या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

Submitted by ऋन्मेऽऽष on 15 May, 2017 - 13:08

आज एका मराठी संकेतस्थळावर एका मराठी मुलाला एका मराठी व्यक्तीने असे खालीलप्रमाणे म्हटले ...

व्हॅल्यु अ‍ॅडिशन ची व्याख्या, स्पेलिंग तरी त्याला येतं की नाही कोण जाणे

मला कबूल करायला जराही लाज वाटत नाही की तो मुलगा मी आहे. आणि त्याहून लाज तर मुळीच वाटत नाही की मला वरील शब्दाची स्पेलिंग खरेच येत नाही. माझे ईंग्रजी खरेच कच्चे आहे. मला असे टोमणे खायची सवय असल्याने मला वाईटही वाटत नाही. ही कोणाची तक्रारही नाही. करणार तरी कोणत्या तोण्डाने, ज्या मुलीवर मी आजच्या तारखेला सर्वाधिक प्रेम करतो ती देखील मला यावरून बरेचदा लागेल असे बोलते. अर्थात मला ते लागत नाही, पण एखाद्याच्या मनाला लागू शकते.

असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते?

मुळात ईंग्रजी बोलणारयांकडे काय अशी महानता असते जी ती न जमणारयांकडे नसते.

पैसे कमावण्याचा किंबहुना आयुष्यात यशस्वी होण्याचा आणि ईंग्रजी भाषा जमण्याचा फारसा काही संबंध नसतो.

एखादी शुद्ध मराठी न बोलता येणारी व्यक्ती उद्योगपती असते आणि फाडफाड ईंग्रजी बोलणारे त्याच्या हाताखाली चाकरी करत असतात.

एखादा राजकारणातला नेता चक्क अक्षरशत्रू असतो म्हणून आपण त्याला हसतो पण त्याच्यातील नेतृत्वगुणामुळे मुत्सद्दीपणामुळे त्याने आपल्या चार पिढ्यांना न शिकता खाता येईल अशी सोय केलेली असते.

एखाद्या कलाकाराची खरी ताकद त्याच्या अंगातील कला असते त्याला या ईंग्रजी भाषेच्या कुबड्यांची जराही गरज पडत नाही.

मला आठवतेय, क्रिकेटमध्ये जेव्हा एखाद्या नवोदीत खेळाडूला सामनावीराचा किताब मिळायचा आणि त्याला ईंग्रजी बोलता यायचे नाही तेव्हा माझे मित्र त्याला हसायचे.. मी त्यांना हसायचो.. कारण तो खेळाडू आपल्या खेळावर मेहनत घेत तिथे आपल्या आयुष्यात यशस्वी झाला होता. आणि तुम्ही ईथे टीव्हीसमोर तंगड्या पसरून त्याला हसत बसला आहात.

अशी एक ना दोन शेकडो क्षेत्रातील लाखो उदाहरणे देता येतील. पण तरीही मला समजत नाही की आपल्याला ईंग्रजी म्हणजे काहीतरी भारी भाषा येतेय हा अहंकार नक्की येतो कुठून? याला कोण जबाबदार आहे? आपलीच समाजव्यवस्था की आणखी काही?

तळटीप - लेखात उल्लेखलेली तात्कालिक घटना एक उदाहरण म्हणून आहे. यात कोणाचीही तक्रार वा कोणावरही राग नाही. तर त्यावर चर्चा अपेक्षित नसून ती व्यापक व्हावी अशी अपेक्षा आहे.
धन्यवाद,
ऋन्मेष Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत. >>>>>>>>>>> दक्षिणा : मला कळलं नाही. ऋन्मेष मुळे हे अस घडतय??? सिरियसली ????????? टेक अ ब्रेक, एव्हडच म्हणेन मी.

काल तू जे ऋन्मेष ला उद्देशून म्हणालीस ते नक्कीच हेटाळणीयुक्त होतं हे माझंही मत आहे. त्याबद्दल जर का त्याने स्वतंत्र धागा काढला तर त्यात काय झालं?

दक्षिणा, जर मी आपल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला असेल तर आपली क्षमा मागतो.
पण तसाही आपण ज्या अर्थाने म्हणालात त्यात आपला हेतू माझ्या ईण्ग्लिशची टिण्गल उडवणे नसले तरी त्या वाक्यप्रचाराचा खोलात जाऊन विचार केला तर असे आढळते की त्याचे मूळ ईंग्लिश भाषा न येण्याच्या टिंगलीतच लपलेय. मी सर्वांना विनंती करतो की ज्याच्याशी आपली मौजमजा चालते अशी व्यक्ती सोडून ईतरांना असे बोलू नका. मला बोलू शकता.

बाकी माझ्यामुळे ईथे चांगले लिहिणारे बंद झाले असे म्हणने म्हणजे आतिफ अस्लम मुळे सोनू निगम गायचा बंद झाला म्हटल्यासारखे होईल Happy
असो, हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे. आपल्याला खरेच तसे वाटत असेल तर आपण तो काढावा. मला आवडेल. मी स्वता तो धागा काढू शकत नाही कारण माझे जमीर मला तशी परवानगी देत नाही. उगाच मानभावीपणाचा आव आणल्यासारखे होईल Happy

शक्यतो अवांतर पोस्ट टाळा. निदान मला तरी या निमित्ताने सुरु झालेल्या चांगल्या विषयावर अवांतर पोस्ट कमी येतील याची काळजी घ्यायला हवी. म्हणून ही माझी ईथली शेवटची अवांतर पोस्ट .

तो मॉलचा मुद्दा पटला. काही हॉटेलमध्येही ईण्ग्लिश स्पिकीण्ग फाडणारे सापडतात. बरेचदा एटीट्यूडही आढळतो. आधी नवा नवा असताना मी दबायचो अश्यांसमोर. आता मात्र नोकरीने, चार पैसे कमावल्याने जो आत्मविश्वास येतो तो आलाय. आता मला तोडकेमोडके ईंग्लिश बोलायलाही लाज नाही वाटत की मराठी-हिंदी या भाषेतही बोलायला कमीपणा नाही वाटत. पण तरी अश्या एखद्या हॉटेलात एखादे साधेसुधे मराठमोळे कुटुंब पार्टीचा मूड ठेवून आले असते आणि त्यांची अवघड स्थिती होते ते बघून वाईट वाटते. आपलेच मराठमोळे आईबाबा असे अडचणीत सापडल्यासारखे वाटते. काही ठिकाणी मात्र हायफंडू जागा असूनही आवर्जून हसून नमस्कार बोलत काऊण्टरवर स्वागत होते आणि हिंदी-मराठी भाषेत स्वागत केले जाते ते बरे वाटते.

इंग्रजी येत नसेल तर खिल्ली उडवली जाते सहसा हे बरोबर आहे
इंग्रजी ही एक भाषा आहे, शिकून घेऊन संभाषण करता येण्या इतक जुजबी प्रभुत्व नक्कीच मिळवता येतं.
प्रयत्न केला तर नक्कीच जमेल.

असुफभाई, काही जणांना मात्र ईंग्रजी संभाषणा शिकण्याची आयुष्यात कधी गरजही पडत नाही. म्हणजे त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता तशी गरज नसते. किंवा आणखी कुठेही नसते. अश्यांनी कोणी आपल्याला कमी लेखू नये यासाठी ती परकीय भाषा का शिकावी?

प्रोब्लेम जर वैयक्तिक असेल तर त्यानुसार येणारे प्रश्न सुध्दा वैयक्तिक असतील. (कृपया वेमांनी लक्षात घेऊन सुट द्यावी Wink )

श्रीयुत ऋन्मेश यांना काही बेसिक वैयक्तिक प्रश्न विचारत आहे आशा आहे की ते त्याची सरळ उत्तरे देतील
१) श्री. ऋन्मेश यांना इंग्रजीचा त्रास आहे हे वरील काही प्रतिक्रियांमधून आणि लेखातून कळले आहे. ते स्वतः दैनंदिनीच्या कामात इंग्रजीचा किती प्रयोग करतात ?
२) श्री ऋन्मेश हे स्वतःची स्वाक्षरी कुठल्या भाषेत करतात? इंग्रजी की मराठी.
३) श्री. ऋन्मेश यांनी त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापिठाचे शिक्षण कोणत्या भाषेत आत्मसात केले आहे?
४) महाविद्यालयात शिक्षण घेताना श्री. ऋन्मेश यांनी वाणिज्य/विज्ञान शाखा निवडली असल्यास शिकवण्याची भाषा आणि परिक्षा देण्याची भाषा ही त्यांची मातृभाषा म्हणजे मराठी होती? नसल्यास अजुन कुठली होती कृपया स्पष्ट करावे.
५) श्री ऋन्मेश हे कार्यालयीन वेळेत सहकर्मचार्‍यांशी संवाद साधताना, पत्रव्यवहार करताना, तक्रार नोंदवताना मराठी भाषा वापरतात का?
६) श्री ऋन्मेश यांनी वरील लेखामधे "फेसबूक" नामक आंतरजालीय स्थळाचा उल्लेख केल्याचे आढळते. तत्सम स्थळावर गेल्यावर इंग्रजीव्यतिरिक्त कोणती दुसरी भाषा वापरत असलेले दिसले नाही. अशा इंग्रजाळलेल्या संकेतस्थळावर वावर करताना श्री. ऋन्मेश मराठी कळफलक वापरून मराठी भाषेत संभाषण आपल्या मित्रांशी करतात? की इंग्रजी भाषेचा मराठीतून वापर करतात?
७) श्री. ऋन्मेश परदेशी गेल्यावर तेथील स्थानिक लोकांशी मराठीतून संवाद साधतात की इंग्रजी सोडून इतर भाषेचा वापर करतात ? (अर्थात त्यांच्याकडे पारपत्र असल्यास)
८) श्री. ऋन्मेश यांना इंग्रजीचा तिटकारा आहे की मराठीचा आग्रह हे कुठल्याही प्रतिसादावरून कळत नाही. कृपया ते स्पष्ट करावे.
९) श्री. ऋन्मेश इंग्रजी चित्रपट पाहताना बाजुला मराठी दुभाषी ठेवतात का? की फक्त भाषांतर केलेले चित्रपट बघतात ?

बाकीचे प्रश्न नंतर.
हे अजिबात वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न नाही पण श्री. ऋन्मेश यांच्या प्रतिसादावरून काही प्रश्न उद्भवले होते. त्यांना होणारा त्रास हा वैयक्तिक स्वरूपाचा असल्याकारणाने फक्त आणि फक्त त्याकरिताच हे वैयक्तीक प्रश्न विचारले गेले आहे. याहून आस्मादिकांचा कोणताही वेगळा दृष्टीकोण नाही.

अंगावर काटा आला....

नाही नाही.. अजुन एक धागा पाहून नाही. लेखकाची कळमळ आणि तळमळ पाहून..
मला ही थोडं मळमळलं..

१) श्री. ऋन्मेश यांना इंग्रजीचा त्रास आहे हे वरील काही प्रतिक्रियांमधून आणि लेखातून कळले आहे. ते स्वतः दैनंदिनीच्या कामात इंग्रजीचा किती प्रयोग करतात ?
>>>>>
बहुतांश लोकांच्या मते मी मायबोलीवरच पडीक असतो. तुम्हीच सांगा मी दिवसभरात किती ईंग्रजी वापरतो Happy

२) श्री ऋन्मेश हे स्वतःची स्वाक्षरी कुठल्या भाषेत करतात? इंग्रजी की मराठी.
>>>
फक्त ईंग्रजी
त्याला कारण म्हणजे मला मराठीत ऋ अजूनही नीट लिहिता येत नाही Happy

३) श्री. ऋन्मेश यांनी त्यांचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापिठाचे शिक्षण कोणत्या भाषेत आत्मसात केले आहे?
>>>>
दहावीपर्यंत ईंग्रजी ईंग्लिशमध्ये, हिण्दी हिंदीमध्ये, संस्कृत संस्कृतमध्ये आणि ईतर सारे विषय मराठीत.
त्यानंतर कॉलेजला ईंग्रजीतून

४) महाविद्यालयात शिक्षण घेताना श्री. ऋन्मेश यांनी वाणिज्य/विज्ञान शाखा निवडली असल्यास शिकवण्याची भाषा आणि परिक्षा देण्याची भाषा ही त्यांची मातृभाषा म्हणजे मराठी होती? नसल्यास अजुन कुठली होती कृपया स्पष्ट करावे.
>>>
वर केले आहे

५) श्री ऋन्मेश हे कार्यालयीन वेळेत सहकर्मचार्‍यांशी संवाद साधताना, पत्रव्यवहार करताना, तक्रार नोंदवताना मराठी भाषा वापरतात का?
>>>>
कार्यालयीन कामकाजाची भाषा ईंग्लिश. अर्ध्या मायबोलीला ठाऊक आहे मी एमेनसीत कामाला आहे.
कामाव्यतीरीक्त एकूण एक गप्पा मराठीत. ज्याला मराठी येत नाही त्याच्याशी हिण्दीत. ज्याला दोन्ही येत नाही त्याच्याशी ईण्ग्रजीत. ज्याला तिन्ही येत नाही त्याच्याशी नजरेने आणि ईशारयांनीच बोलतो. एकदा एका रशियन मुलीचा मार खाता खाता वाचलोय. तो किस्सा वेगळ्या धाग्यात. आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

६) श्री ऋन्मेश यांनी वरील लेखामधे "फेसबूक" नामक आंतरजालीय स्थळाचा उल्लेख केल्याचे आढळते. तत्सम स्थळावर गेल्यावर इंग्रजीव्यतिरिक्त कोणती दुसरी भाषा वापरत असलेले दिसले नाही. अशा इंग्रजाळलेल्या संकेतस्थळावर वावर करताना श्री. ऋन्मेश मराठी कळफलक वापरून मराठी भाषेत संभाषण आपल्या मित्रांशी करतात? की इंग्रजी भाषेचा मराठीतून वापर करतात?
>>>>
काय राव. फेसबूकवर मराठी नसते हा शोध कुठला. फक्त मराठीतच लिहितो.

७) श्री. ऋन्मेश परदेशी गेल्यावर तेथील स्थानिक लोकांशी मराठीतून संवाद साधतात की इंग्रजी सोडून इतर भाषेचा वापर करतात ? (अर्थात त्यांच्याकडे पारपत्र असल्यास)
>>>>>>
मागे एकदा अमन की आशा टीममधून पाकिस्तानला गेलेलो. हिण्दीमध्ये छान गप्पा मारल्या.

८) श्री. ऋन्मेश यांना इंग्रजीचा तिटकारा आहे की मराठीचा आग्रह हे कुठल्याही प्रतिसादावरून कळत नाही. कृपया ते स्पष्ट करावे.
>>>>
ना ईंग्रजीचा तिटकारा ना मराठीचा अहंकार.
भाषा हे केवळ व्यक्त होण्याचे आणि संवाद साधायचे माध्यम आहे. बाकी आईच्या हातच्या जेवणात जे जाणवते ते मातृभाषेत बोलतानाही जाणवते म्हणून मनाच्या कोपरयात मराठीला एक हळवे स्थान असते ईतकेच.

९) श्री. ऋन्मेश इंग्रजी चित्रपट पाहताना बाजुला मराठी दुभाषी ठेवतात का? की फक्त भाषांतर केलेले चित्रपट बघतात ?
>>>>>
ईंग्रजी चित्रपट मुळातच आवडत नाहीत. त्यांच्याशी रिलेट होता येत नाही. पाहिलेच तर अर्थात समजावेत म्हणून डब केलेले अथवा हिंदी सबटायटल्स असलेले पाहतो.

बाकीचे प्रश्न नंतर.
>>>>
वाट पाहतोय Happy

आणि हो, आपल्या पोस्टमध्ये वापरातल्या ईंग्लिश शब्दांनाही आग्रहाने आपण मराठी प्रतिशब्द वापरल्याचे जाणवते. तसे करायची गरज मला वाटत नाही. कारण आठव्या प्रश्नच्या उत्तरात दिले आहेच.

जर का कोणी जुने लिहिते सदस्य इथे न येण्याचं/ न लिहिण्याचं बिल ऋन्मेऽऽषच्या नावाने फाडत असतील तर त्याचा निषेध.
न लिहिण्याचं कारण एकतर ते इतके प्रसिद्ध झाले की माबो वरुन प्रसिद्धी करण्याची गरज राहिली नाही/ कॉपिराईट मुळे माबो गैरसोयीची झाली हे असावं, किंवा त्यांना नवं काही सुचत नाही आणि कारण म्हणून आपले ऋन्मेऽऽष सर.

त.टी. मला ऋन्मेऽऽष सर अत्यंत अनॉइंग वाटतात. आता ते अनॉइंग हा शब्द मराठीत समजावून सांगायला सांगतील. तर ते असो. त्यांचे भारंभार धागे वात आणतात. वेगळ्या धाग्यांवर चांगल्या चाललेल्या चर्चीची राखरांगोळी होते असेही वारंवार वाटते. (स्वाध्यायः वारंवार आ़णि भारंभार असे यमक वापरुन रिकाम्यावेळात कविता करा ) पण म्हणून कोणी इथे येत नसेल आणि खापर ऋन्मेऽऽष सरांवर फोड्त असेल तर ते लोक न आलेलेच बरं असही वाटतं.

पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत. -->
अतिशय फालतू जेनेरलीसेशन...
एवढी काय चीड...
रुंमेश भौ... तूम्ही लिहत राहा... हम पधेंगे आपका धागा और कंमेंट भी कारेनगे... तू मायबोली चा स्वप्निलं खान आहेस...

अमितव, चर्ची!
चर्चेचं स्पेलिंग तरी येतं का तुम्हाला? Light 1

पण म्हणून कोणी इथे येत नसेल आणि खापर ऋन्मेऽऽष सरांवर फोड्त असेल तर ते लोक न आलेलेच बरं असही वाटतं.
>> हे काही पटलं नाही. अशा लोकांमुळे माबो फार पकाऊ आणि दिवसेंदिवस अनइंटरेस्टिंग वाटायला लागली आहे. (हे पर्सनल वाटते का? पण प्रामाणिक आहे. पर्सनल वाटत असल्यास पोस्ट उडवा. )

पकाऊ आणि दिवसेंदिवस अनइंटरेस्टिंग वाटायला लागली आहे. >> अहो मग पकाऊ (नो पन इंटेडेड Proud ) आणि अनइंटरेस्टिंग धागे वर राहू नये आणि चांगलं यावं असं काही करूया की. खडे फोडून, किंवा दुसऱ्याने हे करावे, याने परतोनी यावे म्हणून काय होणार?

मुळात एखादी भाषा व्यक्तिच्या बुद्धिमत्तेच द्योतक कस असु शकते हा एक प्रश्न आहे.. समजा एखाद्या व्यक्तीला एखादी भाषा बोलता येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली तर अशा माणसाला काही बोलण्यात काही अर्थ आहे असे किमान मला तरी वाटत नाही.
राहीला प्रश्न जागतिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या भाषेचा तर इंग्रजीच ती भाषा आहे हे कोण ठरववत? कारण इंग्रजी भाषा तिच्या जन्मापासून विश्व भाषा नाही असू शकत नाही .
प्रत्येक भाषेचे स्वतः चे काही अस्तित्व आहे. पण त्यामुळे दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिला कमी लेखण्याचा हक्क कोणी दिला..?

मुळात एखादी भाषा व्यक्तिच्या बुद्धिमत्तेच द्योतक कस असु शकते हा एक प्रश्न आहे.. समजा एखाद्या व्यक्तीला एखादी भाषा बोलता येत नाही म्हणून त्याची खिल्ली उडवली जाऊ लागली तर अशा माणसाला काही बोलण्यात काही अर्थ आहे असे किमान मला तरी वाटत नाही.
राहीला प्रश्न जागतिक पातळीवर बोलल्या जाणाऱ्या भाषेचा तर इंग्रजीच ती भाषा आहे हे कोण ठरववत? कारण इंग्रजी भाषा तिच्या जन्मापासून विश्व भाषा नाही असू शकत नाही .
प्रत्येक भाषेचे स्वतः चे काही अस्तित्व आहे. पण त्यामुळे दुसऱ्या भाषेत बोलणाऱ्या व्यक्तिला कमी लेखण्याचा हक्क कोणी दिला..?

अहो मग पकाऊ (नो पन इंटेडेड Proud ) आणि अनइंटरेस्टिंग धागे वर राहू नये
>>
बरोबर. ह्या धाग्याचा विषय जिव्हाळ्याचा असल्याने आले. नाहीतर कुठे लिहिलय का रुन्मेश च्या धाग्यावर? ॲसेल तर मलाही आठवत नाही. आणि इतरांनी तक्रार केल्याप्रमाणे तो इतर धाग्यावरही असतो आणि धागे हायजॅक करतो.

कऊ शिकलोय की
नावाजलेल्या विद्यापीठातल्या नावाजलेल्या महाविद्यालयातून ईंजिनीअरींगची पदवी मिळवत एका एमेनसी कंपनीत कामाला लागत गोरया लोकांशी रोज ईंग्लिशमध्येच बोलत आणि ईंग्लिशमध्येच मेल लिहीत काम करतोय हे पुरेसे नाही का?

>>

हा प्रतिसाद वाचून तर मी अवाक झालो. येते की तुला इंग्रजी!
मग कशाला सांगतोस की लोक तुझी इंग्रजी येत नाही म्हणून हेटाळणी करतात?
ते उगाचच वेडा बनून पेढा खातोस की काय?

इंग्रजी येतंय हो तरी त्याला स्पेल्लिंग येत नाही असे कुचकत पणे म्हणतात... आशा केटगोरी च्या लोकांचे प्रोब्लेम शेर करतोय तो.

>>बाकी माझ्यामुळे ईथे चांगले लिहिणारे बंद झाले असे म्हणने म्हणजे आतिफ अस्लम मुळे सोनू निगम गायचा बंद झाला म्हटल्यासारखे होईल Happy<<
Happy

बाकी प्रतिक्रिया वाचल्या नाहीत//// तितका वेळ्नाहीये
>>>>असो, मूळ प्रश्न हा आहे की या देशात ईंग्रजी भाषा न येणारयांची खिल्ली का उडवली जाते? <<<
याचा अर्थ इतकाच, की अजुनतरी सूप्तरित्या, आपले मनात, देशी भाषांविषयी, खास करुन संस्कृत सारख्या कठीण भाषेविषयी आदर आहे..... एकवेळ संस्कृत कठीण आहे म्हणून आली नाही तर समजु शकते, पण इंग्रजीसारखी तद्दन किरकोळ भाषाही येत नाही? Proud असा काही एक आव इंग्रजी देखिल येत नाही याबद्दल खिल्ली उडविणार्‍यांचा असु शकतो.
संस्कृतचे उदाहरण बोचत असले, तर दुसरे उदाहरण घेऊ, जसे की तुम्हाला ओरॅकल्/एक्युएल्/जावा/सी++ वगैरे भाषा येत नाहीत तर कुणी तुमची खिल्ली उडविणार नाही..... पण इंग्लिश सारखी एकदम साधी भाषा येत नाही म्हणल्यावर खिल्ली उडवित असतील...! Wink
हे माझे वैयक्तिक मत आहे. Happy

पण तुझ्यामुळे अनेक चांगले लिहिते लोक इथे येणं आता टाळू लागले आहेत.>>>>>> ऑ? काहीही. Lol
कुणाची म्हस कुणाला ऊठबस हे इथे चालेल का? Lol

कालपरवापर्यंत जुने हुशार लोक इथे न येण्याचं कारण टिपापा होतं. एकट्या ऋन्मेष मधे एका टिपापाचं बळ आहे.

आणि धागे अ‍ॅनॉइंग , इरिटेटींग असतात तर कुणी हाताला धरुन धागा उघडुन वाचा म्हणत नाहीये ना. स्पष्ट पणे दिसतंय अमुक अमुक पकाव विषय आणि त्यापुढे तोच तो अ‍ॅनॉइंग लेखक आहे हे दिसलं की सरळ स्क्रोल करायचं आणि आपलं ज्ञानवर्धन होईल असे धागे वाचायचे.
आणि स्वतः पण काही बाही दर्जात्मक लिहायचं जेणेकरुन आमच्याही ज्ञानात भर पडेल.

तो सरदारजीचा एक जोक आहे ना.
रस्त्यात केळीचं साल बघुन सरदारजी म्हणतो " ओ त्तेरी! साला आज भी गिरना पडेगा!"

तसच ऋन्मेषचा धागा पाहून " ओ त्तेरी! आज भी पढके मनस्ताप करना पडेगा!" का करता?

एकट्या ऋन्मेष मधे एका टिपापाचं बळ आहे.
....,......... फिलिंग बाहुबली ..... सुपर्रस्टार प्रभास Wink

असो,
राहुल, अहो ते बेसिक आहे. जर मी माझी ईंजिनीअरींग पुर्ण केली आहे आणि ती देखील ओल सेमीस्टर फर्स्टक्लास विदाउट केटी तर नक्कीच मी पेपर आणि वायवा ईंग्लिशमधूनच दिले असणार. तर टेक्निकल बाबीत गरजेपुरते ईण्ग्रजी लिहूही शकतो आणि बोलूही शकतो. प्रॉब्लेम ईतर गप्पांचा आणि ईंग्लिशच्या फ्लुएन्सीचा असतो. नॉनटेक्निकल ईंग्लिश शब्दकोष तोकडा आहे. ईंग्लिश पिक्चर समजत नाही, ईंग्लिश आर्टीकल भरभर वाचून डोक्यात घुसत नाहीत. वगैरे वगैरे..

Pages