अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताची नेत्रदीपक कामगिरी

Submitted by कमल on 5 April, 2017 - 05:41

आकांक्षापुढती जिथे

अंध असूनही कॅरम, बुद्धिबळ, क्रिकेट, हायकिंग, ट्रेकिंग यासारख्या विविध क्रीडा प्रकारात उच्च स्तरावरच चांगलं यश मिळवणाऱ्या चारुदत्त जाधवच्या जीवातली आवड ‘धावणं ‘ हीच आहे. पूर्वी ऍथेलेटिक्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा चारुदत्त, ऍथेलेटिक्स सोडून बुद्धिबळाकडे का आणि कसा वळला त्याविषयी …
‘अजिंक्य’ कॉलम
आज दिनांक
६/१२/१९९५

डोळसांनाही आदर्श ठरावी अशी चारुदत्ताची कहाणी
चारचौघांसारख्या असणाऱ्या व्यक्तीला जर का एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला तर काय घडू शकतं याच उत्तम उदाहरण म्हणून चारुदत्ताचं नाव डोळ्यांपुढे येतं.
‘जिगर’ कॉलम
सांज लोकसत्ता
१३/४/१९९९
किमयागार

गिरणीकामगाराच्या मुलानं किती मोठ्ठ व्हावं याचे काही मापदंड ठरलेले नाहीत ; परंतु चारुदत्त जाधव मात्र भलताच मोट्टा झाला. फार फार मोठा झाला. राखेतून आकाशाकडे झेपावण्याची त्याची कुवत असामान्य म्हटली पाहिजे !
शब्द दीपोत्सव २००५
दिवाळीअंक
.

सतत नाविन्याचा ध्यास असणारा, सतत नवी नवी क्षेत्र काबीज करणारा, कुशलतेले आपल्या ध्येयाची पूर्तता करणारा चारूसारखा दुसरा माणूस मी आजवर पाहिला नाही.
चारुचं आजचं यश बघताना मला त्याच्या संगतीत घालवलेल्या जुन्या गोष्टी आठवल्या.
तीन वेगवेगळ्या टप्प्यांवर मी चारूबद्दल लिहिलेल्या तीन लेखांतील वरील तीन अवतरण ही चारू वेगवेगळ्या टप्प्यांवर कसा बदलत गेला, नव्या क्षितिजांना कसा सामोरा गेला हे आपल्यासमोर नकळत उलगडवणारी आहेत.
चालू अंध आशियाई स्पर्धेचं त्याने केलेलं नेटकं आयोजन आणि त्यात मिळालेलं यश पाहताना , मी त्याच्याबरोबर २००३ च्या पहिल्या वाहिल्या अंध आशियाई स्पर्धे दरम्यान मुंबईच्या हॉटेल मिरॅडोर मध्ये घालवलेल्या दहा दिवसांचा कालावधी आठवला.

हॉटेल मिरॅडोर च्या ऐका स्वीट मध्ये चारू आणि त्याचा सहाय्यक म्हणून वावरत असताना मला त्याच्या नेतृत्व गुणांचा कस लागलेला तर दिसलाच परंतू वागण्या, बोलाण्या, चालण्यातला त्याचा आत्मविश्वास वाखाणण्यासारखा होता. हे त्या वेळी प्रत्येकालाच जाणवत होतं. एकाच शब्दात सांगायचं तर चारू ‘हिरो’ होता त्या काळात . आजही तो हिरोच आहे म्हणा ! त्यावेळी तो GTL मध्ये होता नंतर तो TCS मध्ये गेला. त्यानंतर चारुने २००६ मध्ये अंधांची जागतिक बुद्धिबळ स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडून दाखवली.. २००९ आणि २०१२ अंधांच्या चेस ऑलिम्पियाडचं देखील चारूने (आणि त्याच्या टीम ने ) उत्कृष्ट आयोजन करून दाखवलं .

काल संपलेल्या अंधांच्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या किशन गांगोलीने सुवर्ण, अश्विन मकवानाने रौप्य आणि सौंदर्य प्रधानने कांस्य मिळवत सर्व पदकांची लूट करून, नेत्रदीपक कामगिरी करून, भारताची मान आणि शान क्रीडा जगतात उंचावली.

चारुदत्त जाधव, सर्व पदक विजेते आणि चारुची सहकारी मंडळी या सर्वांचं हार्दिक अभिनंदन !

————————–उदय ठाकूरदेसाई

—————————————————————————————————————–

टीप : चारूवर मी लिहिलेले दोन लेख तुम्हाला माझ्या uthadesai.com वेबसाइटवर वाचता येतील. तिसरा आणि महत्वाचा शब्द दिवाळीअंकातला लेख लवकरच अपडेट होईल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users