गाडीत बसायचं.....

Submitted by संजय मेहेंदळे on 27 March, 2017 - 08:50

स्टेशन वर यायचं
गाडी आली गाडीत बसायचं
गाडी सांधे बदलत राहते
आपण बस्स.... जात राहायचं
.
नशिबी काहींच्या
गाडी चुकीची उशिरा उमगायचं
आततायीपणे मग
गाडीतून धावत्या उडी मारायचं
.
नशिबी काहींच्या
स्टेशनवरच गाडीची वाट पाहायचं
नशिबी काहींच्या
गाडीत शेवटच्या स्टेशनची
वाट पाहायचं ….. वाट पाहायचं……
.

Group content visibility: 
Use group defaults

काहिच कळलं नाही...
पुढील कवितेसाथी शुभेच्छा!

दुसर्‍यांच्या प्रवासातपण कधीतरी रमायचं...>>> कशाला रमायचं दुसर्यान्च्या प्रवासात...
काही लोकांना सवय असते स्वतःचाच हेका पुधे नेण्याची...त्यात त्यान्ना आनंद मिळतो...