बेभान हा वारा

Submitted by राजेंद्र देवी on 26 April, 2017 - 23:56

बेभान हा वारा

खूप काहीललेला जीव
आता येतील अमृतधारा
मृदगंध पिऊन होईल
बेभान हा वारा

तृप्त होईल धरती
निसर्ग होईल सचेतन
काळ्या मेघात चमकेल
दिसेल विद्युल्लता शोभून

नवचैतन्याची येईल लहर
निसर्गात फ़ुलेल बहर
पागोळ्यांतून कोसळतील
टप टप जलधारा
मृदगंध पिऊन होईल
बेभान हा वारा, बेभान हा वारा

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users