आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ४

Submitted by मानव पृथ्वीकर on 24 May, 2017 - 04:49

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -३ : http://www.maayboli.com/node/62235

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही मानव, सेन्सॉर केलेय गाणे
रीया,
नायक -- बहुतेक तुमच्या आवडीचा (वाचलेले आठवतेय...)
गीतकार -- इथे गाणी ओळखणार्‍या सराईत आयडी सारखे नाव / आडनाव
चित्रपट नाव -- चित्रपटातील व्यक्तिरेखेचे नाव + व्यवसाय एकत्र. ही व्यक्तीरेखा करणारा अभिनेता आणि नायकाचे मूळ आडनाव सेम

आले ग.

देखा तुझे देखा मैंने हुआ मैं तो क्रेज़ी
तौबा मेरी तौबा मेरी कुड़ी है तू *
आजा मेरी बाँहों में तू आजा बेबी लव मी आ आ आ आ आ आ
मुझे तू ज़रा सी हाँ इस दिल में एंट्री दे
छुपा ले यूँ मुझको ना रहे कोई एग्जिट
है लव मेरा हिट हिट सोनिये तो फिर कैसी खिट पिट सोनिये
तू बेबी बड़ी फिट फिट सोनिये ना कर ऐसे खिट पिट खिट पिट

शब्द आठवत नव्ह्ते, गुगलून लिहिलंय.
कारवी..क्ल्युज भारी, त्यामुळेच ओळखू आलं.
चित्रपटः बिल्लू
शाहरूख आणि इरफान खान

आधी वाट पाहिली कुणी सोडवतय का म्हणून..पण कुणीच सोडवायला तयार नाही आणि रीया ने दिल से पुकारा म्हणून ट्राय केला Happy

११०७: हिंदी (२००७-१७)
ज त ख त प स ह
क अ त अ ज अ ज
ज त अ म ब प स ह
क अ ब अ ज अ ज
अ म ब म म स म द ह
म न र ज द म त ह क न ह
ज ह ध त ह अ
द क क ध अ ज अ ज

मीच बोलवून आणलं तिला Proud

जाऊ देत हिनेच दिलं dokyawar hat marun ghenari smiley.gif

हे भारीये ना.. ज्याला हवं त्याने मला संधी दान करा बरं, पुण्य लागेल Proud

चल, आता हे सोडव...आणि तुला तर जमलंच पाहिजे, सध्या क्रशलिस्ट वर टॉप ला दुसरं कुणी असलं म्हणून काय झालं?

जो तेरी खातिर तडपे पहले से ही
क्या उसे तडपाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा
जो तेरे इश्क में बहका पहले से ही
क्या उसे बहकाना ओ ज़ालिमा ओ ज़ालिमा

११०९ मराठी
द ज ह ह झ न
म र अ ल अ द
अ म र ख क म
प प द क ह ह

ताई मी सकाळ पासून मैदानातच उतरलो नाही मोह आवरला नाही म्हणून आताच सोडवलं.

रिया मी आता दिलेलं कोड म्हणजे पारंपरिक लावणी आहे शेवटची ओळ बघ पटकन ओळखेल

रीया, बैठकीची लावणी आहे, नाचरी नाही..
लावणी-सम्राज्ञीने गायलेले नाही, ठुमरी क्वीनने गायलेय

दरबार जुना ह्यो हंड्या झुंबर नवं
मध्यान्ह रातीला आता लावा अत्तर दिवं
अंगाअंगी मी रंग खेळते, केसामधी मरवा
पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा !

१११० मराठी

स न न द अ
ब म ह झ
त य न स
स छ म ह म
त स द
त य न स

साजणी, नभात नभ दाटून आले ,
कावरे मन हे झाले,
तू ये ना साजणी.
साजणी छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद
तू ये ना साजणी

हे का?

बरोबर आहे बहुतेक.... रीयानी एक कडवे खाल्ले चहासोबत..
नाही बाबा जाईदे Sad Sad >> आज हे काय? एक सोडव आणि जा...तुम्हा दोघींसाठी दिले तेव्हा गायब होती

आज हे काय? एक सोडव आणि जा...तुम्हा दोघींसाठी दिले तेव्हा गायब होती >>>>> इथे असते तरी मला ते गाण आलं नसते... खरचं ..

बार >>>नाही ओ नाही ...मी एकदम घरकोंबडी आहे Happy

मानव, तुम्हाला लिंबूटिंबूचा एक नियम वाढवायला लागणार असे दिसतेय... दोघी दोघी रूसल्यात... >>> Sad Sad
एकतर एकही गाण नाही ओळखलं मी आज Sad त्यात एक ओलखू आलं ....ते प...................................ण मराठी ,
आणि ते ही विना क्ल्यु (माहितिये ना मराठी गाण्यांचं कित्ती अफाट नॉलेज आहे मला Sad )..... तर आधीच गाण लिहिलं Angry

Pages