आहे का असा विचार पडावा अशी ही बातमी आहे. काही वर्षांनी अँजिओप्लास्टी, करोनरि बायपास न करता ब्लॉकेजेस निघू शकतील अशी आशा करायला हरकत नाही. कमीतकमी सर्जरीशिवाय करण्याचे जे उपाय आहे त्यातल्या एका संशोधनाला, प्रयोगशाळेत तरी (Control Vs Experiment) थोडे यश मिळते आहे. आता ही गोष्ट आयुर्वेदाला पूर्वीपासून माहिती होती असा दावा केला जाईल. त्यातले औषध नैसर्गिक रित्या उपलब्धही आहे. पण ते तोंडांने घेऊन काहीच फरक पडत नाही , विशिष्ट पद्धतीनेच (थेट टोचून) घेतले तरच फरक दिसतोय असेही या संशोधनात म्हटले आहे.

हा लेख खास वैद्यकीय व्यावसायिकांसाठी
https://www.nature.com/articles/ncomms15750

तीच माहिती सगळ्यांसाठी थोड्या सोप्या भाषेत.
http://www.news-medical.net/news/20170607/Natural-sugarc2a0may-trigger-i...

हे संशोधन खूपच प्राथमिक स्वरूपाचे आहे. पण त्याचा आधार घेऊन, त्यात उल्लेखलेले औषध मी टोचून देतो आणि सर्जरीशिवाय तुम्हाला बरे करून देतो असे सांगणारे नवीन डॉक्टर निघण्याची शक्यता नाकारता येत नाही.

>>>लोकमान्य टिळक व परळ इस्पितळातले आयुर्वेदिक? त्ज्ज्ञ ही "ऑपरेशन्स" चोखपणे करतात हे वाचून आनंद झाला.>>~आ.रा.रा.

लेखकाचा विचार बदलला तर हो इथे करा असं घ्या. त्यांना कळलं आहे मला काय म्हणायचय ते. मी गांभिर्यानेच खरडत आहे.

लिंक करता थॅंक्स अजय. फायदा झाला तर चांगलेच आहे, पण तुम्ही म्हणता तशी फसगतही होण्याची शक्यता बोकाळेल.
माधवबागेत काही आयुर्वेदीक औषधं गुदातून इंड्युस करतात म्हणे.

माधवबागला जाऊन फसवणूक झालेल्या काहींची पत्रं लोकसत्तेनं काही वर्षांपूर्वी छापली होती. 'शतायुषी'तही बहुतेक माधवबागचं नाव न घेता या प्रकारापासून दूर राहण्याचा सल्ला दिला गेला होता.

तिथे नक्की कोणती औषधं दिली जातात हे कोणालाच माहीत नाही. प्रमाणीकरण वगैरे तर दूरच्या गोष्टी.

निदान मीतरी माझ्या नातलगांना अशा भोंदू प्रकारांच्या नादी लागण्यापासून परावृत्त करेन.

मधुमेहासाठी जांभूळ बियांची पूड औषध आहे. निरनिराळ्या आयुर्वेदिक औषधांचे गुण तपासण्याचे काम केइएम मध्ये होत असते. बियांच्या चूर्णाचे सेवन यापेक्षा त्याचा अर्क रक्तात टोचला असता साखर ताबडतोब खाली येते हे समजले आहे परंतू हा उपाय धोकादायकही आहेच.

थँक यू चिनूक्स.
srd, रक्तात टोचणेच काय पावडरसुद्धा (orally) धोकादायक असु शकते. प्रमाणाबाहेर काहीही धोकादायक ठरू शकतं. प्रमाण हे व्यक्तीनुसार बदलतं. त्यामुळे तज्ञाच्या सल्ल्याशिवाय घेणे अनुचित ठरू शकते.

तुम्ही म्हणताय ती ----- पुणे येथे अशी आयुर्वेदिक स्वरूपाची उपचार पद्धत ---- माहीत नाही.
पण बोरीवली, मुंबई येथे, डॉ माधव देसाई (आयुर्वेदिक नव्हे, मॉडर्न मेडिसिन), अशा प्रकारचे शस्त्रक्रियेविना उपचार करतात.

ओळखीतल्या एकांनी (७०+/-) बायपास / अँजिओप्लास्टी टाळण्यासाठी हा उपचार केला होता आणि गुण आल्याबद्दल समाधानी होते.
मात्र, वाटेल तसे वागणे + खाणेपिणे याचे हे लायसेंस नव्हे; पुन्हा अपथ्य कराल, सवयी सुधारला नाहीत तर पुन्हा इथे यावे लागेल, असे सांगून डॉनी घरी सोडले होते.
सलाईनमधून औषध दिले जाते. काही ठराविक काळाने टप्प्याटप्प्याने उपचार केला जातो.
त्यांचे माहितीपत्रक वाचून चिलेशन थेरपी असावी असे वाटले.

वैयक्तिक अनुभव नाही; आणि मला वैद्यकीय ज्ञानही नाही ------------- + तुमच्या पेशंटला मधुमेह आणि रक्तदाब आहे,
तेव्हा सावध राहून निर्णय घेणे चांगले
तपासणीचे रिपोर्ट घेऊन त्यांना भेटल्यास, ते योग्य मार्गदर्शन करतील.

आरारा परफेक्ट मांडलय. तुम्ही लिहिलेला हा मुद्दा फार महत्वाचा आहे.
"हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर काहीच उपचार केले नाहीत, तरीही अनेक लोक कित्येक वर्षे जगू शकतात, लगेच उद्या उद्सरा अ‍ॅटॅक येत नाही, या नैसर्गिक बाबीचा फायदा हे विनाऑपरेशन ब्लॉकेजेस वाले घेतात अन दुकाने चालवित असतात."
खरं तर बरेच पेशंट ह्या कारणामुळे बरे असतात आणि त्यांना बळच आपण ह्या औषधांमुळे बरे (नाही ठणठणीत!) आहोत असा समज करुन घेऊन स्वतः तर भाड्यानी आयुष्य जगत असतात (ऑन बॉरोड टाईम) अन त्याच बरोबर इतर लोकांना ह्या असल्या उपचारांबाबत विनाकारण विनातिकिट, आपण खुप लोकहिताचं काम करत आहोत ह्या आविर्भावात प्रचार करुन त्यांची भलावण(?) करतात त्याचा राग येतो आणि वाईटही वाटतं.

@चिन्नु
एकीकडे तुम्ही माधवबागेतल्या उपचाराबद्दल माहिती द्या असा धागा काढलाय. पण तुमच्या प्रतिसादावरून असे वाटतेय की तुम्हालाच याबद्दल सगळ्यात जास्त माहिती आहे आणि तुम्हीच त्याबद्दल माहितीचे प्रतिसाद देताय. एकूणात असे दिसते आहे की माधवबाग या प्रकरणाबद्दल फारसे काही चांगले, खात्रिशीर आणि मुख्य म्हणजे वैद्यकीय दृष्टीने योग्य अनुभव लोकांना नाहीत. त्यामुळे यापासून दूरच राहिलेले बरे.

अजय, मी त्यांचे युट्युबवर विडीओ पाहिलेत. आणि मैत्रिणींच्या नातेवाईकांना चांगले अनुभव आलेत. त्यामुळे काय करावं न समजून हा धागा काढला. मला आयुर्वेद म्हणा, जनरल मेडिसीन म्हणा फक्त ऐकून माहीत आहेत. काही काही पदार्थ गरम पडतात, किंवा थंड असतात असं आजोबांमुळे माहीत आहे. पण मला खरोखरच याविषयी काही माहीत नाही..
डायबिटीस झालेली माणसं अर्धी डॉक्टर असतात, किंवा होतात.. या उक्तीनुसार, काही गोष्टी अर्धवट माहीत आहेत.
पण जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र माबोकरांना साकडं घातलं. स्टेंट किंवा सर्जरीच्या वेळी शुगर कंट्रोल नाही झाले तर... हा प्रश्न सतत डोक्याचा भुगा करत आहे. त्यामुळेच सर्जरीशिवाय काही होउ शकते का हे पाहत आहे. कृपया गैरसमज नकोत.

>>माधवबाग या प्रकरणाबद्दल फारसे काही चांगले, खात्रिशीर आणि मुख्य म्हणजे वैद्यकीय दृष्टीने योग्य अनुभव लोकांना नाहीत. त्यामुळे यापासून दूरच राहिलेले बरे.
yepp, thank you!

चिन्नु, माधवबाग ची ट्रीटमेंट घेऊन, आता तुम्ही पूर्णपणे बरे झालात असं तिथल्या वैद्यांनी सर्टीफाय करून बाहेर सोडल्यावर घरी येताना कारमध्ये हार्ट अटॅक येऊन वारल्याची एक केस अमच्याच घरात आहे.

Whereas माझ्या बाबांची 38 व्या वर्षी बायपास सर्जरी झाली. ते अजून 60 + वयातही ठणठणीत आहेत. हार्ट ब्लॉकेजेस वगैरे ऑपरेट केल्याशिवाय कोणीही बरे करू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे. कृपया जीवाशी खेळ करू नका लवकरात लवकर सर्जरी करून घ्या.

बाप्रे! थँक्स मॅगी. माधवबाग किंवा असल्या उपचारांबद्दल सध्या खात्री नाही वाटत आहे. अजून एक डॉक्टरला दाखवून मग सर्जरीचे ठरविणार. तेही नात्यातील असल्यामुळे.
तुम्हा सर्वांची खूप मदत झाली. खूप खूप आभार!

माझं डॉक्टरी म्हणणं खडूसपणे का होईना लोकांपर्यंत पोहोचलेलं दिसतंय.

आता एक अवांतर प्रतिसाद लिहितो.

बेसिकली, माधवबागवाले त्या इडलीवाल्यासारखी फ्रँचायसि देतात. त्याच्या टर्म्स कंडीशन्स, जाहिराती इत्यादि अंदर की बात मला ठाऊक आहेत.

हा धागा, माधवबाग पेक्षा, जे कुणी हे साने महोदय आहेत, त्यांची पर्सनल जाहिरात करण्यासाठी काढलेला आहे, असा माझा दाट संशय आहे.

आम्ही कॉन्फरन्सेसमधे काही पेपर पब्लिश केला, तर त्यात वापरलेल्या औषध, इन्स्ट्रूमेंट इ. मधे स्वतःचा वैयक्तिक्/फायनान्शियल इंटरेस्ट नाही/आहे , असल्यास कसा, असे इमानदारीत नमूद करीत असतो. अन्यथा, त्या पेपरला पियर रिव्ह्यूड स्टेटस मिळत नाही. रिजेक्ट होतो.

या धागाकर्त्यांनी या पर्टिक्युलर डॉक्टर वैद्यांशी त्यांचा काहीच संबंध नाही, वा असलाच तर कसा, हे नमूद करावे, असे म्हणतो.

धन्यवाद.

अरेरे! शीर्षकामुळे कुठच्या कुठे चाललय हे. थांबा शीर्षक बदलते.
तिथं जाऊन उपचार घ्यावा का ह्या प्रश्नासाठीच धागा काढला होता. माझा या किंवा पुण्यातल्या कुठल्याही डॉ. शी किंवा वैद्यांशी दुरचाही काहीही संबंध नाही.

अत्यंत महत्वाच्या वैद्यकीय माहितीबद्दल येथे विचारणा करणे हेच मुळात चुकीचे वाटते. विचारणार्‍यांना भेटलेले डॉक्टर्स शंकानिरसन करत नाहीत का? की त्यांना भेटण्याआधीच येथे विचारले जाते? ते शंकानिरसन करत नसतील तर त्यांना अल्टरनेटिव्ह म्हणजे सोशल मीडिया आहे का?

इथले सल्ले घेऊन काही तिसरेच झाले तर जबाबदार कोणाला धरणार आहात?

कुठल्या डॉक्टर कडे जाऊ हे विचारण्याला काय हरकत आहे ?
शेवटी आपल्याला गरज असते तेव्हाच आपण विचारपूस करायला लागतो. आणि अशा डॉक्टर्सची माहिती थोडीच आपल्यालाकडे अगदी तयार असते? फक्त कोणाचाही सल्ला घेताना पुढे कॉमन सेन्स वापरावा हा अलिखित नियम असतो तो पाळण्याइतके लोकं सुज्ञ असतात बहुतेक.

बुवा,

कदाचित तुमचे म्हणणे अ‍ॅप्रिशिएट करण्यासारखी माझी परिस्थिती नसावी. मी धागालेखकाच्या भावनांबाबत व त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत पूर्णपणे मैत्री मोड मध्ये आहे. पण माझा कोणताही वैयक्तीक प्रश्न मला आजवर मायबोलीवर किंवा इतरत्र विचारावासा वाटलेला नाही. त्यामुळे मला हे थोडे धाडसाचे वाटले.

कदाचित माझे दोन्ही प्रतिसाद अस्थानी वाटतील, तसे वाटल्यास क्षमस्व! Happy

मला आयुर्वेद पध्दती बद्दल काही माहिती नाही आहे. पण मधुमेह असताना सर्जरीचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
जवळच्या मधुमेह असलेल्या दोन व्यक्ती सर्जरीनंतर HHNKC/Electrolyte Imbalance मुळे दगावल्या आहेत. सर्जरीच्या आधी गोळ्या घेऊन ग्लुकोज नियंत्रणात असुनही.

पारु, त्यासाठीच तर हा धागा काढला आहे. मधुमेह असतांना सर्जरी करणे फार रिस्की.
इथे जीव कसा वाचवायचा याचा विचार चालु आहे. आणि लोकांनी मात्र कुठेकुठे सबंध जोडलेत वर!
मधुमेह अगदी शत्रुलाही न होवो! असा रोग झाला तर सोशल मिडिया काय, वैद्य काय, रस्त्यावरचा माणूस काय, अक्कल कधीकधी एव्हढी गहाण पडते, की कुणाचेही ऐकायला आणि काहीही करायला तयार होतो माणूस Sad इथे मात्र जबाबदारी, वैद्याशी संबंध, जाहीरात आणि कुणाचे काय कुणाचे काय! _//\\_

चिन्नु, माधवबाग ची ट्रीटमेंट घेऊन, आता तुम्ही पूर्णपणे बरे झालात असं तिथल्या वैद्यांनी सर्टीफाय करून बाहेर सोडल्यावर घरी येताना कारमध्ये हार्ट अटॅक येऊन वारल्याची एक केस अमच्याच घरात आहे.>>

तसंच ॲंजिओप्लास्टी ऑपरेशन झाल्यानंतर हॉस्पिटल मधेच असताना दोन दिवसांनी ( डिस्चार्ज सुद्धा मिळालेला नाही ) परत हार्ट अटॅक येऊन वारल्याची एक केस अमच्याच घरात आहे. माझा सख्खा मामा . ऑपेरेशन चा ३ लाख खर्च झाला आणि दोन दिवसातच हॉस्पिटल मधेच असताना गेला . त्यामुळे हे व्यक्ती सापेक्ष आहे . त्यात माधवबाग च्या ट्रीटमेंट चा काही संबंध नाही असे वाटते. धागाकर्ती योग्य तो निर्णय घेतीलच . शुभेछा

चिन्नुजी,

माझ्याकडून भावना दुखावल्या गेल्या असल्यास मनापासून माफी मागतो. Sad

चिन्नु,
हा धागा २-३ दिवसांपासून वाचते आहे. दहा जणांना विचारले तर १० वेगवेगळी मते येतील.तुमच्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या.ते जे सांगतील तसेच वागा..तुम्ही तुमच्या रुग्णाला तो बरे होण्यासाठी डॉक्टरच्या हाती सोपवित आहात.इतकेच मनाला ठासून सांगा.ऑल दि बेस्ट !

वेगवेगळी मते आले की एवढी मतमतांतरे पाहून निर्णय घेताना अजूनच गोंधळ उडतो. पण अज्ञानापेक्षा माहिती परवडली. गोंधळ दूर करता येतो

अज्ञानापेक्षा माहिती परवडली. गोंधळ दूर करता येतो >+१
चिन्नु ,नक्कीच योग्य तो निर्णय घ्याल आणि पेशंट ला बरे वाटेल . मनापासून शुभेच्छा.

सुजा ची पोस्ट आवडली.
एखादा असाध्य रोग झाला की आपण आपल्या व्यक्तिला वाचवण्यासाठी विविध ऊपाय शोधतो, त्यासाठी अनेक सल्ले घेतो, पण तरिही मनाशी एक खूणगाठ कायम असली पाहिजे की 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे'
सुजा ने म्हटल्याप्रमाणे हार्ट पेशंट असणार्‍या दहा व्यक्तिंचीडॉक्टरव, औषधावरची श्रद्धा निराळी असू शकते, स्वतः बरं होणार की नाही याचा आंतरिक विश्वास, पथ्य पाळण्याची सवय, घरच्यांचा आधार शिवाय आर्थिक परिस्थिती या वर ही ती व्यक्ती बरी होण्याचं प्रमाण अवलंबून असतं. त्यामुळे कुणी सुचवलं म्हणून एखाद्या हॉस्पिटलची सेवा सुश्रुषा आपल्याला उपयुक्त ठरेलच असे नाही. नुकतेच माझ्या वडिलांचे आजारपण झाले तेव्हा आम्ही डॉक्टर बदलले आणि या नव्या हॉस्पिटलचा आम्हाला खूप चांगला अनुभव आला, पण नंतर बाबांच्या अनेक मित्र मंडळीनी वर वर सांगितले की 'त्या हॉस्पिटलचा रिपोर्ट बरोबर नाही' ' बिलात फसवतात' इ. कुणी हॉस्पिटल चा चांगला रिपोर्ट देवो, अथवा वाईट तिथे आपण सेवा घेणार आहोत की नाही हे आपल्या जबाबदारी वर ठरवावे.

माझ्या ऑफिसमधल्या कलिगच्या वडिलांची बायपास झाली, ऑपरेशन पूर्वी त्यांचं हार्ट फक्त १५% काम करत होतं
बरे झाले, आणि डिस्चार्ज मिळाला आणि अ‍ॅम्ब्युलन्स मधुन घरी आले, बंगल्याच्या फाटकात कसंतरी व्हायला लागलं आणि तिथेच गेले. ऐकून मला पण खूप धक्का बसला...
तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही, जो निर्णय घ्याल तो विचारपूर्वक घ्याल अशी खात्री जरूर आहेच.

तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

माबोकरांनो! खूप खूप धन्यवाद. तुमच्या शुभेच्छा आहेत पाठीशी!
आयुर्वेदिक उपचाराची ही वेळ नाही असंच वाटतयं. अजून एका डॉक्टरचं मत पेंडिंग आहे. त्यानंतर काही ठरावे.
सल्ला वैयक्तीक निरोप ठेवूनही मिळाला असता. मायबोलीकर एकमेकांना चेहर्‍यानी ओळखत नसले, भेटले नसले तरी, त्यांचे सल्ले नेहमीच मोलाचे ठरले आहेत. निदान माझ्यापुरते तरी. अगदी कोतबोपासून, टेक्निकल ते मी रोज शोधात असणार्‍या रेसिपीज असोत. मायबोली आता फॅमिली आहे!
कुटुंबात जसं कुणाचा सल्ला आवडतो, कुणाचा पटत नाही. तसेच हेही. हा पब्लिक फोरम आहे याची जाणीव असूनही प्रश्न इथेच उपस्थित करावासा वाटला. कुठलाही उपचार व्यक्तीसापेक्ष असतो हे अगदी खरे आहे. दहा व्यक्तींना विचारल्यास, शंभर सल्ले मिळू शकतात, पण when any info is good info, हे करावेच लागते. पर्याय नसतो. भोंदुगिरीला बळी न पडता इलाज व्हावा. यासाठीही हा बाफ कामी यावा.
अश्या उपचारपद्धतीमुळे पूर्णपणे बरे झालेत अश्या प्रतिक्रिया मिळूनही आणि असे विडीओ युट्युबवर पाहूनही, कुठेतरी काहीतरी पटत नव्हतं. आता पुण्याची फ्लाईट पकडावी की नाही, या संभ्रमामुळे हा बाफ काढला. यामुळे मला तर मदत झालीच, होत आहे. अनेक माबोकरांनी वैयक्तिक निरोप ठेवून मदतीचा हात पुढे केला आहे. वरच्या अनेक प्रतिक्रियांमुळे बरंचसं मळभ गेलं आहे. सर्वांचे मनापासून धन्यवाद!

>>>>> आयुर्वेदिक उपचाराची ही वेळ नाही असंच वाटतयं. <<<< हे बरोबर.
पण जे काही उपचार जिथुन करुन घ्याल , तेव्हा शंकाकुशंका बरोबर बाळगू नका. त्यादेखिल काढून टाका मनातुन, अन खास करुन ही चर्चा पेशंट बरोबर तर मुळीच करू नका.
शेवटी एक लक्षात घ्यायचे, व्यक्ति तितक्या प्रकृति, व मानसिकता. उपचाराला रुग्णाकडुनचा सकारात्मक प्रतिसादही तितकाच जरुरी असतो तसेच त्या त्या व्यक्तिच्या जीवनशैलीचा पुर्वेतिहासही महत्वाची भुमिका वठवतो. (असे माझे मत - हो, लगेच उगाच कुणी दाखले/आकडेवार्‍या/पुरावे मागू नका ).
तेव्हा आपण शक्य ते सर्व प्रयत्न करीत रहायचे.
माझ्या फ्यामिलीमधिलच एक उदाहरण आहे, वय ७०+, अवाच्च्यासवा वजन अन पोटाचा घेर वाढलेले, पाचेक वर्षांपूर्वी हार्ट ब्लॉकेजेस निश्चित झाली, त्या स्प्रिंगा टाकुन विना सर्जरीचे करायचे काय म्हणतात ते अँजिओप्लास्टी ठरत असतानाच, या लोकांनी शब्दशः कंटाळा केला, काय कारणाने ते सांगत नाही, पण तशीच दीड दोन वर्षे पुढे गेली, दरम्यान एखाद महिन्याचा माधवबागचा कोर्सही केला. "तत्कालिक हुषारी" वाटू लागली, पण त्यात शारिरीक कष्ट/व पैसा जात होता अन परत तेच कारण - कंटाळा /उदासिनता. ते थांबवले. मला स्वतःला त्या "उपचारांबद्दल" खात्री नाही. कारण माझे मते ते उपचार म्हणजे "जेव्हा तुम्ही धडधाकट असता तेव्हा पुढे काही होऊ नये म्हणुन सुदृढपणे जगायच्या जीवनशैलीचा एक भाग आहेत", अन ते महागडेही आहेत. ...
ब्लॉकेजेस वगैरे नजरेस आल्यावर मग (तहान लागल्यावर विहिर खणण्यासारखे) ते (माधवबागचे/आयुर्वेदिक) उपचार करुन उपयोग होतो/होईल, यावर निदान माझा तरी विश्वास नाही. हे म्हणजे पी हळद हो गोरी म्हणण्यासारखे आहे. असो.

अन नंतर जे अ‍ॅडमिट करायला लागले, ते डायरेक्ट वन सिटींग मध्ये ४ बायपास केल्या, हात अन तंगडीतुन शीरा घेतल्या, ओपन हार्ट सर्जरी . आता त्यासही दोन वर्षे होत येतिल. जाडी आहे तशीच, त्यामुळे आता चालणे/पायर्‍या-चढ चढणे अवघड झालय. माणूस खणखणीत ठणठणीत, आत्ताही तरुणांना लाजवेल इतका कामाचा उरक व उत्साह. कारण या पंचाहत्तरी पार केलेल्या वयातही "मानसिक" ताकद अफाट.

स्टेंट बसविला. आतातरी ऑब्झ्रर्वेशन मोड ऑन आहे.
इथे लिहून माहिती मिळाली. जवळच्या लोकांच्या शुभेच्छा, शुभाशिर्वादाने बरंच शांत वाटलं. अनोळखींकडन सहानुभूती का काय्तेपण मिळालं!

लिंबुदा, 'सकारात्मकता'-you said it! तेच नव्हतं सोबत. त्याचमुळे निर्णय लवकर करू शकले नाही. तहान लागल्यावर विहीर खणून काही होत नाही, हे कळले तरी त्या वेळेसच्या स्थितीमध्ये अज्जिबातच वळले नाही.
इथे जे वाटत आहे ते वेंट आउटही झाले, बरे वाटले आणि निर्णयही झाला. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ही तुम्हा सर्वांनी खूप मोठी मदत केलीत.
खूप खूप धन्यवाद! _//\\_

Pages