या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
कोडे क्र १२६५ मराठी
कोडे क्र १२६५ मराठी
अ य न
प ज क त म र ग
क ह ज अ ब ग
य न प
म त प द र
द प ज र
१२६५.
१२६५.
मराठी..
अश्विनी ये ना
प्रिये जगु कसा तुझ्याविना मी राणी गं
कशी ही जिंदगीत आणिबाणी गं
ये ना प्रिये
मी तर प्रेम दिवाणा रसिला
दे प्यार जरासा नशिला
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
मानवजी, नविन धागा काढा म्हणजे
मानवजी, नविन धागा काढा म्हणजे तिकडे देता यईल आता!
इथले शेवटचे कोडे!
१२६६ हिंदी अ न ज छ य द अ भ न
१२६६ हिंदी
अ न ज छ
य द अ भ न
अभी ना जाओ छोडके
अभी ना जाओ छोडके
ये दिल अभी भरा नही
मला १ही ओळखू येत नाही बाबा...
मला १ही ओळखू येत नाही बाबा...
प्लिज हेल्प...
ओके, आता नविन धाग्यावर कोडे
ओके, आता नविन धाग्यावर कोडे द्या.
मी देऊ कै नविन कोडे नविन
मी देऊ कै नविन कोडे नविन धाग्यावर अक्षय ??? तुम्हाला मान्य असेल तर........
नाहितर तुम्ही द्या...
फॉर्मलिटी आणि कावेरी ये बात
फॉर्मलिटी आणि कावेरी ये बात कुछ हजम नही हुई. दे बिनदास्त
थांकु...........
थांकु...........
हे असले धागे वाहते का नाही
हे असले धागे वाहते का नाही ठेवत?
हे असले धागे वाहते का नाही
हे असले धागे वाहते का नाही ठेवत?>>>
अॅमी, पूर्वी याचा विचार केला होता.
अनेकदा कोडे लवकर सुटत नाही, क्लू आणि त्यावरिल प्रश्न यामुळे कोडे अणि त्यावर दिलेले सुरवातीचे क्लूज वाहुन जातील असे वाटले.
तरी यावर इतरांनी परत एकदा आपले मत व्यक्त करावे.. करावा का वाहता?
नका हो काका अस काही करू..
नका हो काका अस काही करू.. सगळी मजा निघून जाईल खेळण्याची...प्लिज .....................
तरी यावर इतरांनी परत एकदा
तरी यावर इतरांनी परत एकदा आपले मत व्यक्त करावे.. करावा का वाहता?>> हा निर्णय पूर्णतः तुमचा आहे पण मत विचाराल तर अजिबात नको . याच एक कारण तुम्ही वरती दिलंय आणखी एक म्हणजे कोड्यात रिपीटेशन येऊन मजा जाईल. अंताक्षरी खेळताना अक्षरांची मर्यादा असते ठराविक अक्षरे सतत रिपीट होत राहतात त्यामुळे त्याचा वाहता धागा आहे ते चांगलाय पण आज तो धागा कोणत्या पानावर आहे ते माहीत नाही आणि हा धागा सातत्याने पहिल्या पानावर आहे . वाहता केला तर याचेही तेच होईल.
तरी यावर इतरांनी परत एकदा
तरी यावर इतरांनी परत एकदा आपले मत व्यक्त करावे.. करावा का वाहता? >>> नको मानवजी.
धागा वाहता नसावा..
धागा वाहता नसावा..
एक आहे ह्यावर आपण गाणी कोडी देतो त्या सोबत माहिती पुर्ण क्ल्यु देखिल येतात बर्याचदा.
तसेच काही गीतांविषयी विशेष काही असेल तर ती मते देखिल यावीत आपल्या त्या गीताच्या अनुशंगाने काही माहिती असेल कधी ती मजेशीर असू शकते ते देखिल आपण सर्वांना सांगावे!
धागा वहात अनको पण इथल्या
धागा वहात अनको पण इथल्या गप्पा थांबवा प्लिज
करेक्टः
करेक्टः
वाहता नको पण गप्पा आवरा.
आवरा हा पर्फेक्ट शब्द आहे..
आवरा हा पर्फेक्ट शब्द आहे.. थांबवणं शक्य नाही अर्थातच
वाहता नको पण गप्पा आवरा.>> यस
वाहता नको पण गप्पा आवरा.>> यस अवांतर गप्पा नकोत!
Pages