आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा -३

Submitted by मानव पृथ्वीकर on 4 April, 2017 - 02:27

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -२ : http://www.maayboli.com/node/61354

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

७४१ मराठि
क स स म द त
स अ स स न
ग फ द र र ड
म म प स भ न भ न
सोप्प

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना !
गुलाबाची फुलं दोन रोज राती डोळ्यांवर
मुसूमुसू पाणी सांग भरतील ना !.

करेकट>>..>>> Lol
कय झलय हो पन्दितजी तुम्हला???

७४२ मराठी
प र र प झ त म
अ अ य स ह त
ज ह ब ह ज ब

क्लू
२००५-२०१०
गायक :- खुपते तिथे गुप्ते
गीतकार :- मराठीत सध्या हाच जास्त लिहतो
नायक नायिकांची फौजच आहे दोन जाधव आहेत एक पाटील अप्सरा वाली कुलकर्णी

७४३ मराठि
ख द थ अ न
घ ज ब अ ब म
म अ इ भ स झ द
न थ ब ब ह व ख
ब ब ब ब ह न ह व ख
ढिन्च्यक आध्यात्मिक सौंग

कोणत्या सिरियलचं आहे पन्दितजी... Proud

म्हनजे ,आम्ही फक्त झी मराठीच बघतो हो... फक्त ३ सिरियल...
१)तु.जी.रं. २)मा.न.बा. ३) खु.क. ख...
बसं...

त्यामूले क्लिव द्या...

खंडेराया देवराया…
थाटुन आलासा नळदुर्गाला…
घेऊन जाया बानुबया…
ऐटीत बांधलासा मुंडावळ्या…
मंडप आभाळी इंद्रधनुचा…
भूमिला स्पर्श झाला देवगणांचा…
नटुन थटुन बसली बया ही बघाया खंडेराया…
बानुबया बानुबया बानुबया बानुबया…

हे बानुबया गाण माहित आहे मला...
पन क्लिक नाही झालं... Sad

मी त्य सिरियलच शिर्षक गीत विचारात घेत होते...

दादा मस्तच हो...द्या आता एखाद छान!

तुमचा मी सिरियलच्या बाफवर प्रतिसाद वाचला होता...

तुमच्याकडे म्हणे, भावोजी पासून शिवजी पर्यंत सगळे कार्यक्रम पाहतात...
तुम्हाला हे गाण माहित नाही??? Happy

तुमच्याकडे म्हणे, भावोजी पासून शिवजी पर्यंत सगळे कार्यक्रम पाहतात...
तुम्हाला हे गाण माहित नाही??? Happy>>> ही गाणं रोज लागते का?

रोज ते तळीचे पारंपारिक आणि आरती असे मिश्रीत गीत लागते...

अगडदूम नगारा आणि जय देव जय देव हे जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार ह्या दोन परंपारिक गीतांचे जी आरती आणि तळीचे पद लहानपणापासून पाठ आहेत!

श्श!
काम जास्त बोलणे कमी. >>> ओके... Happy
क्रुश्नाजी काकांनी दिलेल्या सुचनेचं पालन करा...

क्लू
जगप्रसिद्ध संगीतकार .
ह्या गाण्याला अॉस्कर मिळालाय.

सन्गित : .ए.आर. रेहमान
गायक : सुखविन्दर सिन्ग..

खरच मस्त गाण देलयं दादा..

आजा आजा जिंद
शामियाने के तले,
आजा ज़रीवाले नीले
आसमान के तले
जय हो, जय हो
जय हो.., जय हो..
जय हो.., जय हो..

परफेक्ट बरोबर
कावेरि, स्निग्धाताई दोघींनी द्या आता.

Pages