प्रिय

Submitted by वृन्दा१ on 25 April, 2017 - 12:29

असंबद्ध स्वप्नांच्या पुसट आठवणींसारखे
हे जवळून वाहात जाणारे बिनचेहऱ्याचे दिवस
आणि गाडीत अचानक झोप लागून
आपलं स्टेशन मागेच निघून गेल्यानंतरचा
पोटातला खोल खड्डा
प्रिय, खरं काय असतं आणि खोटं कशाला म्हणायचं
हे विचारायलाही तू भेटत नाहीयेस आजकाल.....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर!

थोडक्यात पण अगदी मार्मिक
फारच छान
ही तुमची कविता क्लाइमैक्स ठरते अनेकदा अश्या नाजुक विश्वात आणि सुरुवात बहुतांश ही अशी होते https://www.maayboli.com/node/64111