एका धावकाचे (म्हणजे माझेच :P ) ‘मैत्री’ खातर आवाहन

Submitted by हर्पेन on 22 May, 2017 - 11:39

एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन

मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.

माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.

आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.

मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.

अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/

तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.

मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)

इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.

मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html

मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.

तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.

देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.

ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149

ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB

जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद Happy

आठवडा पहिला - देणगीदार ६ - जमा झालेली रक्कम रुपये ३२००१/-
आठवडा दुसरा - देणगीदार ७ - जमा झालेली रक्कम रुपये ११६१२/-
आठवडा तिसरा - देणगीदार ४ - जमा झालेली रक्कम रुपये ५०००/-
आठवडा चौथा - देणगीदार ६ जमा झालेली रक्कम रुपये १०००१/-
आठवडा पाचवा - देणगीदार ४ जमा झालेली रक्कम रुपये १००००/-
आठवडा सहावा - 'जैसे थे' परिस्थिती
आठवडा सातवा - देणगीदार १६ जमा झालेली रक्कम रुपये २२५००/- एकूण (४३/७२) (९२११४/- /७२०००/-)
आठवडा आठवा चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद श्री Happy

आ जही १६ किमी धावलो. ह्या आठवड्यातल्या निर्धारित १०० किमी पैकी ८० झाले. उद्या पुणे रर्निंगच्या पाषाण येथे होण्यार्‍या लास्ट संडे ऑफ द मंथ मधे २१ किमी धावणार आहे ते धावून झाले की मग झाले Happy

देणग्या जमा व्ह्यायला सुरुवात झाली आहे. सोमवारी सं स्थेमधून देणगीदार आणि रक्कमा याबाबत नीट माहीती घेऊन इथे सांगतो. रोजच्या रोज जमेलच असे नाही (म्हणजे नाहीच जमले) त्यामुळे दर सोमवारी असे करत जाईन असे म्हणतो.

धन्यवाद जाई. आणि अतरंगी Happy
कालच्या रविवारी २१किमी धावून आठवड्याचे १०० किमी चे ध्येय पुर्ण केले. # अतीव समाधान

तर मंडळी, कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की मागच्या आठवड्यात एकूण सहा जणांनी मिळून (मायबोलीकर व अमायबोलीकर) मैत्रीच्या खात्यावर रुपये ३२००१/- जमा केले आहेत.

२५०००/- ची एक देणगी, २००० /- च्या दोन, १००१ ची एक आणि १०००च्या दोन देणग्या अशा प्रकारे ही रक्कम जमा झालेली आहे.

सगळ्यांनीच नावे जाहीर करू नये अशी विनंती केल्यामुळे नाव इथे अथवा फेसबूकवर जाहीर करत नाहीये.
सर्वांचेच मनापासून आभार. मैत्री करता तुमची देणगी अमुल्य आहे.
आपण जरूर ही खात्री बाळगू शकता की ह्या रकमेचा विनियोग सुयोग्य प्रकारेच होईल.

तळटीप - पैसे जमा केल्यावर मला जरूर कळवा.
बँकेकडून मेसेज न आल्यास कृपया जरा थांबा, वाट पहा. विशेषतः ऑन्लाईन पैसे जमा करताना ती वेळ रिझर्व्ह बँकेच्या कामकाजाच्या वेळे व्यतिरिक्त असेल तर असा मेसेज येण्यास विलंब होऊ शकतो असे आढळले आहे.

धन्यवाद वर्षू.
वर्षूताईचे आभार मानायचे राहिल्याबद्दल दिलगीर आहे.

आज सकाळी एकूण २२ किमी सावकाश धावलो. स काळी धावणे चालू केले तेव्हा अंधार होता नंतर जाणवले की मळभ आहे. पाऊस पडला तर किती बरे होईल असे वाटत असतानाच काही वेळातच पाऊस पडायला सुरुवात झाली. पहिल्या पावसात भिजण्याची मजा औरच असते त्यातून धावण्यात्ची संधी मिळाली तर दुधात केशर...

सुरुवातीच्या काही किमी अंतरानंतर बरोबरचे मित्र परत फिरले. ( त्यांना इतके अंतर धावण्याची गरज नाहीये) पण इतकं मस्त वातावरण असल्याने आणि आभाळाचे विभ्रम बघत धावल्याने एकटे धावत असल्याचा कंटाळा आलाच नाही. पण पाऊस काय फार वेळ राहीला नाही आणि नंतर आलेल्या उन्हाने ओल्या डांबरी रस्त्यावरून परावर्तित केलेल्या किरणांमुळे डोळे अगदी दिपले. डोळे मिटून पळावे असेच वाटले.

पण एकंदरित आजचा दिवस पावसाचा, पावसामुळे बहार आली. Happy

मंडळी पैसे जमा कराल तेव्हा मला जरूर कळवा. अनामिक रहायचे असले तरी संस्थेला काही तपशील पुरवावे लागतात.
इथे / विपुतही कळवायचे नसल्यास मला फोनवर कळवा. कृपया धन्यवाद

धन्यवाद प्रज्ञा९ , मेघाजी

आज २१.५८ किमी धावलो. इतकं अचूक अंतर माहीत असण्याचे काराण की मी आज प्रविण झेले नावाच्या एका धावपटू बरोबर धावलो. तो गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधे नोंदवला जाईल असा विक्रम करू पाहतो आहे. तो अनवाणी पायांनी रोज एक अर्धमॅरॅथॉन या प्रमाणे सलग १२१ दिवस धावणार आहे. आजचा त्याचा ३१वा दिवस होता. पावणेतीन तास लागले . इतक्या हळू धावायची सवय नसल्याने जरा त्रासच झाला Proud
पण छान वाटले.

धन्यवाद टीना, झेलम, भुईकमळ

पावसात तेही अवचितपणे आलेल्या पहिल्या पावसात पळायचा आनंद खरोखर अवर्णनीय

Pages