पुनवेची रात

Submitted by vijaya kelkar on 30 April, 2017 - 10:22

पुनवेची रात

चमचम चांदणी रात
पुनवेचा पूर्ण चांद
दुधाळ करी बरसात
पूर्वेचा वारा मंद

सागरतीरी शुभ्र रेत
विसावे नावांची रांग
फेसाळ जल बरसात
विरावे लाटेनं मग

दौड वाऱ्याची झाली शांत
निरव शांततेस माज
वेताळ भय बरसात
निर्भय लहरी गाज

यावरी कोण करी मात
साम्राज्य धुक्याचे दाट
पिसाळ थंडी बरसात
साधली दवास वाट

विजया केळकर ____

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults