स्वस्तिक

Submitted by vijaya kelkar on 22 March, 2017 - 02:57

स्वस्तिक
दारी स्वस्तिक चितारले जाते
प्रतिक स्वत: आस्तिक असल्याचे
जे नाही ते सिद्ध करायचे
आहे ते दिसत असून लपवायचे

दारी स्वस्तिक चितारले जाते
हातास काही करायला नको असते
तोंडास तोंडी लावायला हवे असते
पुसले गेले तर डाफरायला हवे असते

दारी स्वस्तिक चितारले जाते
चारी दिशांस नाते जोडले जाते
मारी भिक्षुक हाक, अन् आतूनच हाकलते
सारी माया धाकात विरते

दारी स्वस्तिक चितारले जाते
म्हातारी एक एक काम उरकत जाते
एकतारी जणू तारस्वरात ओरडत असते
भरजरी शालूत गुदमरत असते .,.,.,.,.,.

विजया केळकर ____

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults