Submitted by विशाल कुलकर्णी on 4 May, 2017 - 03:19
रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल काय काही ?
पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल काय काही ?
सगळे खरेच आहे खोटे न येथ कोणी,
रचल्या चितेस सांगा बोलाल काय काही ?
'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला
ऐन्यास बोल थोडा लावाल काय काही ?
झोळी गळ्यात बांधुन दारात वाट पाहे
पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल काय काही ?
पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली
पाण्यास मार्ग आता दावाल काय काही ?
येतील दिवस तेही नांदू पुन्हा सुखाने
आशा चुकार वेडी रुजवाल काय काही ?
© विशाल कुलकर्णी
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डीपीत लावताती तस्वीर चेहर्
डीपीत लावताती तस्वीर चेहर्याची
पण शूज लावले का सांगाल काय काही ?
चरणस्पर्श
विश्ल्या, 'झोळी गळ्यात बांधुन
विश्ल्या, 'झोळी गळ्यात बांधुन' मिटर मधे बसव ही ओळ , बाकी मस्त (पर्यायी शब्द शोध)
बांधे गळ्यात झोळी, दारात वाट
बांधे गळ्यात झोळी, दारात वाट पाहे (असं काहीतरी)
धन्यवाद ! वैभव, पुढच्या वेळी
धन्यवाद ! वैभव, पुढच्या वेळी नक्की रे
खूप छान विशाल सर...
खूप छान विशाल सर...
आपली नवीन कथा कधी येणार... बिलंदर फार आवडली होती...
खूप छान !!
खूप छान !!
दादया गझल आवडलेली आहे. (आणि
दादया गझल आवडलेली आहे. (आणि कळली पण आहे :फिदी:)
आवडली
आवडली
छान! ___/\___.
छान! ___/\___.
धन्यवाद
धन्यवाद