बाहुबली २ - भव्यतेचा नेत्रदीपक उत्सव

Submitted by सनव on 15 May, 2017 - 15:06

लक्ष्मी रोडवर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील असताना, एखादी भारताची विजयी वन डे मॅच प्रत्यक्षात वा टीव्हीवर पाहात असताना, घरच्या लग्नकार्यात गच्च भरलेल्या हॉलमध्ये सर्वांनी एकसुरात शुभमंगल सावधान म्हणत अक्षता टाकताना- जो एक फील येतो- लार्जर दॅन लाईफ उत्सवी गर्दीत तुम्ही मिसळून गेला आहात व दुसरं काही आता डोक्यात येत नाहीये, ऐकू येत नाहीये - तो फील बाहुबली चित्रपट बघताना येतो.

बाहुबली -दोन ही एक भारतीय mythology बेस्ड फँटसी आहे. कथा तशी महाभारताची आठवण करुन देणारी- चुलत भावांचा सत्तासंघर्ष वगैरे- पण जे प्रेझेंटेशन आहे ते लाजवाब आहे. इतका ऑडियो व्हिज्युअल रिचनेस भारतीय पडद्यावर फार फार क्वचित दिसतो. मोठ्या पडद्यावरच जमल्यास बघावी अशीच ही कलाकृती आहे. मी पध्दतशीर रिव्ह्यू लिहित नाहीये पण डोक्यात राहिलेल्या काही गोष्टी-

१. टेक्नॉलॉजी व भव्य सेट्स यांच्या संगमातून पडद्यावर दिमाखदार माहिष्मती राज्य उभं राहिलं आहे. फँटसी genre ला साजेसा परिणाम साधण्यात राजामौलीना यश आलं आहे. भव्य गणेशमूर्ती, विशाल राजप्रासाद चित्रपट संपल्यानंतरही लक्षात राहतात. सर्व कलाकारांचे कपडे, दागिने डोळ्यांचं पारणं फिटवतात. चित्रपटाचं संगीत अशा चित्रपटाला जसं हवं तसं जोशपूर्ण आहे. चित्रपटांत ठिकठिकाणी असणारे श्लोक असोत वा कृष्णपूजेच्या वेळचं सुंदर गाणं असो वा राज्याभिषेकाच्या वेळचं संचलन व घोषणा असोत- इट्स स्पॉट ऑन.

२. प्रभास, राम्या कृष्णन, अनुष्का, राणा व सर्वच कलाकारांनी दोनशे टक्के खणखणीत कामं केली आहेत. केवळ यांच्यासाठी म्हणून चित्रपट पाहिला तरी पैसे वसूल होतील. प्रभासच्या महेंद्रपेक्षा मला अमरेंद्रच जास्त भावला - म्हणजेच दोन वेगळ्या व्यक्तिरेखांतील फरक दाखवण्यात तो कमालीचा यशस्वी झालाय. अनुष्काचा अभिनय अप्रतीम आहे व ती अफाट सुंदर दिसली आहे. कान्हा सो जा गाण्यातील तिचा प्रेझेन्स मला अतिशय आवडला. राणाचा खलनायक कुठेच कमी पडला नाहीये. राम्या तर शिवगामीच वाटते..खरंच ती शिवगामीच असावी इतका सहज अभिनय आहे.

३. भारतीय चित्रपट त्यातही पुराणकालीन फँटसी म्हटल्यावर स्त्री कलाकारांना काही वाव नसेल , नुसतं सुंदर दिसायचं असेल, स्त्री व्यक्तीरेखा फुसक्या असतील असंच वाटलं होतं. पण देवसेनेच्या व्यक्तिरेखेतून व तिच्या बाहुबलीसोबतच्या नात्यातून फेमिनिस्ट रंग दिसून आला हा सुखद धक्का होता.

************स्पॉयलर अलर्ट ****************

मी बाहुबलीसोबत बंदीवान म्हणून येणार नाही म्हणणारी, भल्लालदेवला तलवार पाठवणारी, भर सभेत राजमातेला सुनावणारी आणि स्त्री, प्रेयसी, सून या सर्वांच्या आधी एक क्षत्रिय असणारी देवसेना खूपच आवडून गेली. स्त्रीला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे मानणारा, स्त्रीची विटंबना करणार्‍याला देहांताचीच शिक्षा देणारा, देवसेनेच्या सौंदर्याइतकाच तिच्या शौर्यानेही आकर्षित झालेला हँडसम अमरेंद्र बाहुबली उर्फ प्रभास आज समस्त भारतीय महिलांचा ड्रीम मटेरियल आहे यात आश्चर्य अजिबातच नाही. राजघराण्याने लोकांवर शासन करण्याच्या काळातील कथेत देवसेनेच्या तोंडी जनतेच्या मताचं महत्व (सेल्फ गव्हर्नमेंट) सांगणारा एक संवाद असणं आणि अमरेंद्र जिथे जाईल तिथे लोकांच्या पाठिंब्यामुळे राजा बनून राहील हे कथेच्या ओघात दाखवणं हेही अर्थपूर्ण आहे!

***********स्पॉयलर अलर्ट संपला.****************

४. पडद्यावर काही काही सीन्स हे अचाट व अतर्क्य कॅटेगरीत सहजच स्थान मिळवतील असे आहेत. पण ही फँटसी आहे त्यामुळे ते अपेक्षितच आहे. मला हॅरी पॉटर व गेम ऑफ थ्रोन्समुळे असे सीन्स बघायची सवय आहे व बाहुबलीतही मी ते एन्जॉयच केले.

५. हिंदीत डबिंग केलेलं असलं तरी जणू काही मूळ चित्रपटच हिंदी असावा असं चोख डबिंग आहे व जबरदस्त हिंदी संवाद आहेत. बाहुबलीचा आवाज आपल्या मराठी शरद केळकरचा आहे व त्याने फार छान काम केलेलं आहे. 'मेरा वचन ही है शासन' आणि 'यही धर्म है, यही क्षत्रिय धर्म है' सारखी वाक्यं आधी वाचली असली तरी पडद्यावर फार प्रभावीपणे येतात. भारतीय पडद्यावर असा भव्य प्रयत्न करणं आणि तो इतका यशस्वी करुन दाखवणं यासाठी राजामौली, प्रभास, अनुष्का व संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुबली २ या विकांतालाच बघितला. एकदा नक्कीच बघावा असा आहे. सगळ्यांनी मस्त अभिनय केलेले आहेत. आणि लढाईचे प्रसंग मस्त जमलेले आहेत. फँटसी चित्रपट बघायची आवड असल्याने खचितच आवडला.

लक्ष्मी रोडवर गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत सामील असताना, एखादी भारताची विजयी वन डे मॅच प्रत्यक्षात वा टीव्हीवर पाहात असताना, घरच्या लग्नकार्यात गच्च भरलेल्या हॉलमध्ये सर्वांनी एकसुरात शुभमंगल सावधान म्हणत अक्षता टाकताना- जो एक फील येतो- लार्जर दॅन लाईफ उत्सवी गर्दीत तुम्ही मिसळून गेला आहात व दुसरं काही आता डोक्यात येत नाहीये, ऐकू येत नाहीये - तो फील बाहुबली चित्रपट बघताना येतो.
+१

अगदी समर्पक शब्दात मांडलेस सनव!!

बाहुबलीच्या एंन्ट्रीला अग्निप्रस्ताव घेवून जाणारी शिवगामी त्याने रस्ता मोकळा केल्यावर त्याच्याकडे वळून पहाते, तेव्हा तिच्या डोळ्यातले भाव अप्रतिम आहेत.
एकाच वेळी बाहु बद्द्लचे प्रेम, वात्सल्य, अभिमान, गर्व सर्व त्यात एकवटले आहे.

बाहुबलीच्या युध्द कलेने मंत्रमुग्ध झालेली देवसेना, कानाला स्पर्शून गेलेल्या बाणांने ही विचलित होत नाही हे खूप आवडले.

विनिता + १ .
चित्रपटाचं संगीत अशा चित्रपटाला जसं हवं तसं जोशपूर्ण आहे. >>> एक ते बोटीतलं गाण सोडलं तर जयजकारा आणि जियो रे बाहुबली सध्या लेकाच्याही टॉप लिस्ट मध्ये आहेत . Happy
राणाचा खलनायक कुठेच कमी पडला नाहीये >>> काही प्रसंगातला त्याचा मुद्राभिनय केवळ अप्रतिम आहे .
शिवगामी त्याचासाठी नविन महाल बनवणार आहे ते सांगते, नविन धनुष्य आणते - तेन्व्हा , " ये आपकी मदिरा बोल रही है , पिताजी " , "उत्तर की दिशामे एक नये ग्रह का आगमन हुआ है " Happy

कटप्पाची प्रेमाची परिभाषा अशक्य आहे >>> दोनों को निम्बू मिरची लगाके धिमी आंचपे सेंकके खाने मे कितना आंनद आयेगा Lol

ठिक ठाक चित्रपट आहे. परंतू आधीच ढिगाने धागे बाहुबलीवर असताना एक स्वतंत्र धागा काढण्याची गरज नव्हती म्हणा. एखाद्या धाग्यावर प्रतिक्रिया म्हणून वरील मजकूर चालला असताच.

कुठल्या धाग्याला उत्तर म्हणून धागा काढला असेल तर...

असोच Happy

डॉयलॉगज कसले जबरदस्त आहेत.

मेरा वचन ही शासन है. - महेन्द्र बाहुबली

देवसेना को किसीने हाथ लगाया तो समझो बाहुबली की तलवार को हाथ लगाया - अमरेंद्र बाहुबली

धन्यवाद !
Coronation सीनचे सम्पूर्ण संगीत- सर्व श्लोक व अमरेंद्र बाहुबलीच्या संस्कृत घोषणा इथे
https://www.youtube.com/watch?v=DJdI48J7Jyc&spfreload=10

व्हिडियो नाहीये पण ऐकायला भारी वाटतं.

रोमांचक वाटतं माहिष्मतीची anthem ऐकायला.

अजुन एक डॉयलॉग शिवगामीने बाहुबलीला दिलेली शिकवण.
दिये हुवे वचन के लिये , सत्य और न्याय के लिये , धर्म स्थापना के लिये , किसी के भी जाना पडे , वो चाहे परमात्मा ही क्यों न हो , तो भयभीत ना हो , यही धर्म है, यही क्षत्रिय धर्म है !

श्री +१
माहिष्मती anthem जबरी आहे. मला तो क्षत्रिय धर्म वाला पूर्ण संवाद आवडतो. समय हर कायर को.. वाला संवाद पण मस्तच.

भव्य दिव्य अगदी सहमत
मलाही बरेचदा उगाचच मोठ्याने महेंssद्र बाहुबली म्हणून किंचाळावेसे वाटते

जो प्राण देता है वो भगवान है
जो प्राण की रक्षा करता है वो वैद्य
और प्राण बचानेवाला क्षत्रिय
- अमरेंद्र बाहुबली

राजमाता असं हवं. >>> Rofl
केले करेक्ट श्री __/\__

फॉन्ट फार छोटा झालाय, काय टाईप झालेय लवकर कळतच नाहीये.

अनेक अतिशयोक्ती अलकार(यात देवसेनेने घातलेले सुधा धरा) असुन एकदा बघायला मजा आली, काही काही सिन्स अचाट म्हणजे अचाटच आहेत ( डोक्यावर जळता कटोरा वाला लय ड्येजर).
देवसेना सुन्दर दिसतेच पण अभिनयही छान आहे तिचा, इन्फॅक्ट दोन्ही भागात सगळे स्त्रिपात्र इक्वली डॅशिन्ग दाखवलियेत, हिन्दी मुव्हिज मधल्या कचकड्याच्या,शोभेच्या बाहुल्या वाटत नाहित, देवसेनेचे दागिने मात्र अचाट आहेत, (लेकिच्या भरतनाट्यम टेम्पल ज्वेलरी मधे एक बारिकसा नोजपिस होता तो आजतागयत आम्ही वापरु शकलो नाही,) हि बाई काय आणी किती प्रमाणात दागिने घालुन फिरते, अबब!
पहिल्या भागातली लढाई मला दुसर्‍या पेक्षा जास्त आवडली, नारळाच्या झाडाची लगोर करुन बॉल सारखे सगळे सैनिक आत येतात तेव्हा जाम हहपुवा होते.
प्रभास अमरेन्द्र बाहुबली म्हणून जास्त आवडला, त्याची आणि अनुष्का जोडि भारी दिसते.