गैरसमज

Submitted by मिता on 24 March, 2017 - 03:02

मानवी स्वभावाला अनेक पैलू आहेत.. माणसागणिक स्वभावात बदल होतो.. मुख्यतः बहिर्मुख आणि अंतर्मुख अशा 2 प्रकारच्या व्यक्ती असतात.. आणि काही लोकांमध्ये दोन्ही पण आढळत.. बहिर्मुख व्यक्ती बोलक्या असतात, पटकन व्यक्त होणाऱ्या असतात, अनोळखी लोकांत त्यांना लगेच मिसळता येत.. अंतर्मुख व्यक्ती मनातलं क्वचितच बोलणाऱ्या असतात.. आपल्या समाजामध्ये 'खाली मुंडी अन पाताळ धुंडी' म्हणतात ते कदाचित या व्यक्तिंमुळंच.. पण म्हणून बडबडणाऱ्या बहिर्मुख म्हणून त्या चांगल्याच व्यक्ती आहेत असं नाही आणि न बोलणाऱ्या व्यक्ती वाईटच असतात असं नाही..

सहसा बहिर्मुख व्यक्ती कोणासमोरही व्यक्त होऊ शकतात .. आपला आनंद , दुःख मनातल्या अनेक गोष्टी बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही .. अंतर्मुख व्यक्ती मात्र विश्वासातल्या माणसासमोरच हे सगळं ओकतात.. इतरवेळी मात्र मनातलं मनात ठेवायचं एवढंच त्यांना जमत.. काहींना असं कोणीतरी विश्वासातील भेटत आणि काहींना आयुष्यभर आख्ख गाव आसपास असूनही मनासोबतच गप्पा माराव्या लागतात, सुख दुःख सगळं मनातच..

पण होणारे गैरसमज हे काही व्यक्तींच्या खूपच बोलण्याने म्हणजे मनात काही नसलं तरी बडबड करण्याने होतात , तर काही गैरसमज लोकांच्या अबोल राहण्याने होतात.. प्रत्येक व्यक्तीला नेमकं व्यक्त होता आलं पाहिजे अन ते हि प्रमाणात.. आणि जमणार नसेल तरीही निदान गरजेच्या वेळी तरी त्यांनी ते केलंच पाहिजे.. मलाच लोकांनी समजून घेतलं पाहिजे असं म्हणून नुसतं चालणार नाही.. तुमची बाजू कळण्याइतपत तरी.. कारण कोणीही या जगात अंतर्यामी नाही..

आपण बरेचदा म्हणत असतो, 'तो असं का बोलला असेल , खरंच का त्याला असं वाटत माझ्याबद्दल ..' , 'मी असं काय केलं होत म्हणून ती माझ्याशी असं वागली ..', 'मी तर इतक्या आनंदाने तिला सगळं सांगत होते , आणि ती मात्र न ऐकल्यासारखं करत होती, तोंड पाडून बसली होती.. तिला माझा आनंद बघवला नसेल का ..', 'काश ते वाक्य मी तसं बोललो नसतो , बोलता बोलता काय बोललो हे ..'
या प्रत्येक वाक्यात एकाच बाजूने विचार झाले.. कारण असं हि असू शकत कि 'कदाचित तो बडबडा आहे , बोलता बोलता त्याला भान राहील नसेल काय बोलतो याचा , पण त्याच्या मनात काहीच तसं नसेल ..', 'कदाचित तुला जे सांगायचं होत ते वेगळ्या अर्थाने तिनं ऐकलं असेल ..', 'कदाचित ती स्वतः ऐकण्याच्या मनस्थितीत नसावी ..', 'कदाचित दुसर्याने ते इतकं मनाला लावून घेतलाही नसेल..'.
मग हे कदाचित आपल्याला माहीत असत का ?.. अशावेळी हे गैरसमज वाढत जातात.. त्यापेक्षा वेळीच जर प्रत्येकाने बोलून मनातली शंका दूर केली तर बरीच नाती सुसह्य होतील .. दुसऱ्याच्या मनातला विचार पण आपण जर आपल्याच दृष्टीने केला तर गैरसमज होणारच .. त्यापेक्षा विचारा ना त्यांना स्पष्ट.. एकदा विचारून काहीतरी गवसेल .. दुसऱ्या व्यक्तीची बाजू समजेल .. कदाचित तुम्ही अति जास्त विचार करत असाल .. किंव्हा कदाचित तुम्ही जस समजता तसंच असेल.. म्हणजे नक्कीच या वेळी आपल्याकडं नीट पाहून , नीट ऐकून ठोस असं कारण असेल आपल्या पुढच्या कृतीला ..

माणसं म्हणतात जिथं पटत नाही तिथं सोडून द्या .. पण कशावरून तुमचं न पटणारी व्यक्ती वाईटच असते.. तिची स्वतःची मतं असतात , असतील ती तुमच्या मताच्या विरोधात म्हणून काही ती चुकीची असतील असं नाही ना..
माणूस घडतो तो केवळ आसपासच्या माणसांमुळं.. प्रत्येक माणसाचं संगोपन वेगळ्या पद्धतीनं झालेलं असत .. दोन चांगल्या असणाऱ्या व्यक्तींची मतं भिन्न असू शकतात .. त्यांचा विचारप्रवाह हा त्यांना आलेल्या अनुभवावरून असतो , हे समजून घेणं गरजेचं असतं..

आपली चूक नसेल तर प्रत्येकाने बोललंच पाहिजे , अन नाही बोललं तर आपल्याबद्दलचा गैरसमज वाढत जाऊन लोक आपल्याला त्याच चष्म्यातून आयुष्यभर पारखत राहतात .. हो मला हे मान्य कि , 'लोक प्रत्येक बाजूने आपल्याला वाटेल तसं बोलतात , त्यांच्याकडं लक्ष नसत द्यायचं ' पण म्हणून आपल्या मनाला लागलेली हुरहूर कमी होत नाही ना !!.. कितीही मनाला समजावलं तरी मन त्या गोष्टींचा विचार करत राहतं.. यावर एकदा तरी समोर बसून बोलणं हाच उपाय राहतो .. आणि यातून जो निष्कर्ष निघेल तो मान्य करून पुढं जाणं सोयीस्कर .. नाही का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो Happy

यावर एकदा तरी समोर बसून बोलणं हाच उपाय राहतो .. आणि यातून जो निष्कर्ष निघेल तो मान्य करून पुढं जाणं सोयीस्कर .. नाही का ? >> हो Lol

प्रत्येक व्यक्तीला नेमकं व्यक्त होता आलं पाहिजे अन ते हि प्रमाणात.. आणि जमणार नसेल तरीही निदान गरजेच्या वेळी तरी त्यांनी ते केलंच पाहिजे.. ....>>>>>> आपुलकीच्या , प्रेमाच्या माणसांना न बोलतासुद्धा अधिक समजून घेता येते की , प्रत्येक वेळी शब्द नाही उपयोगी पडत, कधी कधी अव्यक्त राहून अधिक भाव प्रगट होऊ शकतात. आणि तेच संसारात उपयोगी असते.