Submitted by दिपक ०५ on 22 April, 2017 - 09:35
तू नाहीस जवळ माझ्या,
पण तूझ्या आठवणी येतात भेटायला..
शक्य नाही तुला मिळवण,
मन तयार नाही स्वीकारायला..
आठवतात तूझे बोल,
ती स्वप्नाची दूनीया..
कळलं नव्हत तेंव्हा,
भास आहे वेडया मनाचा..
तुझ्या स्वप्नांनी रोज,
छळलं आहे मला..
स्वप्ने दाखवली आकाशाची,
आता जमिनीवर टाकलं आहे मला..
मोडली आहेत स्वप्ने माझी,
आता कशाची भीती नाही..
भोग आता संपले माझे,
दैव माझे माझ्या हाती..
इच्छा आता एवढीच कि,
कळावी माझी प्रित तुला..
परत नाही भेटणार हा वेड़ा,
कळेल ना गं, प्रिये तूला..
कळेल ना गं, प्रिये तुला.....
- शब्दवेडा दिपक लोखंडे....
Read My Blog At
https://manmajhesairat.wordpress.com/
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सोप्या शब्दांत खुप छान भावना
सोप्या शब्दांत खुप छान भावना मांडल्यात.
धन्यवाद राहुल..
धन्यवाद राहुल..