मन माझे सैराट...

Submitted by दिपक ०५ on 21 May, 2017 - 08:41

7 एप्रिल मंगळवार..  गॅलक्सी सॉफ्टवेअर प्रा. लि. चे  सि इ ओ मि. दिक्षित  आपल्या स्टाफ सोबत मिटिंग मध्ये व्यस्थ.. 

सर्व इंम्प्लॉई गंभिरपणे त्यांचे बोलणे ऐकत होते. हॉल मध्ये खूप गंभिर वातावरण झाले होते. पण त्या हॉल मधिल एकच  खूर्ची रिकामी होती. सि. अकॉटेंट मि. सागर यांची.

इतक्यात त्या तणावलेल्या वातावणात हॉलचा दरवाजा  धाडकण उघडला आणि सागर चा आवाज ऐकू आला. मे आय कम इन सर?.. - सागर.

येस यू कॅन.. -दिक्षीत. 

सागर गडबडीने आत येऊन त्या रिकाम्या खूर्ची वर बसला. सगळा स्टाफ त्याच्याकडे एखाद्या वेड्याप्रमाणे पहात होता.

सो. शल् वी कंटीन्यू ? - दिक्षीतनी  प्रश्नार्थक नजरेने सागरला विचारलं.

ऑफ कोर्स सर. -सागर.

दिक्षीतनी पून्हा आपला विषय सूरू केला. सगळा स्टाफ  पून्हा पणे त्यांचे बोलणे ऐकू लागला. 2 तासांच्या गंभीर वातावरणानंतर दिक्षित सरांनी आपले बोलणे संपविले.

एक दमाचा श्वास घेत सगळे बाहेर पडले. हॉलच्या बाहेर पडताच सागर ला पाहताच रोहन त्याला हाक मारतो.

सागर... काय रे आज पण लेट ! - रोहन.

अरे काय सांगू यार प्राची आणि माझ्यातला वाद वाढतच चाललाय.. -सागर.

अरे पण कशामूळे? आणि एकत्र बसून सॉट - आऊट करून  घ्या ना.. -रोहन.

सागर, तू काय बोलतोयस मला  त्याचा काहीही अंदाज लागत नाहीये.. आधि काय झालं ते निट सांगशिल? -रोहन.

 हो. पण इथे नको. इट्स बिट पर्सनल. संध्याकाळी कॉफी शॉप मध्ये भेटू.. -सागर.

बरं चल मग संध्याकाळी 5:3O ला भेटू.. बाय.. -रोहन.

.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया, ते "व्यस्थ" बदलुन "व्यग्र" असे करणार का?
मराठीत व्यस्त म्हणजे inverse / disproportionate
मराठीत व्यग्र म्हणजे busy
हिंदीत व्यस्त म्हणजे busy