शब्द-चित्र : जिवलगा राहिले रे दूर घर माझे

Submitted by पशुपत on 25 April, 2017 - 05:52

जिवलगा राहिले रे दूर घर माझे
हे गाणे लहान पणापासून मनावर खोल प्रतिमा सोडून गेले आहे. जसे संगीत शिकत गेलो आणि काव्य आवडू लागले तशी ही प्रतिमा आणखीन अमूर्ततेकडे परावर्तित झाली.
-----------------------------------------------------------------------------------------------
दूर , धूसर होत गेलेल्या क्षितिजावरून येणार्या षड्जाने भरून राहिलेल्या आसमंतात जिवलगाच्या स्मरणाचे आर्त तरंग उमटवणारा कोमल ॠषभ ..
मनातील प्रतिमेतल्या घराचे दू ssssss र पण कोमल धैवताच्या श्रुतीप्रमाणे व्याकूळ करणारं
थकलेल्या पावलांच्या वेदनेचा तीव्र मध्यम.. आणि माथ्यावरच्या गंधाराचं ओझं .. सारच दु:सह !
या किर्र आणि घनदाट , कोरड्या स्वरांच्या बंद दरवाज्याच्या आत विराजमान असलेल्या , शांत - अथांग , माउलीस्वरूप षड्ज - पंचमाची त्रुष्णा आहे ... त्यातच विलीन होण्यासाठी माझा हा प्रवास !

Group content visibility: 
Public - accessible to all site users