ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या तिथे जॉबवर आहेत त्यांचे काय ? ऑन साईट आणि मूळ अमेरिक कंपन्या यातल्या पॉलिसीत काही फरक राहील काय ?

Basically अमेरिकेने वरवर कितीही आव आणला तरी बाहेरच्या देशातले मजूर(गुलाम) उपलब्ध नसतील तर ह्यांची अर्थव्यवस्था चालेल असं वाटतं नाही. >> या वाक्याचा निषेध पिरियड.

ट्रिपल ए, नवीन नियम जेव्हा जाहिर होतील आणि त्यात जर पगाराच्या, एच १ बी करता एलिजिबिलिटीच्या रिक्वायरमेंट बदललेल्या असतील तर मग सध्या जॉब वर असलेल्या लोकांच्या एच १ बी रिन्युअलच्या वेळी ते नवीन नियम लागू पडतील (असा माझा अंदाज आहे). मग त्यावेळी एक तर पगार वाढवून द्यावा लागेल आणि नवीन काय ते कागदपत्र, प्रोसेसेस आहेत त्या पार पाडाव्या लागतील. ह्या दोन्हींची तयारी नसेल कंपनीची तर कदाचित नोकरीला धोका असू शकतो. शेवटी सगळी मदार कंपनीला तुमची वॅल्यु किती वाटते आणि तुमच्या करता, तुमच्या पोजिशन करता ते किती अ‍ॅडजस्टमेंट करु शकतात ह्यावर असते. वर्षाला ३-४ हजार डॉ इकडे तिकडे कदाचित ते करु शकतात, कोणाकरता जास्तही करु शकतील पण एकदा त्यांच्या टॉलरन्सच्या बाहेर जायला लागलं की मग त्यांचाही नाईलाज असतो.

सोहा, तुम्ही बातम्या वाचत असाल तर तुमच्या लक्षात येइल की, ह्या संदर्भात वर्स्ट ऑफेंडर्स आपल्या देसी कंपन्याच आहेत. काही अमेरिकन कंपन्यांनी पण हे केलय पण सगळ्यात जास्त गैरवापर हा भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आणि अमेरिकेतल्या छोट्या देसी कन्सल्टिंग/बॉडी शॉपर टाईप कंपन्यांनी.

ह्या संदर्भात वर्स्ट ऑफेंडर्स आपल्या देसी कंपन्याच आहेत. काही अमेरिकन कंपन्यांनी पण हे केलय पण सगळ्यात जास्त गैरवापर हा भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आणि अमेरिकेतल्या छोट्या देसी कन्सल्टिंग/बॉडी शॉपर टाईप कंपन्यांनी. >> मी देशी कंपन्यांची बाजू अजिबात घेत नाहीये. पण २००८-२००९ मधे h1b वर निर्बंध आले आणि देशी कंपन्यांनी (काही अमेरिकन कंपन्यांनी सुद्धा ) त्यातून पळवाटा काढल्या. तसंच आता परत घडू शकतं.

बाजू घेत नाही आहात ते लक्षात आलं पण तुम्ही गुलाम लिहिलं त्या वाक्यावरुन असं वाटतं की अमेरिका इथे बाहेरुन लोकं आणून त्यांच्या कडून गुलामगिरी करुन घेते. तसं नाहीये आणि नेमके कोण वर्स्ट ऑफेंडर्स आहेत तर आपलेच लोकं असं म्हणत होतो.

फार काही इंपॅक्ट होणार नाही. मूळात बर्याच कंपन्या ट्रंप विरोधी आहेत आणि त्यानी अधिकाधिक इमिग्रंट्स ना जॉब्ज द्यायचे ठरवले आहे. लॉटरी सिस्टिम मूळे असलेला इंपॅक्ट लवकरच जाईल अशी चिन्हे दिसत आहेत. ग्रीन कार्डासाठी १०-१५ वर्षे वाट बघण्याची क्षमता आपल्यात नक्कीच आहे.
मूळ प्रश्न आहे, कुठले जॉब्ज रहातील. याचे नक्की उत्तर माहीत नसले तरी अंदाज मात्र लावता येइल.

IT - Mobile Design and Development, Cloud design and development, Information Security, Project anagement, Data Scientists, Automation & AI ( Machine Learning) Design ( not programming). Companies will still outsource ( or use outsourcers) for a lot of trivial development and testing but the jobs will not remain in the U.S.

Non-IT - Physiotherapists, Supply Chain specialists ( Mechanical/Industrial), Operational Research Analysts.

सत्या नाडेला म्हणतो त्याप्रमाणे " Don't be Know it All! Be Learn it All!" थोडक्यात अ‍ॅडॅप्ट करत रहाणे. एक-दोन वर्षांचे धोरण ठरवून येइल त्या परिस्थिती नुसार धोरण बदलत रहाणे गरजेचे राहील.

शिक्षण कधीच वाया जात नाही. Happy

मूळात बर्याच कंपन्या ट्रंप विरोधी आहेत आणि त्यानी अधिकाधिक इमिग्रंट्स ना जॉब्ज द्यायचे ठरवले आहे. लॉटरी सिस्टिम मूळे असलेला इंपॅक्ट लवकरच जाईल अशी चिन्हे दिसत आहेत.>>>>> Lol हे फारच रोझी आउटलूक आहे आणि खुपच आनंद होईल असं झालं तर. मायक्रोसॉफ्ट, गूगल, फेसबूक ह्यांच्या कडे खुप पैसा आहे. इतर कंपन्यांची तेवढी तयारी असेल असं नाही. शिक्षण वाया जात नाही हे खरं आहेच पण आपण जे शिकतोय त्या स्किलला पुढे नक्की किती डिमांड आहे हे नक्कीच नीट प्रॅ़क्टिकली बघितलं पाहिजे.
पुर्वी सुद्धा नॉन आयटी सेक्टर मध्ये एच १ म्हणलं की बर्‍याच कंपन्या नाक मुरडायच्या, आता तर ह्या सगळ्या वाढलेल्या अवेअर्नेस आणि प्रो अमेरिकन स्टान्स मुळे आणखिन जड जाणार आहे.

इथे खरेच काही खास शिकण्यासाठी यायचे असेल तर जरुर विचार करावा. मात्र अमेरिकेत नोकरी मिळणे शक्य होईलच असे नाही. इथे येण्यापूर्वी भारतात काय स्वरुपाचा कामाचा अनुभव आहे, इथे कशाप्रकारचे शिक्षण/रिसर्च आणि पास होतानाची इकॉनॉमी/विसा परीस्थिती यावर बरेच काही अवलंबून आहे. इथे चांगल्या युनिवर्सिटीत शिक्षण घेतले. कंपनीने ऑफर देखील दिली मात्र नंतर त्या सेक्टर पुरती इकॉनॉमी वाईट म्हणून कंपनीने लेऑफ दिले आणि विसाचे नियम आहेत म्हणून तुमची ऑफर कंपनीला नाईलाजाने रद्द करायला लागली अशा केसेस बघितल्यात.
इथल्या युनिवर्सिटीत शिक्षण घेवून ग्लोबलची तयारी आहे का? अमेरीकन युनिवर्सिटीकडून स्कॉलरशिप आहे, ग्लोबलची तयारी आहे तर इथे शिकायला जरुर यावे. तुम्ही इथल्या कंपनीला फायद्याचे असाल तर ते बाहेर पोस्टिंग, मग इथे ट्रान्सफर वगैरे बरीच धडपड करतात.

खरे तर स्टेम आणि अकाउंटिंग साठी उच्चशिक्षितांचा तुटवडा आहे. मात्र २०,००० विसा मास्टर्स वाल्यांना आहेत. साध्या गटात एचवन बी चे लॉटरीप्रकरण , त्यातले विसा गठ्ठ्याने आउटसोर्सिंग कंपनीला जातात. इथल्या युनिवर्सिटीतून शिक्षण घेवून बाहेर पडणार्‍या परदेशी विद्यार्थ्यांना एचवन बी प्राधान्य असे काहीतरी प्लॅन आहेत. तसे केल्यास स्टुडंट विसावर येणार्‍यांना इथे नोकरीसाठी बरे पडेल. अजून एक म्हणजे इथे कायमचे रहायचे तर ग्रीनकार्डासाठी भारताचा कोटा आणि दरवर्षी येणारे अर्ज बघता इबीट२ ला सध्या २००८ आणि इबी३ला २००५ तारीख सुरु आहे. या वरुन २०१७-१८ अर्ज केल्यास किती वेळ लागेल त्याचा विचार करावा.

L1 वापरून inter company transfer चा पर्याय खुला असताना भारतीय आयटी कंपन्यांना bulk H1b application ची गरज नेमकी का पडते?

२०,००० विसा मास्टर्स वाल्यांना आहेत. साध्या गटात एचवन बी चे लॉटरीप्रकरण , त्यातले विसा गठ्ठ्याने आउटसोर्सिंग कंपनीला जातात.
>>.

आता मास्टर्स केलेल्यांनासुद्धा विसा लॉटरीतून लागतोच असे नाही. २०,००० पेक्षा बरेच जास्त मास्टर्स होतात फक्त भारतातूनच आलेले. त्यामुळे त्या लॉटरीतून नाही झाले, पुढल्या ओपन लॉटरीत पण नाही लागले असे अनेक जण आहेत. तेव्हा खर्च करून इथे फक्त अमेरिकेत स्थायिक व्हायचे म्हणुन मास्टर्स करणार असाल तर ग्यारंटी नाही हे लक्षात घ्या.
उत्तम शिक्षण घ्यायचे आहे म्हणुन यायचे असेल तर नक्कीच यावे.

एल १ला लिमिट नसतं का? की अमेरिकेतील हापिसात अमेरिकेत रहाणारे (नागरिक, जीसी, इएडी ) इतके इतके लोक पाहिजेत? तर एल-१ मिळेल.

हायझेनबर्ग एल१ वर लोकं येतात ती त्या कंपनीत काम करतात. भारतीय आयटी कंपन्या इथे लोकं आणतात ती गरजेनुसार दुसर्‍या कंपनीत प्रोजेक्टवर काम करतात. ती एल१ च्या नियमात नाही बसत. तरीही वरच्या पोस्टवरचे एक्झिक्युटिव असतात ना एल१ वर आलेले.

एल१ मध्ये दोन भाग आहेत. एल१ ए आणि एल१ बी. त्यातले बहुतेक एल१बी दुसर्‍या क्लायंटच्या लोकेशनवर काम करू शकतात.

एट एनी गीवन टाइम अमेरिकेत एच १ बी व्हिसा वर असणाऱ्यांची संख्या जवळपास ६५०,००० ते ८००,००० आहे असा सर्वसाधारण अंदाज आहे, आकडा कमी जास्त असू शकतो आणिदर वर्षी यात भर पडत असते,
या सगळ्यातून अमेरिकन सरकार ला भरपूर महसूल मिळतो
वकील कंपन्या ज्या लोकांना आणि एम्प्लॉयर ना भरपूर पैसे घेऊन व्हिसा फाईल करायला मदत करतात त्यांचा ही हे सर्व "आहे तसे" सुरु राहण्यात फायदा च आहे

विद्यार्थी म्हणून येणारे वेगळे, ते बऱ्याच वेळा भरमसाठ आउट ऑफ स्टेट फिया भरतात
त्यामुळे विद्यापीठांना होणार आर्थिक फायदा वेगळा

एकूण हा पैशाचा खेळ आहे त्यामुळे हे सर्व पूर्ण बंद होणं शक्य वाटत नाही

पॉलीसीज मध्ये थोडे फार बदल होतील आणि एकूण बाहेरून येणार्यांना अनुकूल असे बदल कदाचित नजीकच्या भविष्यात होणार नाहीत.

पण या सगळ्याचा आर्थिक फायदा मिळणारे सहजासहजी हे बंद होऊ देणार नाहीत.

एकूण Status Quo जे आहे ते सुरु राहील

असुफशी फंडामेंटली सहमत. पण सध्याच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशनचं काही सांगता येत नाही. एल.ए. म्युन्सिपालटीचं/ तेथील बिझनेसचं पर्यटक कमी येत आहेत त्यामुळे उत्पन्न फ्यु टेन्स ऑफ पर्सेन्टेज कमी झालं/ का होईल अशी बातमी वाचलेली.

फार काही इंपॅक्ट होणार नाही.
अनेक कारणांमुळे सहमत.
१. जरी कोडींग नि टेस्टिंग एव्हढेच करत असले तरी त्याचीहि बर्‍याच मोठ्या प्रमाणात जरुरी असते नि तेव्हढे लोकच अमेरिकेत नाहीत.
२. तसेच शास्त्रीय, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण मिळवलेले लोक जे की नासा इ. ठिकाणी लागतात, तिथेहि अमेरिकन संख्येने कमी पडतात.

केवळ दाखवण्यापुरते काही लोक काही काळ कमी करतील, नंतर पुनः ये रे माझ्या मागल्या!

(इथले लिखाण संपादित केले आहे, जरा विषयाला सोडून नि व्यवस्थित मुद्देसूद लिहीले नव्हते)
तेंव्हा तुमचे सर्वांचे चालू द्या.

त्रिविक्रमा, दुसरे वाक्य उपहासात्मक आहे . त्याचा अर्थ पहिल्यासारखाच होतो.म्हणजे एकपेही आहेत ते.

धन्यवाद वैद्य.
आमची अदचण अशी आहे की campus मधे फारशा companies आल्याच नाहीत. throught distinction असुनही फारशा opportunities नाहीत. ओळखीतुन काही ठिकाणी jobs मिळातील ,पण त्यात नक्की काय शिकायला मिळेल ते माहीत नाही.
त्यपेक्शा अमेरिकेत येउन बर्‍या university मधे उच्च शिक्शण घेणे हा पर्याय जास्त आश्वासक आहे.

माझे चुकले - उपहास, विडंबन, अतिशयोक्ति या गोष्टींना आता मायबोलीवर बंदी आहे. इथल्या बर्‍याच लोकांना समजत नाही व आवडतहि नाही. त्यांच्या भावना दुखावतात, मी आता मायबोलीवर येणारच नाही असे लिहायला लागतात, मग त्यांना दोनशे प्रतिसाद मिळतात त्यांची समजूत घालायला.

तसेच विषय भरकटवणे हे हि मायबोलीवर काही लोकांना पसंत नाही - ते त्यांना बेकायदेशीर वाटते. कधी कधी वेडेपणाचे वाटते, अक्कल कमी असल्याचे लक्षण वाटते. आणि तसे ते स्पष्ट बोलून दाखवतात.

आता इतर कायद्यांबाबत जसे, की पाळणारे, घाबरणारे कसोशीने पाळतात पण न पाळणारे बेधडक पणे कायदे मोडतात, तसेच इथेहि चालू आहे -
अशी ही आजकालची मायबोली!

पण मी आता माझी दोन्ही पोस्ट भरपूर संपादित करून वरील कुठलाहि कायदा मोडणार नाही. निदान तसा प्रयत्न करीन.

arc,
अमेरीकेतील युनिवर्सिटीत प्रवेशासाठी प्रयत्न करताना एकीकडे भारतात नोकरी सुरु करावी. इथे शिक्षण संपवून पुन्हा जॉब शोधताना नोकरीचा अनुभव हा प्रश्न उभा रहातो तेव्हा त्याचा उपयोग होईल. अमेरीकेत जॉब/इंटर्नशिपसाठी तुम्ही शिकत आहात त्या पेक्षा वेगळ्या क्षेत्रातला अनुभव - जो सॉफ्ट स्किल्स म्हणून दाखवता येइल - असा असला तरी ती एक जमेची बाजू असेल. इथे माझ्या मुलाच्या मित्रमैत्रीणीच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने बघायला मिळाली. जीपीए उत्तम असूनही इतर काही एक्स्ट्राकरीक्युलर/पार्ट टाईम-समर नोकरी/ सर्विस प्रोजेक्ट नाही म्हणून इंटर्नशिप आणि पर्यायाने नोकरी मिळायला बर्‍याच अडचणी आल्या. ही परीस्थिती चांगल्या अंडरग्रॅड इंजिनिअरिंग प्रोग्रॅममधील अमेरीकन मुलांची. अजून एक म्हणजे डोमेस्टिकच्या बरोबरीने ग्लोबल संधी सहजतेने घेणारी अमेरीकन मुलं! मिडवेस्टमधली मुलं सहा महिने युरोप-चायनाला जाणे तसे कॉमन आहे पण आता मी इंटर्नशिप साठी पुण्याला/बेंगलुरला /हैदराबादला होतो. स्टेटभर फिरलो. नेस्ट टाईम जाईन तेव्हा तुमच्या कझिनचा कॉन्टॅक्ट द्या असे सांगणार्‍यांचे प्रमाणही वाढतेय.
इथे अ‍ॅडमिशन मिळाली पण विसा रिजेक्ट हा प्रकारही बरेचदा होतो. त्यामुळे इतर पर्यायांसाठी देखील तयारी ठेवावी. माझ्या कझिनच्या बाबतीत असे झाले. त्याने शेवटी युकेत अ‍ॅडमिशन घेतली.

>>>जो सॉफ्ट स्किल्स म्हणून दाखवता येइल - असा असला तरी ती एक जमेची बाजू असेल. इथे माझ्या मुलाच्या मित्रमैत्रीणीच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने बघायला मिळाली. +१
अगदी बरोबर आहे हे. अमेरिकन कॉलेजेस सुद्धा या सगळ्या गोष्टींना महत्व देतात. त्यामुळे हे मुद्दे इथून तिथे जाताना पण लागू आहेत.
भारतात शिक्षणाच्या मधेच अशी इंटर्नशिप वगैरे करणे अवघड असते. ताशा संधी अगदी आयआयटी मधल्या विद्यार्थ्यांनाच मिळतात.
पण अमेरिकेत सुट्टीत इंटर्नशिप करणे हे अगदी कॉमन आहे.

त्यामुळे नोकरी करून मग एम एस ला अप्लाय केले तर ऍडमिशन आणि नंतर नोकरी मिळण्यासाठी जास्त चांगले.

भारतात का हो नाही असे भले मोठे जागतिक उद्योग तयार होत की जेणेकरून भारतीयांना भारतातच नोकर्‍या मिळतील, अमेरिकेकडे बघावे लागणार नाही. अमेरिकनांनी व्हिसा द्यायची वाट पहावी लागणार नाही, उलट अमेरिकनच विनंति करून, आग्रहाने मानाने बोलावतील.

म्हणजे मग अमेरिकेत नोकर्‍या नाही मिळाल्या तर भारतीय लोकांचे काय होईल, भारतीय उद्योगांचे काय होईल, असले प्रश्न पडणार नाहीत?

भारतात सध्या तरी वार्षिक ८-९ लाखाच्या दर्म्यानच वार्षिक पॅकेज एन्ट्री लेव्हल ला मिळते. त्याचीही गॅरन्टी नाही. म्हणून पीजी साठी यू एस ला जाऊन तिथेच राहण्याची प्रथा चालू झाली आहे. नव्या धोरणानुसार काहीना परत यावे लागविशेश्ट? विशेष्तः मागची ४-५ वर्षातील लोकाना?

भारतात का हो नाही असे भले मोठे जागतिक उद्योग तयार होत की जेणेकरून भारतीयांना भारतातच नोकर्‍या मिळतील,

>> तेच ते भारतीय कोडिंग आणि टेस्टिंग मध्येच अडकून पडले आहेत ते. त्यावर रिया काहीतरी थुत्तरफोड जबाब देणार होती म्हणे ....

Pages