आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, स्निग्धा.....सॉरी, मी आता आले परत, पाणी भरायची वेळ असते ४ नंतर.
द्यायचे ना तुम्हीच, सगळे खोळंबले उगीच, सॉरी सगळ्यांना

७६७ मराठि
ज प झ ढ क व ज
ढ व ज व ज ढ व ज ढ क व ज
य य प क झ फ झ ज
झ झ ज फ फ झ ज झ फ झ ज
क्रुश्नाजिं तुम्हि सोड्वा.

७६७.

जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी
ढोल वाज जी वाज जी ढोल वाज जी ढोल कुणाचा वाज जी

फारच सोप्पे होते हे! Happy

७६८.

हिंदी

द ज ह फ ख ह
ब म स म द म द म ह

खूपच सोप्पे!

७६८
दिये जलते हैं, फुल खिलते हैं
बड़ी मुश्किल से मगर, दुनिया में दोस्त मिलते हैं

७६९ हिंदी (२०१०-२०१५)
ह क झ अ म स र ग
ग क श ज भ अ ल ग
ब र ह ज क च ज
अ ब क न म भ द क ह ज
स ल ह स ल
स ल ह स ल

हवा के झोंके आज मौसमों से रुठ गये
गुलों की शोखिंया जो भंवरे आके लुट गये
बदल रही है आज जिंदगी की चाल जरा
इसी बहाने क्युं ना मै भी दिल का हाल जरा
सवार लुं हाय सवार लुं

क्लु - ६० - ७० / हट्टाकट्टा नायक / नायिकेच्या गालावर सुरेख खळ्या पडतात / गाण मात्र तिसरीच व्यक्ती गातेय

७७०.

अल्लाह ये अदा कैसी है इन हसिनों में
रुठे पल में ना माने महीनों में

धर्मेंद्र शर्मिला

अहो मी अक्षय दुधाळ किंवा मि. पंडीत ह्यांची सारखी गाण्यांची चालती बोलती जंत्री नाही! ते पटकन ओळखतात! आणि विचार करायलाही वेळ नाही मिळाला आता क्ल्यु पाहिल्या बरोबर धर्मेन्द्र शर्मिला टागोर समोर आले डोळ्यांच्या पण आधी चुपके चुपकेच आला सिनेमा! Happy

७७१.

मराठी (७०-८०)

क र अ न स स म
ज य भ भ प क र य र

सोप्पय!

बघा मी म्हटले की नाही अक्षय, अक्षरशः चालती बोलती जंत्री आहात गाण्यांची! >>>
एखाद्या दिवशी गोळ्या लागतात नाहीतर कुठला जमतंय पटपट ओळखणं
७७२ हिंदी (१९९०-१९९५)
ज ह य य त ह क
अ ह द ज
ज अ ह ख ह
न ह स य द र
क त ब य ब
अ य म प म म द

जवान हो यारों ये तुमको हुआ क्या अजी हमको देखो ज़रा
ये माना अभी हैं खाली हाथ
न होंगे सदा यही दिन रात
कभी तो बनेगी अपनी बात
अरे यारों मेरे प्यारों मेरी मानों हो दिलदारों
चित्रपट जो जिता वहि सिकंदर

७७३ हिन्दि २००१-०५
स य च क न म ब द
स य च क न म ब द
अ प य द न ब ह न ब
म च क द म प अ अ र म प
ह म प अ अ र म प
सोप्प्प..

Pages