गुलमोहर

Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 May, 2017 - 08:28

रानात आता चिटपाखरुही नाही
जलाशयाचे आकसले पाय
वाऱ्याने थांबविली शीळ
उन्हाने ओकले आगीचे नळे
आसमंती गिळले ढग काळे
भूमीचे काळीज जळे
अस्तित्व जाळणारे सगळे
पण …
जगण्याचा सोहळा असा सजला
ग्रीष्मातही गुलमोहर बहरला
तांबडा गुलाल आसमंती ऊधळला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान.....

Chan