आपण आपल्या मस्तीत जगावं....

Submitted by पोलेकर प्रसन्न on 21 March, 2017 - 02:30

दूर अंधाऱ्या रात्री ..
एकांतात वाट सरते जेंव्हा...
चंद्र आहे सोबतीला म्हणून चालतच राहावं...
भोवतालच्या गर्दीत ...
ओसवटत असत मन जेंव्हा ...
गाणं आहे सोबतीला म्हणून गुणगुणतच राहावं...
ना कोणाची चिंता, ना कोणाची याद...
आपलाच रास्ता ...इथे आपल्यालाच आपली साथ....
कधी कधी..
आपण आपल्या मस्तीत जगावं....

कोणी सांगत असत आपल्याला ..
मनातलं जेंव्हा.....
आपलाच आहे कोणीतरी म्हणून ऐकतच राहावं....
कधी सोबतीत तिच्या ...
किनाऱ्यावर रमताना..
साथ आहे तिची म्हणून बसूनच राहावं...
हातात तिचा हात,ती आणि मी दोघेही प्रेमात
अगदी हरवून जावं.....
कधी कधी...
आपण आपल्या मस्तीत जगावं....

आपल्याला आपल्या जगण्याचा भानच राहिलेलं नसत...
अजब गतीने धावणाऱ्या या जगात...
आपल्यालाच आपला विसर पडलेलं असत...
खरच.....मग कधीतरी...वेळ काढून एकांतात ...
स्वतःशी बोलावं....
जबाबदारींखाली दडलेल्या स्वप्नांना...
पुन्हा उमेदीचे पंख द्यावं...
ह्या जगण्यातील प्रत्येक क्षणांना....
आठवणींत जुंपावं....
आपल्या आयुष्यावर ..आपणच भरपूर प्रेम करावं....
आपण आपल्या मस्तीत जगावं...

Group content visibility: 
Use group defaults