भुकेले आणि माजलेले

Submitted by कुमार१ on 18 April, 2017 - 07:47

प्रसंग पहिला :

परगावचा मुक्काम संपवून मी ट्रेनने माझ्या गावी परत येतोय. प्रवास अगदी शेवटच्या टप्प्यात आलाय. आमची ट्रेन आता प्लॅटफॉर्म मिळण्याची वाट पाहत स्टेशनच्या ‘आउटर’ ला थांबली आहे. गाडी जरा जास्तच रखडल्याने प्रवासी चुळबूळ करताहेत. मी कंटाळून खिडकीतून बाहेर पाहत असताना अचानक एका दृश्याने माझे लक्ष वेधून घेतले.

पलीकडच्या रिकाम्या रुळांदरम्यान ढीगभर अन्न टाकून दिलेले होते अन ते अन्न एक माणूस खाली बसून अधाशीपणे खात होता. दोन-तीन रंगांचे भात त्यामध्ये दिसत होते. कदाचित ते रेल्वेच्या खानपान सेवेतील उरलेले वा लोकांनी टाकून दिलेले पदार्थ असू शकतील. त्या कंगाल माणसाकडे पाहताच त्याचा ‘भिकारी’ हा दर्जा लगेच लक्षात आला. त्याच्या चिवडून बकाबका खाण्याच्या पद्धतीवरून तो बराच काळ उपाशी असणार हेही जाणवले. आता तो माणूस जिथे बसला होता तिथेच आजूबाजूला जुन्या-नव्या मानवी व प्राण्यांच्या विष्ठा विखुरलेल्या असणार होत्या. परंतु, त्याची भूक एवढी तीव्र असणार की असले स्वच्छतेचे विचार करणे त्याला परवडणारे नव्हते. ते दृश्य बघून अगदी गलबलून आले.

तेवढ्यात आमच्या गाडीने मोठ्ठा हॉर्न दिला व ती पुढे सरकली. त्या दहा मिनिटांमध्ये मनात असंख्य विचारांचे काहूर माजले. ते केविलवाणे दृश्य मनातून जाता जात नव्हते. ‘‘का अशी वेळ येते एखाद्यावर’’ हा विचार माझ्या मनाला अक्षरशः कुरतडत होता.

तात्पर्य : तीव्र भुकेल्या जिवाला कुठलेही अन्न चालते – अगदी कुजलेले व घाणीत बरबटलेले देखील. भूक ही एकमेव भावना त्याला खाण्यायोग्य काहीही पोटात ढकलायला लाचार करते.

प्रसंग दुसरा :
सुमारे तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवारची रात्र होती. त्या शहरातील एक प्रथितयश डॉक्टर त्यांच्या पत्नी व दोन मुलींसह एका प्रतिष्ठीत रेस्तराँमध्ये जेवायला आले होते. त्यांच्या आठवडाभरातील कामाच्या व्यापानंतरचे हे विरंगुळ्याचे क्षण होते. रेस्तराँमध्ये मंद प्रकाश पसरला होता. चित्तवृत्ती फुलवणारे संगीत चालू होते आणि झकपक गणवेशातील कर्मचाऱ्यांची लगबग दिसत होती. डॉक्टर नुकतीच वयाची चाळीशी ओलांडलेले, तर त्यांच्या मुली या शालेय वयातील. आता हे कुटुंब एका टेबलावर स्थिरावले. तेथे वेटर येताच त्यांनी सूप व ‘स्टार्टर’ ची ऑर्डर दिली.

‘स्टार्टर’ हे मुख्य जेवणाआधीचे अल्पखाद्य असते याची जाणीव अद्याप त्या खादाड मुलींना नसावी. त्यामुळे, आई-वडिलांचा विरोध असतानाही त्या नावाखाली तब्बल चार प्लेट्सची ऑर्डर दिली जाते. ते पदार्थ येतात. खाणे सुरू झाल्यावर थोड्याच वेळांत त्यांच्या टेबलावर नजर टाकता हे स्पष्ट होते की त्या पदार्थांपैकी निम्मा भाग तरी खाऊन संपणार नाही. त्यावर मुलींचे आईवडील त्यांना रागावतात. पण, त्याचा फारसा परिणाम होत नाही. आता मुख्य जेवणाची ऑर्डर दिली जाते. पुन्हा एकदा मुलींचा हावरेपणा आवरणे आईवडिलांना जड जाते. वेटर जेवण आणून ठेवतो. थोड्या वेळातच अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा निम्मे पदार्थ पानात शिल्लक राहणार हे दिसू लागते.

डॉक्टर व त्यांच्या पत्नीने मागवलेल्या अन्नाला यथाशक्ती न्याय दिलेला असतो; पण केवळ मुलींच्या हट्टामुळे मागवलेले गरजेपेक्षाचे जास्त अन्न आता उरत होते. ते बघून हे दांपत्य खरोखर अस्वस्थ झाले. त्या दोघांना अन्न टाकणे ही कल्पनाही सहन होणारी नव्हती. मुली मात्र त्याबाबत बेफिकीर होत्या. एव्हाना ताटातले अन्न संपत नसतानाही त्या दोघी यानंतर ‘ज्यूस का आईसक्रिम’ मागवायचे याची चर्चा करू लागल्या. किंबहुना अशा उच्चभ्रू रेस्तराँमध्ये असेच वागायचे असते, ‘अन्न टाकले तर त्यात काय एवढे’ असे भाव त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.

रेस्तराँमधील इतर टेबलांवरसुद्धा थोड्याफार फरकाने अशीच स्थिती होती. काहीतरी अन्न टाकल्याशिवाय ‘पार्टी’ साजरी झालेली नव्हती. अशा टाकलेल्या अन्नाची विल्हेवाट लावणे हा तेथील कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामातील अप्रिय पण अटळ भाग होता. तेव्हा आता हे कुटुंब उठेल व आपल्याला ते टेबल स्वच्छ करायचेय या प्रतिक्षेत तिथले नोकर होते. परंतु, आता त्या टेबलावर एक अनपेक्षित प्रकार घडला.

आपल्या मुलींवर क्रुद्ध झालेल्या डॉक्टरांनी ‘डेझर्ट’ ची ऑर्डर निक्षून थांबवली. एवढेच नाही, तर पानात उरलेले सर्व अन्न अजिबात टाकता येणार नाही असे मुलींना खडसावून सांगितले. मग डॉक्टरांनी वेटरला बोलावले व ते उरलेले सर्व अन्न ‘पार्सल’ करून देण्यास सांगितले. वेटर त्यांच्या या पवित्र्याने अवाक झाला. त्याने त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे ठरवले. खरे तर आतापर्यंत त्या रेस्तराँमध्ये असा प्रकार घडला नव्हता. त्याकाळी (म्हणजे सुमारे ३० वर्षांपूर्वी) अशा उरलेल्या अन्नाचे पार्सल करायची पद्धत रुळलेली नव्हती. अखेर कशाबशा प्लास्टिकच्या पिशव्या जमवून वेटरने ते पार्सल केले. आता डॉक्टरांचे कुटुंब ते पार्सल घेऊन निघाले. ते बाहेर पडत असताना तेथील सर्व कर्मचारी डॉक्टरांकडे कौतुकाने व आश्चर्याने बघत राहिले.

तात्पर्य : अन्न टाकण्याचा माज हा उतरवलाच पाहिजे आणि त्याची सुरवात ही आपल्या घरापासूनच हवी.

प्रसंग तिसरा
:

संध्याकाळची वेळ. छान वारे सुटलेले. एका शहरातील उपनगराचा भाग. छोट्या-मोठ्या दुकानांच्या गर्दीत रस्त्यावर एक वडापावची गाडी उभी आहे. या तळणीतल्या वड्यांचा खमंग वास दरवळतो आहे. तिथेच एक बसण्यासाठी कट्टा आहे. त्यावर बसून काही ज्येष्ठ नागरिक निवांत गप्पा मारताहेत. एवढ्यात आजूबाजूच्या लोकांचे लक्ष वेधून घेतले जाते एका माणसाकडून. तो माणूस कळकट कपड्यांमध्ये आहे आणि चालता चालता काकुळतीने म्हणतोय, ‘’ओ दादा, ओ भाऊ, गावाकडून आलोय, दोन दिस उपाशी हाये, पोटात अन्नाचा कण नाही. लई भूक लागलीय हो. द्या कुणीतरी धा रुपये तरी.” त्याचे लक्ष तिथल्या वडापावच्या गाडीवर आहे आणि ‘’वडापाव दहा रुपये” ही त्या वडेवाल्याची आरोळी त्याने ऐकलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावरून तो खूप भुकेला वाटतोय. तो जीवाच्या आकांताने भीक मागतोय – फक्त दहा रुपयांची. एकीकडे त्या गाडीच्या बाजूने त्याच्या येरझाऱ्या चालू आहेत.

ते दृश्य पाहून कट्ट्यावरच्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये जरा अस्वस्थता आली. त्यांच्या गप्पा जरा बाजूला ठेवून ते त्या माणसाबद्दल चर्चा करू लागले. त्यांच्यात थोडेफार संवाद झडले ते असे :
‘’जाऊ द्या हो, नका लक्ष देऊ त्याच्याकडे. जाईल निघून जरा वेळाने’’,
‘’आता भीक मागायची म्हटली की दोन दिवसांच्या उपाशीपणाची कथा सांगणारच की हो तो’’,
‘’अहो, कष्ट नाही केले की हे वेळ येते माणसावर. मग भीक मागणे हा सगळ्यात सोपा धंदा.’’

त्या माणसाच्या येरझाऱ्या आणि आर्त स्वरातले भीक मागणे सुरूच आहे. अखेर, त्या ज्येष्ठांपैकी एकांना राहवत नाही. भीक देणे हे त्यांना तत्वतः मान्य नाहीये. पण, आता ते जागेवरून उठतात. झपाटल्यासारखे त्या भिकाऱ्याजवळ जातात. थोड्याशा चढ्या आवाजात ते त्याला हाक मारतात आणि वडापावच्या गाडीजवळ बोलावतात. आता ते खिशातून दहाची नोट काढतात व ती त्या गाडीवाल्याला देउन त्याला त्या भिकाऱ्याला एक वडापाव द्यायला सांगतात. त्यानुसार कृती होते. मग तो भिकारी वडापाववर अक्षरशः तुटून पडतो व दोन मिनिटात तो फस्त करतो. त्या गृहस्थांना समाधान वाटते. ते भिकाऱ्याकडे अधिक लक्ष न देता शांतपणे चालू लागतात.

तात्पर्य
: भिकाऱ्याची भूक भागवणे ही प्राथमिकता. भिकारीपणावरील तात्विक चर्चा ही त्यानंतरची गोष्ट.

प्रसंग चौथा( व शेवटचा) :

शहरातील एका शानदार मंगल कार्यालयात लग्नसोहळा चालू होता. त्यात भोजनाची पंगत बसली होती. त्यामध्ये माझ्या शेजारी एक उच्चशिक्षित व्यावसायिक गृहस्थ बसलेले होते. आमच्याकडे येणारा प्रत्येक वाढपी हा ‘वाढू का’ असे विचारूनच वाढत होता. माझ्या शेजारचे ते गृहस्थ त्याला दरवेळी ‘वाढा’ असेच म्हणत होते. याउलट मी मात्र, मी जेवढे खाऊ शकणार होतो तेवढेच वाढायला लावले.

थोड्या वेळांत माझे जेवण संपत आले व माझे ताट स्वच्छ दिसू लागले. त्या गृहस्थांचे ताट मात्र अजून तुडुंब भरलेले दिसत होते. वाढलेले सर्व पदार्थ ते खाऊन संपवू शकणार नाहीत हे आता स्पष्ट होते. एकदम ते मंद स्मित करीत माझ्या ताटाकडे पाहत मला म्हणाले, ‘’तुम्ही ताट किती स्वच्छ केले आहे ते दाखविता आहात काय?’’ त्यावर मी जोरकसपणे ‘’हो’’ म्हणालो आणि नंतर माझ्या ताटातील सर्व अन्न संपवून उठलो. मी हात धुउन परत येताना पाहिले की ते गृहस्थ आता उठले होते व त्यांनी ताटात अनेक पदार्थ टाकून दिले होते. त्यामध्ये किमती गोड पदार्थही होते.

अन्न टाकणे हा प्रतिष्ठेचा एक निकष मानणारे ते महाशय बघून मला मनस्वी चीड आली. तसेच त्या क्षणी आपण याबाबत काहीही करू शकत नाही याचा विषाद वाटला. समाजातील अशा मस्तवाल लोकांचा बंदोबस्त कसा करावा याचा विचार करत मी कार्यालयाबाहेर पडलो. जेवणाची पंगत असो वा बफे पद्धत, असे अन्न टाकणारे अनेक मुजोर आपल्याला सदैव दिसतात खरे.

तात्पर्य: एकजण अन्न टाकणारा आणि दुसरा ते लवून भजून खाणारा. पहिल्याच्या दृष्टीने दुसरा हा टिंगलीचा विषय, तर दुसऱ्याच्या दृष्टीने पहिला हा चीड आणणारा विषय.

... अन्न – माणसाची जगण्यासाठीची मूलभूत गरज. ते अन्न काहीही करून मिळवलेच पाहिजे याची जाणीव करून देणारी संवेदना म्हणजे भूक.
समाजातील बहुतेक लोक कष्ट करून अन्न मिळवतात आणि आपली भूक भागवतात. त्यामुळे त्यांना अन्नाची किंमत समजलेली असते. ते नेहेमी अन्न लवून भजूनच खातात.

काही लोकांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी असते. त्यांना अन्न मिळवण्यासाठी कष्ट नाही केले तरी चालणार असते. त्यांची भूक भागवण्याची सोय एकतर त्यांच्या पूर्वजांनी करून ठेवलेली असते किंवा, दुसऱ्याचे शोषण करून स्वतःची पोटे भरण्यात हे लोक तरबेज असतात. सुबत्तेतून आलेला माज त्यांच्यामध्ये अगदी भिनलेला असतो. अशा लोकांमधूनच मग निर्माण होतात अन्न टाकणारे मुजोर. भुकेची वेदना कधीही न जाणवलेली ही माणसे. त्यांना अन्नाची किंमत ती काय कळणार?

या दोघांशिवाय तिसरा एक वर्ग समाजात असतो. हे लोक अन्न मिळवण्यासाठी कष्ट व धडपड करण्याऐवजी भिकारी होण्याचा सोपा पर्याय निवडतात. तेव्हा या लोकांना फुकट मिळेल तेवढेच व वाट्टेल तसले अन्न खाण्याची वेळ येते. त्यांच्या सततच्या भुकेल्या अवस्थेला ते स्वतःच जबाबदार असतात. ‘ज्याचे हात काम करतात तो कधीही उपाशी राहत नाही’ या वास्तवाचा त्यांना बहुधा विसर पडलेला असतो.

विष्ठेने बरबटलेले अन्न चिवडून खाणारा भिकारी, काबाडकष्ट करुनही अर्धपोटी असलेली माणसे, मुक्तहस्ते अन्नाची नासाडी करणारी आणि ते टाकण्यात प्रतिष्ठा मानणारी माणसे यांसारखी दृश्ये आपल्या अवतीभवती वारंवार दिसतात. ही सगळीच दृश्ये व्यथित करणारी. ही दृश्ये आपल्याला ‘समाजातील आर्थिक विषमता व वाढती दरी’ यांसारख्या जडभारी विधानांचा अर्थ अगदी स्पष्ट करून सांगतात. एवढेच नाही, तर या वास्तवाची प्रखर जाणीव करून देतात.

एखाद्या माणसाच्या भिकारी होण्याला नक्की जबाबदार कोण?
फक्त तो स्वतः की आपण सगळेच? उत्तर देणे अवघड आहे. पण, काही मुद्दे अगदी स्पष्ट व स्वच्छ दिसतात :
१. माणसाने कोणतेही काम हलके न मानता वाटेल त्या कष्टांची तयारी दाखवली तर त्याची भूक भागण्याइतके अन्न त्याला जरूर मिळते.
२. ज्या लोकांना अन्न, वस्त्र, निवारा आणि कित्येक सुखसोयी या विनासायास मिळाल्या आहेत, त्यांनी निदान अन्न टाकण्याचा माज तरी करू नये ही अपेक्षा.
३. आपली भूक भागण्यामागे आपण सोडून इतर अनेकांचे कष्टही कारणीभूत असतात, ही जाणीव सर्वांना असणे हेही महत्वाचे.

ज्या दिवशी या पृथ्वीतलावरील उपलब्ध अन्न हे मानवासहित सर्वच प्राणिमात्रांची भूक भागवून सर्वांना तृप्त ठेवेल तो अर्थातच सुवर्णदिन असेल.

( टीप : माझ्या या लेखाची पूर्वप्रसिद्धी ( 'भूक' या नावाने) : ‘अंतर्नाद’ मासिक. संबंधित संपादकांच्या परवानगीने येथे प्रकाशित.)
*************************************************************************************************************************************

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋन्मेष, इतर नासाडी होणारी उदाहरणे तर आहेतच योग्य. त्यात काही वाद नाही. तेही थांबवायचा प्रयत्न, त्यावर चर्चा व्हावीच. पण हा धागा 'ताटात वाढुन घेतलेल्या पण न खाल्ल्याने होणार्‍या नासाडीचा' आहे म्हणुन त्यावर भर आहे. बाकी मुद्दे वेगवेगळे चर्चेला यावेत इतके महत्वाचे आहेत. पण एकातच सरमिसळ नको म्हणुन ते मुद्दे विचारात घेतले नसतील.
पृथ्वीकरांचा मुद्दा पण पटला. संपवायचे म्हणुन ठोसायचे हेही घातक. (जर ते पदार्थ पौष्टिक असतील तर निदान शरिराला घातक नाहीत पण नाहीतर...) म्हणुन थोडेथोडेच घ्यावे.

बफेची मोठी रांग - योग्य मुद्दा पण यावर उपाय म्हणजे बफे जास्त टेबलावर मांडावा म्हणजे जास्त रांगा लावता येतील व लोकांना लवकर जेवण मिळेल व भसाभसा वाढुन घेण्याची शक्यता कमी होईल.

>आपल्या मुलांनी ताटात आलेला प्रत्येक पदार्थ हा आवडनिवड न जपता खाल्लाच पाहिजे असा एक सूर आढळतो. मुख्यत्वे जुन्या मंडळींमध्ये जास्त असायचा. मला तो सुद्धा जरा खटकतो >> अगदी चुकिचा मुद्दा नाही. पण मुलांना एकुण सगळे खायची सवय लहानपणी लावली गेली तर बरे पडते. मोठेपणी ही सवय कायम राहु शकते , शरिरात रोग लवकर शिरत नाहीत. आणि थोडे थोडेच द्यायचे मुलांना, एकदम किलोकिलोने नाही. मग ती मोठी झाली की आवडत नाही म्हणुन नासाडी करणार नाहीत.

आपली इछा नसतानाही ताटातले अन्न टाकायला प्रवृत्त करणारी एक गोष्ट आपल्या संस्कृतीत आहे ती म्हणजे 'आग्रह' करणे. हा प्रकार अगदी आई-मूल या नात्यापासून लहानपणीच सुरू होतो आणि मग मोठेपणी तर खूप फोफावतो.
पंगत प्रकारात यजमान सक्तीने गोड पदार्थ प्रत्येकाला (त्याची इछा असो वा नसो) वाढत जातात. हे अत्यंत चूक आहे. आज समाजात जाडी व मधुमेह हे आजार खूप बळावले आहेत. ते बघता 'आग्रह' या प्रकाराचा गांभिर्याने विचार केला पहिजे.

यावर अधिक पुढे लिहीतो......

सर्व प्रतिसाद पाहता एकदंरीत सर्वाचा परामर्श निघतो कि ताटात वाढलेले अन्न टाकू नये किंवा जास्तीचे पुढील वेळेसाठी ठेवावे अन्यथा दान करावे. आणि ह्या निर्णयाशी तर सर्वच सहमत होतील .. विशेषत: माझ्यासारखी मिडल क्लास किंवा कष्टकरी लोअर क्लास राहणीमान असलेली कुटुंब, मात्र अप्पर क्लास किंवा अति उच्च राहणीमान जन्मापासून अनुभवलेल्या लोकांना (काही सन्मानीय अपवाद वगळता) ह्यात विशेष स्वारस्य नसावे हे नक्की. त्याशिवाय पंचतारांकित हॉटेल मधील तसेच बुफे पद्धतीतील अन्नाची नासाडी (आपल्या मते) होणे शक्यच नाही. हे टाळण्यासाठी बालपणीचे संस्कार वगळता अन्य काय करता येईल ह्याविषयी मात्र फारशी चर्चा झालेली आढळत नाही. त्यानुषंगाने काही मुद्दे सुचले ते मांडायचा प्रयास करतो. काही पटतील काही वादग्रस्त असतील तरी त्यावर वैयक्तिक टिप्पणी न करता सुदृढ चर्चा व्हावी हीच अपेक्षा !

१) लहानपणीचे संस्कार म्हणजे काय - कधी प्रेमाने लावलेली तर धाकाने बाणवलेली शिस्त... असे समीकरण गृहित धरले तर हे आधीच्या पिढ्यांमध्ये बरेचदा शक्य असे जेथे बाळाची आई पूर्णवेळ गृहिणी असे शिवाय एकतर कुटुंब पद्द्तीमुळे आजी आजोबांचाही ह्या शिस्त लावण्यामध्ये हातभार लागे. पण आजच्या पाळणाघर वगैरे पद्धतीत हे शक्य आहे का जेथे आईला तीचे प्रेम,ममता वगैरे काळजावर दगड ठेवून तात्पुरते दुसऱ्याच्या हाती सोपवून ठराविक वेळेत ऑफिस गाठावे लागते. ह्या मुद्द्याचा विचार करता आपल्याला अपेक्षित असलेली शिस्त लावण्याची जबाबदारी साहजिकच शिशुवर्गा सारख्या शाळांवर (शिक्षकांवर) येवून पडते. ज्याचे उत्तर आज तरी सर्वत्र समान नाही.

२) धाकटधपाशाने लावलेली शिस्त म्हणजे लहानपणीचा गुरुजींचा छडीचा मार किंवा घरी आई बाबांचा धपाटा Happy जो सर्वांनीच अनुभवलेला असणार .... पण ज्या मुलांना सावत्र पालक आहेत किंवा पालक नाहीत / अनाथ आहेत त्यांचे काय ? मग सर्वांगीण विचार करता एका पिक्चरमधील नाना पाटेकर ह्यांचे वाक्य नक्कीच पटते - सर्व देशवासियांना आयुष्यात किमान एक वर्ष तरी लष्करी सेवा सक्तीची करावी. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे स्वत:च्या जीवनात जर प्रत्येक नागरिकाने अनुभवले तर त्या कडक शिस्तीमुळे त्याच्या हातून आयुष्यात पुढे खाद्य पदार्थच काय , अगदी कसलीच नासाडी होणार नाही असे वाटते.

३) आता राहिला हॉटेलचा प्रश्न जेथे आपण ऑर्डर तर आपल्याला हवे तेवढेच करू म्हटले तरी त्या ठराविक डिश साठी जे साईडला डेकोरेशन असते ते तर बरेचदा फेकले जाते म्हणजेच नासाडी होते. उदाहरणार्थ - http://kensingtonstreetsocial.com/wp-content/uploads/2016/07/AB5I0532_Ni...
हि नासाडी टाळता येणे खरेच अशक्य आहे असे सध्या तरी वाटते, कारण त्याला व्यावसायिक किनार लाभली आहे. जर असे आकर्षक डेकोरेशन नाही केले तर त्या हॉटेलला त्यांचे गिर्हाईक आकर्षून घेणे कसे शक्य होईल? मग आता ह्याला उपाय काय जेथे अर्धे अन्न जे खाण्यासारखे असूनही फुकट जातेय.

४) काही प्रतिसादांमध्ये एखादी नावडती भाजी / पदार्थ ताटात उरला तर लहान मुलांना जबरदस्तीने खायला लावू नये अश्या अर्थाने वाचले त्याविषयी थोडेसे - - मुळात हे आवडते नावडते कश्यावर ठरते ? तर त्या पदार्थाच्या चवीवर आणि हि चव येते अन्न शिजवणाऱ्याच्या / गृहिणी किंवा स्वैपाकी वगैरेच्या हातातून. मग हे नावडते प्रकरण आवडते करणे सुद्धा अश्याच हातात आहे कि जे तोच पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने करून आवडेल अश्या चवीचा बनवू शकतील. आणि हे खरेच शक्य आहे असे मला तरी वाटते. जे जे मनुष्यास खाण्यायोग्य येथे आपल्याला परमेश्वराने उपलब्ध करून ठेवलंय ते चांगलेच असले पाहिजे नं !

५) हा थोडासा तांत्रिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे - डायटेटिक्स - म्हणजे आपण जेवतो ते खरोखर किती प्रमाणात आपल्या शरीराला आवश्यक आहे आणि त्यातून किती गोष्टी आपल्या पोषणासाठी ठराविक प्रमाणात शरीरात जाणे गरजेचे आहे हे सांगणारे शास्त्र म्हणजे आहारशास्त्र. पण म्हणून काय आम्ही कुठे हे शिकायला जावू आता असे करून ह्या मुद्द्याकडे पाठ फिरवणे म्हणजे भविष्यातील अन्न धान्याच्या टंचाईच्या काळात स्वत:ला कुपोषित करून घेणेच होय. मोबाईल आणि इन्टरनेट वापरणारे थोडेफार ज्ञान सोशल मिडीयावर चर्चा करून मिळवू शकतात आणि ज्यांना परवडते त्यांनी एकदा योग्य डाएटीशनचा सल्ला / मार्गदर्शन घेतलं तर त्याअनुषंगाने आपल्या दैनदिन आहारात उचित बदल केले जावू शकतात. जे जे समोर उपलब्ध त्यातून मी मला जे बेस्ट कसे मिळवेन ह्याचे उत्तर जसे आपण कार्पोरेट मध्ये वावरताना मिळवतो तसे ते आपल्या किचनमध्येही मिळवले तर बरेचसे प्रश्न आपोआप निकालात निघतील असे वाटते.

‘जेवणातील आग्रह’ याबद्दल अधिक......

आमच्या एका वैद्यकीय चर्चासत्रातील किस्सा सांगतो. विषय होता ‘समाजातील वाढती स्थूलता व मधुमेहाचे प्रमाण’. याची सर्वसाधारण कारणे आपल्याला माहित आहेतच. पण, एका तज्ज्ञाने विशेष भर दिला तो ‘आग्रह’ या कारणावर. जरी ती चर्चा इंग्लिशमध्ये होते तरी त्याने ‘आग्रह’ हा शब्द मुद्दाम मराठीतच वापरला आणि त्याला योग्य इंग्लिश प्रतिशब्द माहित नसल्याचे सांगितले.
एकूणच आपल्या आशियाई लोकांमध्ये पोळी-भात इ. पदार्थ पोट तुडुंब भरेपर्यंत खाण्याच्या सवयी (जनुकीय कारणामुळे) आहेत. त्यात भर पडते ती आपल्या भारतीय ‘आग्रह’ या कारणाची.
जे लोक अन्न न टाकण्याबाबत अतिशय दक्ष आहेत त्यांची या आग्रहामुळे खरेच कुचंबणा होते. आग्रहाला नाही म्हणावे तर यजमानाचा रोष, पोट भरले असताना खावे तर शरीराला त्रास आणि अन्न टाकून द्यावे तर मनाला क्लेश.

तेव्हा एकंदरीत सामाजिक आरोग्य परिस्थिती ( विशेषतः शहरी) बघता ‘आग्रह’ हा प्रकार थांबायला हवा आहे. पंगतीत जेवताना कोणीही खायला लाजणार नसते. उलट बहुतेक जण जेवण ‘चापण्याच्या’ नादात नेहेमीपेक्षा दोन घास जास्तच खातात.

जेव्हा आपण नातेवाईक व परिचितांच्या घरी जेवायला जातो तेव्हाही आग्रह होतो. त्यावर मी माझ्यापुरता तोडगा असा काढला आहे. आग्रह सुरू होणार असे दिसताच मी त्यांना म्हणतो,
१. ‘’आग्रह करायचाच असेल तर कोशिम्बिरीचा करा , गोडाचा नको.’’
२. ‘’अहो, आता माझे पोट खरेच भरलेय, ते आग्रहाच्या वाटचे पाहिजेतर बांधून द्या!’’
३. थोडीफार गोडाच्या आग्रहाची शक्यता गृहीत धरून मी तेव्हा पोळी खाण्याचे प्रमाण निम्म्यावर आणतो. तसेही आपण पोळी रोजच खातो ना.

एकून काय, तर यजमानाला न दुखावता आपण हळूहळू आग्रह करण्यापासून परावृत्त करू शकतो.

अंबज्ञ, चांगले विवेचन.
आणि..........
.. सर्व देशवासियांना आयुष्यात किमान एक वर्ष तरी लष्करी सेवा सक्तीची करावी. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे स्वत:च्या जीवनात जर प्रत्येक नागरिकाने अनुभवले तर त्या कडक शिस्तीमुळे त्याच्या हातून आयुष्यात पुढे खाद्य पदार्थच काय , अगदी कसलीच नासाडी होणार नाही असे वाटते. >>> याला १ लाख वेळा अनुमोदन !

>>बाळाची आई पूर्णवेळ गृहिणी असे शिवाय एकतर कुटुंब पद्द्तीमुळे आजी आजोबांचाही ह्या शिस्त लावण्यामध्ये हातभार लागे.

मग बाळाच्या बाबांनी घरी बसून संस्कार करावेत! वरील वाक्यात बाबांना सोयीस्करपणे सूट का दिली आहे? आई आहे, आजी आजोबा आहेत मग बाबानाच का या भयंकर कामापासून सुटका?

आई काम करो वा गृहिणी असो. दिवसातून २ वेळा तरी घरातले सगळे सदस्य एकत्र जेवले तर जेवण्याच्या बाबतीतील संस्कारांचे खापर आईच्या माथी फुटणार नाही. आणि तशी दोन जेवणे मुलांना पाळणाघरात "टाकूनही" शक्य असतात. ब्सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण. यातही वरील वाक्यातील उपेक्षित सदस्य बाबा यांनी स्वयंपाकात थोडी मदत केली तर अजून खूप चांगले संस्कार होतील. हो की नाही?

कुमार १, बाकी नंतर लिहीन. खूप छान लेख आहे.
माझ्या बाबांना आणी नवर्‍याला दोघांना आग्रह केलेला अजीबात आवडत नाही, कारण दोघेही मोजकेच जेवतात, आणी काही टाकत नाहीत. एकदा मात्र बाबांची पंचाईत झाली. एका लग्नाला आम्ही गेलो होतो. बाबा गोड जास्त खात नाहीत. पानात आधी दोन जिलेब्या होत्या. त्या त्यांनी संपवल्या. यजमान आले आणी त्यांनी आग्रह करुन परत एक जिलेबी वाढली. बाबांनी ती संपवली. आता ताटात काही गोड दिसत नाहीये समजून नंतर जिलेबीचे ताट घेऊन आलेल्या बाईने भसकन ताटात २ जिलेब्या वाढल्या. माझे बाबा जाम वैतागले. शेवटी त्या मीच संपवल्या.

मला कुणाचे उष्टे आवडत नाही. मुलीच्या ताटातली पोळी वगैरे उरली तर मी खाते, आणी आधी तिचे ताट नेमकेच वाढते, नंतर हवे ते घे असे सांगते.

आग्रह हा खरेच डोक्यात जाणारा प्रकार आहे. पूर्वी लोकांना लाडू, गुलाबजाम, जिलेबी दिवाळीत वा लग्नातच मिळत त्यामुळे कदाचित ते योग्य असेल. आजकाल बरेच लोक डायबेटिक वा प्री डायबेटिक असताना "आणखी एक गुलाबजाम घ्याच" हा आग्रह "एक सिगारेट ओढाच!" "एक पुडी गुटखा घ्याच!" सारखा आहे.

ऋ न्मेष, आपला मुद्दा सिद्ध करायला तू काहींच्या काही उदाहरणे घेतली आहेत, इतका इरेला पेटू नकोस,

मला तार्किक उत्तर अपेक्षित होतं, तू इतका अंदाधुंद गोळीबार केला आहेस कि काही प्रतिवाद करायची इच्छाच मेली...

जाऊदे, जे काय करायचं ते करा... Wink

>>> तर जेवण्याच्या बाबतीतील संस्कारांचे खापर आईच्या माथी फुटणार नाही. <<<< नक्कीच, किंबहुना, याबाबतीत आईबाबांचे एकमत असावेच, व स्वतःचे वागणेही तसेच असावे. शिस्त लावतानाचा वाईटपणा खरेतर सहसा बाबांनीच घ्यावा.
दुर्दैवाने अनेक "पुरुषप्रधान" घरात थोराड वाढलेल्या ठोंब्या पुरुषांनी कसेही वागले तरी चालते, अन वर "आमच्यात नाही हो पुरुषाला जेवताना टोकलेले चालत, काही कमी आहे का आपल्याकडे?" असे म्हणुन त्यांच्या बेशिस्तीला पाठीशी घातले जाते, बाबाचे बघुन मुले तेच वागतात, (यातही मुलग्याला वेगळा न्याय तर मुलिला वेगळा न्याय असेही बघण्यात येते ).
एका सांगण्यात मुले ऐकत नाहीत, ऐकावे अशी अपेक्षाही करु नये, पण त्यांचे समोर पुन्हा पुन्हा स्वतःचे उदाहरण ठेवावे, तसे सांगावे, आमचे वडील आम्हाला जेवताना सुरुवात करतानाच सांगायचे, की बघ मी माझे ताट कसे स्वच्छ करतो, काहीही टाकणार नाही.... मुले आपसुक अनुकरण करतात, थोडा वेळ जातो, रागावर नियंत्रण हवे, पण हा उपाय यशस्वी आहे.
नुकतेच, अडिच वर्षाची नात, कायम नॅपीच्या सवईमुळे शीशू कुठे केव्हा करावी याचे भान नाही, मग नॅपी नसली तरी जिथे असेल तिथे शू करणार, तेव्हा तिला तिच्या आईने/आजीने दोनचार वेळेस सांगितले की अमुक करायचे नि तमुक करायचे. शेवटी एकवेळेस, अडिच वर्षाचीच असली, तरी नातीच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास ठेवुन, मी तिला फक्त इतकेच विचारले, की काय ग इथे शू केलीस, तशी शू बाकीचे कुणी करताना पाहिलेस का? तिचे उत्तर होते नाही. मग तिला हलक्या स्वरात सांगितले, अग मग तु करुन तरी कसे चालेल? .,... वगैरे वगैरे. तिची सवय कमी होत जात्ये.
हाच प्रकार जेवणाचे बाबतही. मुळात लाडे लाडे पोरांसमोरच, माना वेड्यावाकड्या वेळवित, "आमच्या बाब्या नाऽऽ, अमके तम्के वाढले तर अज्जिबात हात लावितच नाही" असली कौतुके करु नयेत. जिथे जिथे अशी कौतुके होतात, तिथे तिथे लाडाचे बाळ कार्टे बनायला वेळ लागत नाही.

"आणखी एक गुलाबजाम घ्याच" हा आग्रह "एक सिगारेट ओढाच!" "एक पुडी गुटखा घ्याच!" सारखा आहे. >>>
विजय, एकदम सही उपमा दिलीत ! सहमत.

पुण्यातले लोक आग्रह करत नाहीत. जेवायला बोलावताना किती लोक येणार असं आवर्जुन विचारतात, बेत मोजकाच करतात पण त्यांना अख्खी दुनिया नावं ठेवते हो Proud

>>> घरात थोराड वाढलेल्या ठोंब्या पुरुषांनी कसेही वागले तरी चालते, अन वर "आमच्यात नाही हो पुरुषाला जेवताना टोकलेले चालत, काही कमी आहे का आपल्याकडे?"

हे वाचून खूप हसले. १००% पटले.

>>>पुण्यातले लोक आग्रह करत नाहीत. जेवायला बोलावताना किती लोक येणार असं आवर्जुन विचारतात, बेत मोजकाच करतात पण त्यांना अख्खी दुनिया नावं ठेवते हो Proud

यावरून एक जोक आठवला

एकदा जोगळेकर काका अँटेना दुरुस्त करायला गच्चीच्या कट्ट्यावर चढतात. ते करता करता त्यांचा तोल जातो आणि ते ५व्या मजल्यावरून खाली पडतात.
पडता पडता ते त्यांच्याच स्वयंपाकघराच्या खिडकीवरून जाताना,
"सुलभा दोन पोळ्या कमी" असे सांगून पुढे जातात.

पडता पडता ते त्यांच्याच स्वयंपाकघराच्या खिडकीवरून जाताना,
"सुलभा दोन पोळ्या कमी" असे सांगून पुढे जातात.>>>>>>>>>>>>. Rofl Rofl Rofl

"मग हे नावडते प्रकरण आवडते करणे सुद्धा अश्याच हातात आहे कि जे तोच पदार्थ थोड्या वेगळ्या पद्धतीने करून आवडेल अश्या चवीचा बनवू शकतील. " - असं काही नाहीये. आवड-नावड हे ईतके सब्जेक्टीव्ह आहे की त्यात काही सायन्स नाहीये. मला कारलं आवडत नाही, ते कडू असतं. एव्हड्यात हा विषय संपायला हवा. पण नाही संपत. लोकं ईरेला पेटून 'अरे, तु आमच्या *** च्या हातची कारल्याची भाजी खाल्ली नाहीस अजून, एकदा खाऊन बघच' वगैरे चॅलेंजेस देतात. अशी अनेक चॅलेंजेस देणार्यांचा मान राखत मी अनेक वेळा कारलं खाल्लं आणी आता ठामपणे 'नाही' वर येऊन पोहोचलोय. पण हे आज करू शकतो. लहानपणी बरेचे वेळा तोंड कडू झालय. Happy

आग्रह हा एक अत्यंत त्रासदायक प्रकार आहे हे माझं मत आहे. विचारा हवय का किंवा थोडसं 'अरे घे, पोटभर जेव' वगैरे पर्यंत ठीक आहे. ते हातावरून वाढणं वगैरे प्रकार त्या अन्नाची चव आणी मजा घालवतात. अशा वेळी जर ते अधिक वाढलेलं अन्न ताटात उरलं, तर त्याची जवाबदारी वाढणार्याची असते, टाकणार्याची नाही. काही लोकं तर डायबेटीक माणसाला सुद्धा गोडाचा आग्रह करतात आणी स्वतःच डॉक्टर असल्यासारखं 'खा हो, एखाद्या गुलाबजामानं काही होत नाही, उद्या थोडं जास्त चाला किंवा ईंजेक्शन आहे ना, मग झालं असले सल्ले देतात किंवा एकदम फिलॉसॉफिकल होत, 'खरं तर डायबेटीस ही एक जीवनशैली आहे' वगैरे वाक्य टाकतात.

कारल्याचा मुद्दा 5व्या पॉइंट संबधी (आहारशास्त्र)अधिक जुळेल असे वाटते. आणि जे जे आपल्या शरीरास आवश्यक ते आवडत्या चवीचे कसे बनवायचे हे दिनेशदा अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील. Happy
आवड़ सब्जेक्टिव ठेवण्यापेक्षा त्याची उपयुक्तता लहानपणी मनावर बिम्बवणे ह्यावरसुद्धा त्या प्रतिसादात भर दिलाय. तरीही व्यक्ति तितक्या प्रकृति नुसार तुम्ही म्हणता तसे हे सब्जेक्टिव्ह बनते असेही असू शकेल.

आग्रह... बाप रे! नुसते प्रेमाने विचारावे पण बळंच ताटात वाढु नये. एका प्रेमळ मैत्रीणीला शेवटी बोलावे लागले, 'यार तु खिलाखिलाके मारेगी' Happy

"आपल्या शरीरास आवश्यक" - कारल्यातून जे काही जीवनावश्यक सत्व मिळवायचं ते देणारा तो एकच प्रकार शिल्लक राहिलाय का? मला वाटतं दुधी भोपळ्यात का कोहळ्यात (winter melon) पण तेच सर्व गुण असतात. meet मधे आणखी काही ऑप्शन्स असतील, जे मला आत्ता माहीत नाहीत.

"अरे, तु आमच्या *** च्या हातची कारल्याची भाजी खाल्ली नाहीस अजून, एकदा खाऊन बघच' वगैरे " - ह्यात आता दिनेशदांची भर पडली Wink

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
सई, विनोद आवडला. खूप पूर्वी ऐकला होता.
वाचकहो, आपण कुणाला आग्रह करू नये आणि कुणाच्या आग्रहाला आपणही बळी पडू नये, हे उत्तम !

एखाद्या मटणमच्छीचा वासही सहन न होणारया व्यक्तीला चार कोलंब्या हे सुद्धा अन्नच असते म्हणून खायला सांगा. कोलंब्याच का, कुठलेही मांसमटणमच्छी खायला सांगा. तो स्पष्ट त्या अन्नाला नकार देईन आणि आपणही ते मान्य करू.
पण हाच तिटकारा एखाद्याला भेंडी, कारले, पडवळं आणि अळूचे फदफदेबद्दल वाटू शकते हे काही लोकांना मान्यच होत नाही !

एक असा विचार करून बघा. उद्या जगातले सारेच लोक एकजात शाकाहारी झाले तर जगातल्या मांसाहाराची एका फटक्यात नासाडी Happy

मग पिकवा सबंध पृथ्वीतलावर भाज्या आणि किती लोकसंख्येला पुरतात याचा हिशोब लावा ...

चांगला लेख आणि विचार.

मुलांना लहानपणी शिस्त लावून सर्व पदार्थ खायला लावण्या बद्दल

मी स्वतः लहान असताना अनेक भाज्या खात नसे, पण जसजस वय वाढत गेलं तसतसं हे कमी झालं
आज ही काही भाज्या आवडत नाहीत पण समोर असतील तर खातो

लहान मुलांना हे समजून घेण्याची कुवत नसते, त्यावेळी जर जबरदस्ती करून त्यांना खायला लावलं तर त्याचे मानसिक आणि शारीरिक दुष्परिणाम होण्याची शक्यता वाटते, एखाद्या पदार्थाबद्दल कायम अढी निर्माण होऊ शकते, जेवणाची वेळ म्हणजे काहीतरी नकोस अशी धारणा होऊ शकते.

पूर्वीच्या काळी जे उपाय उपयोगी पडत, धाक, जबरदस्ती इत्यादी ते आता फारसे लागू पडणार नाहीत असं वाटत.
दुसरा मुद्दा असा की आज कालच्या धकाधकीच्या आयुष्यात जेवणाच्या वेळी मुलांबरोबर खाण्यावरून वादविवाद शक्यतो टाळावे हे माझे वैयक्तिक मत. तस ही दिवसभर आपण एकमेकांना भेटत नाही.
जेवणाची वेळ शक्यतो शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडावी. त्यावेळी अजून ताणतणाव नकोत

यावर काही उपाय असे की भाज्यांचे पराठे बनवणे किंवा इतर प्रकारे जे मुलांना आवडत असेल अस काहीतरी बनवणे,
सगळेच पदार्थ ते खातील असं नाही पण थोड्याफार प्रमाणात आपण काही मार्ग काढू शकतो

आमच्या मुलांचे डॉक्टर सांगतात की त्यांना समजत किती खायचं, नको म्हणत असतील तर आग्रह करू नका जबरदस्ती करू नका, भूक लागली कि येतील मागायला.

अन्न फुकट घालवू नये हे मुलांना शिकवण्यासाठी कडक शिस्त च लावली पाहिजे हा उपाय फारसा लागू पडणार नाही आजच्या काळात अस वाटत.

चर्चा ताटात घेतलेलं अन्न (अर्थातच आवडीचे आहे म्हणून घेतलेलं) खाल्ल्या जात नाही म्हणून टाकून देणे, उगाच टाकायचे म्हणून टाकून देणे यावरुन आवडी-निवडीकडे आली आहे. गम्मतच आहे Happy

जी गोष्ट आवडत नाही ती आपण खात नाही, जी खायला ताटात घेतलीच नाही ती टाकण्याचा प्रश्न येत नाही. अन्नाची नासाडी आणि आवडी-निवडी/आग्रह/मुलांवर जबरदस्ती ह्या दोन वेगळ्या कॅटेगरी आहेत. चर्चा करतांना अन्नाशी, खाण्याशी संबंधित असतील हे मुद्दे पण धागाविषयाशी संबंधीत नाहीत हे लक्षात घेता येईल काय?

मला आग्रह करणार्‍यांचा, मागेच लागणार्‍यांचा फार राग येतो, आपण आग्रह केला नाही म्हणजे आदरातिथ्यात कमी पडतो की काय असे या लोकांना वाटत असते. मग साधारण यजमानाचा स्वभाव बघून आधीच कमी जेवतो, तो जेवढा आग्रह करेल त्यापेक्षा ५० टक्के कमीच खातो, . आमच्या विदर्भात पाहुण्यांना आग्रह करणे मॅन्डेटरी स्किल आहे. म्हणून भरमसाठ अन्न वाया जाते असे पाहिले नाही. आग्रह करणे आणि वाढू देणे हे एका सेल्स-निगोशिएशन प्रमाणे हॅण्डल केल्या जाते.

मुलांना योग्य वयात योग्य त्या सर्व अन्नपदार्थांची गरज असतेच. त्यांना आवडत नसेल तर दुसर्‍या कोण्या पदार्थातून देता येते, चविष्ट बनवून देता येते. मुलांना आवश्यक आहार पोचणे हा एक भाग, पण आवड म्हणून वाडगाभर खीर घ्यायची आणि चार घास खाऊन नंतर टाकून द्यायची हा वेगळा भाग. सदर धाग्याचा विषय दुसरा भाग आहे. गल्लत होऊ नये.

मला शेपुची भाजी आवडत नाही, मी खात नाही, मला कोणी लहानपणी वाढली तरी मीच घेत नसे, तेच माझ्या मुलांबद्दलही आहे, त्यांना आवडत नाही ते जबरदस्ती कोंबण्यात मजा नाही. पण जे त्यानेच आवडीने घेतलंय ताटात वाढून, त्याने ते माजून टाकू नये इतका माझा आग्रह असतो.

"माजून टाकू नये" एवढाच विषय आहे इथे. बाकीच्या सगळ्या गोष्टी इर्रीलिवंट वाटत आहेत.

नॉनव्हेज खाणारे लोकपण आपल्या पोरांना असं कसं अंड खात नाही / चिकन खात नाही / मासे खात नाही, खा! म्हणुन सांगत रहातात सवय लावतात. टाकलं की दोन गोष्टी सुनावतात.

पोरांना खायची सवय लावणं हा प्रकार सर्वत्र आहे. त्याला व्हेजी विरुद्ध नॉनव्हेजी वळण द्यायचा प्रयत्न करु नये.

योगायोगाने आजच हे फॉरवर्ड आले मला कायअप्पा वर:

आवर्जून वाचा ....

एका लग्ना ला गेलो . जेवणाचा
तो थाटमाट पाहून थक्क झालो. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते . युनिफॉर्म घातलेल्या सुदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला ....
हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो .....

तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ . ने हात खेचत म्हटले " आहो जरा दमाने घ्या , मिळते म्हणून सर्व घेऊ नका , मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली . थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले .....
अधिक काही खाववेना . नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो . रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता .....

माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "

मी चकित झालो . थोडा राग हि आला . त्याच रागात बोललो
" आहो थोडे राहिले अन्न ?
काय हरकत आहे .
नाही अंदाज आला .
म्हणून काय घरी न्यायचं " ??

" रागावू नका " तो गोड हसत म्हणाला .
हे मोठ्यांच लग्न आहे . पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला . हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे . बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही . कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ . आमची 25 माणसे . पण तरीही अन्न उरणारच . आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न !! त्याचे काय ?? राग मानू नका . पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय , उत्कृष्ट प्रतीची भाजी , मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय ,त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे . पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत . आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....

म्हणून आम्ही हि शक्कल लढवली , हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता "........ का ???

कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
" आणि हो , यातील काहीही यजमानांना माहित नाही . हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका . पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे . थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकताय आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय ....
इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात . द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला . आता रात्रीचे जेवण होईल . मेहनत , इंधन सर्व काही वाचेल . थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो ....

( आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता....
एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....
पण भूभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही ...

अन्नावाचून , अन्न पिकवता आत्महत्या करतोय ..
अन्न वाया घालवु नका

"माजून टाकू नये" एवढाच विषय आहे इथे. >>>>
सहीच नानाकळा.
खाउन माजा पण टाकून माजू नका वरुन आपण "माजून टाकू नये अेवढेच" पर्यंत आलोत, चर्चा सफल झाली.

Pages