मैत्रीचे नाते

Submitted by अक्षय. on 26 May, 2017 - 01:56

मैत्रीचे नाते

तू नाहीस नुसताच मित्र
तुझ्याविना विना रंगत नाही आयुष्याचं चित्र
मैत्री असते एक अतूट नाते
जसे वाऱ्यावर डोलणारे गवताचे पाते
मैत्रीचे हे नातेच वेगळेच असते,
घरचा लोकानप्रमाने घट्ट असते,
तिची कधी जात नसते
तिला कधी लिंग नसते
या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं
मग सर्वाना हेच सांगावसं वाटतं
माझे नाही, तुझे नाही,
तर हे मैत्रीचे नाते आपले असते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा ! मस्तच जमलिये कविता ....खूपच सुन्दर रचना Happy
तिची कधी जात नसते
तिला कधी लिंग नसते
या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं
मग सर्वाना हेच सांगावसं वाटतं
माझे नाही, तुझे नाही,
तर हे मैत्रीचे नाते आपले असते. >>>> हे खूप आवडलं Happy

छान

सोप्या शब्दांत सुंदर लिहीलंय.
तिची कधी जात नसते
तिला कधी लिंग नसते
या स्नेहाच्या वर्षावात मन आनंदून जातं
..
हे तर एकच नंबर..