मराठी चित्रपट सुचवा ...

Submitted by शुभंकरोती on 20 April, 2017 - 05:58

नमस्कार मंडळी,
उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे शाळेच्या सुट्ट्या, भरपूर मस्ती आणि वाट्टेल तेवढ्या उनाडक्या हे सोपं गणित. पण त्यात सुल्तान ह्या चित्रपटाच्या गाण्याच्या चालीत "ऊपर सूरज, नीचे डामर, बीच में मई और जून ... हे भगवान !!! " अशी परिस्थिती झालीये.

अशात वेळ पण जाईल आणि उन्हाळ्यात तब्येत पण बरी राहील यासाठी घरात बसून युट्यूब चा उपयोग जुने मराठी चित्रपट बघण्यासाठी करायचा मानस आहे ...

सुज्ञांस सागणे नलगे ... ऐतिहासिक व्यक्तींवर बनलेल्या मराठी चित्रपटांची माहिती हवी आहे. आणी त्यात थोडा पेच असा की फक्त नाव न सांगता, तो चित्रपट कशासाठी बघावा हे पण सांगावे.

फक्त ऐतिहासिकच का? >>> बाकी पण चालतील ... सजेशन वेल टेकन ... धन्यवाद दक्षिणा !!!

आता पर्यन्त आलेले चित्रपट:
- Dr. Babasaheb Ambedkar
- लोकमान्य: एक युग पुरुष
- ध्यासपर्व
- मराठा तितुका मेळवावा
- सामना
- उंबरठा
- गनिमी कावा
- रामशास्त्री
- अशी ही बनवा बनवी
- एक होता विदूषक
- वज़ीर
- एलिझाबेथ एकादशी
- अवताराची गोष्ट
- दहावी फ
- गोष्ट मोठी डोंगराएवढी
- प्रभात सिनेमा (सर्व चित्रपट)
- पारध

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

डॉ जब्बार पटेल चा आंबेडकरां वरचा चित्रपट >>> बेसिक कार्य कळेल.
अगदी अलिकडचा सुबोध भावे चा टिळकां वरचा चित्रपट >>> इतिहासाची रीव्हीजन होईल.
मला वाटत्,,कर्वे वरचा पण एक चित्रपट आहे,,मला नाव आठवत नाहीत आता.बहुधा अमोल पालेकर दिगदर्शित आहे. >>> ह्यांच कुंटुंबनियोजन ची साधन वापरण्याचे महत्त्व परत एकदा कळुन चुकेल.
सह्या एवढेच सुचत आहेत.

सुरुवात ऐतिहासिक चित्रपटापासूनच करायची तर "मराठा तितुका मेळवावा" .... पासून करा...

फक्त ऐतिहासिकच का? Uhoh
बाकी पण बर्‍या विषयावरचे सिनेमे आहेत की.
फक्त ऐतिहासिक म्हटलं की मर्यादा येतील पाहण्यावर आणि सुचवण्यावर
शिवाय त्याच त्याच पठडीतले पाहून बोर ही होइल.

सामना - इकॉनॉमीक व पोलिटीकल रिफ्लेक्शन, सगळ्यांचा मस्त अभीनय
उंबरठा - स्त्री ने घरा बाहेर पडुन स्व ताची आयडेंटिटी बनवायचा प्रयत्न...
गनिमी कावा - खुप जुना आहे पण त्या काळच्या मानाने काही अ‍ॅक्शन सिन्स आवडले...

रामशास्त्री - प्रभात सिनेमा. राज्य कर्त्यालाही शिक्षा सुनवणारा न्यायप्रिय न्यायाधीश. शाळेत असल्यापासून रामशास्त्रीं बद्दल प्रचंड आदर असल्याने हा चित्रपट खुप आवडला. जरूर पहावा.

Ashi hee banavabanavi ( karan kaay te sangayala nako)

Ek hota vidushak ( pu la chee bandhesud katha)

Vajir ( sundar mandani apratim abhinay)

Gost mothee dongara evedhee ( uttam kathanak ani shetakaryanchya atmahatyecha jwalant vishay)

प्रभात चे सगळे चित्रपट
लक्ष्मिकांत बेर्दे , महेश कोथारे, अशोक सराफ आनि सचिन चे चित्रपट
नुतन चा पारध हा चित्रपट

होऊ दे जरासा उशीर - आयुष्याकडे परत एकदा प्रेम करायला शिकवणारा, खूप मनोरंजक चित्रपट

एक डाव भुताचा - अशोक सराफसाठी.
दादा कोंडकेंचे एकटा जीव सदाशिव आणि आंधळा मारतो डोळा.
मला झुंज पण आवडतो.
तमाशापटही.गाण्यांसाठी. पिंजरा, सुगंधी कट्टा, मल्हारी मार्तंड, केला इशारा जाता जाता.

भालजींचे जुने चित्रपट परत परत पाहता येतात.

बाकी सामना, इ.बद्दल लिहायला हवं का?

मराठीत हॉररपट खूप कमी आहेत. हऱ्या नाऱ्या झिंदाबाद हा एक.

बाळा गाऊ कशी अंगाई हापण हॉररपट वाटून घेता येऊ शकतो.

रीमा लागू, अशोक सराफ आणि निर्मिती सावन्त चा शुभमंगल सावधान लिहिलाय का कोणी ? तो पण एक भन्नाट चित्रपट आहे .

माझा पति करोड्पति
मोहित्यान्ची मंजुळा
थोरातांची कमळा
बहिर्जी नाईक
( खरतरं , चन्द्रकांत , सूर्यकांत , शिवाजी - हे कॉम्बिनेशनच मला फार आवडतं)
सर्जा
मराठीत हॉररपट खूप कमी आहेत. >>>>> तो अजिंक्य देव आणि अर्चना जोगळेकरचा कुठला ?? अर्धांगी का? ( वसुधा ... ए वसुधा )

वसुधा ... ए वसुधा )>>>>>>>> वसुधा नाही ते शुभदा ये असं आहे. लहान असताना पाहिलेला हा सिनेमा. पण हा शॉट अजुनही आठ्वणीत आहे.

पाठलाग सिनेमा का? पण त्यात अजिंक्य देव नव्हता बहुधा.

आम्ही जातो आमच्या गावा
गम्मत जम्मत
माझा पती करोडपती
धुमधडाका
खट्याळ सासू नाठाळ सून

ऐतिहासिक नाहीत हे सिनेमे, पण हलके फुलके आहेत एकदम.
खरंतर दादा कोंडकेंचा पांडू हवालदार पण मस्त सिनेमा आहे, पाहताना आम्ही ऑलमोस्ट लोळलो होतो.

१. बिनकामाचा नवरा ( अशोक सराफ आणि रंजना BEST )
२. लपंडाव (सुनील बर्वे , विक्रम गोखले , वर्ष उसगावकर ,सविता
प्रभुणे ,वंदना गुप्ते ..अगदी मस्त आहे हलका फुलका )
३. अशी ही बनवाबनवी
४.गोंधळात गोंधळ ( अशोक आणि रंजना )
५. राम राम गंगाराम ( दादा कोंडके )

सुमित्रा भावेंचे बरेचसे सिनेमे आवडतात जसे की दोघी, वास्तुपुरुष, देवराई, नितळ ई. दोघी आणि वास्तुपुरुष खूपच आवडतात.

मसाला
हरिश्चंद्राची फॅक्टरी
बालगंधर्व

आणखी एक सस्पेन्स चित्रपट नाव आठवत नाही पण नायिका नवऱ्याला तू मरणार आहेस अशी पत्रे पाठवत असते व घाबरलेल्या नवऱ्याला खूप धीर देत असते. शेवटी खरं काय ते कळतं.

आणखी एक सस्पेन्स चित्रपट नाव आठवत नाही पण नायिका नवऱ्याला तू मरणार आहेस अशी पत्रे पाठवत असते व घाबरलेल्या नवऱ्याला खूप धीर देत असते. शेवटी खरं काय ते कळतं. >> इन्टरेस्टिंग वाटतेय स्टोरी लाईन. नाव आठवतेय का पहा ना.

'श्वास' एक उत्तम चित्रपट,आजोबा-नातू यांच्यातल मैत्रीचं नातं हळूवार उलगडणारा चित्रपट..

'ताऱ्यांचे बेट' कोकणची पार्श्वभूमी असलेला सचिन खेडेकरांचा अतिशय सुंदर मराठी चित्रपट.

काही वेगळ्या वाटेवरचे अप्रतिम चित्रपट

दिग्दर्शक - सुमित्रा भावे -सुनील सुकथणकर

१) नितळ
२) एक कप चा
३) घो मला असला हवा
४) वास्तुपुरुष

जब्बार पटेल

१) मुक्ता - (गाणी अतिशय अप्रतिम )

गजेंद्र अहिरे

१) सुम्बरान
२) त्या रात्री पाऊस होता

चंद्रकांत कुलकर्णी

१) आजचा दिवस माझा

गिरीश आणि उमेश कुलकर्णी

१) वळू
२) पुणे ५२
३) विहीर

अजून

१) कोर्ट
२) रेगे
३) ताऱ्यांचे बेट
४) एक उनाड दिवस
५) श्वास

सगळे समृद्ध करणारे चित्रपट
अजून आठवले कि लिहतो Happy

पक पक पकाक
जत्रा
निशाणी डावा अंगठा
पिपाणी
कायद्याचं बोला
अगं बाई अरेच्या

नारबाची वाडी खूप निरागस विनोदाने भरलेला सिनेमा आहे.

>>
नारबाची वाडी आमिरच्या 'इसी का नाम जिंदगी' ची बकवास कॉपी आहे