काजूचा खरवस

Submitted by दिनेश. on 20 March, 2017 - 04:54
लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

Kkh vadya.JPG

१) १ वाटी साधे काजू ( साधे म्हणजे, न खारवलेले )
२) १ टेबलस्पून तांदूळ
३) १ टेबलस्पून ओले खोबरे ( पांढरे असावे, म्हणजेच पाठ घेऊ नये )
४) चवीप्रमाणे साखर
५) वासासाठी वेलची / केशर वगैरे
६) १ टिस्पून चायना ग्रास म्हणजेच अगर अगर ( ऐच्छिक.. टिप पहा )
७) थोडेसे तूप

Kkh Sahitya.JPG

क्रमवार पाककृती: 

१) काजू आणि तांदूळ, २ तास पाण्यात भिजत घालावेत मग निथळून घ्यावेत.
२) काजू, तांदूळ आणि खोबरे एकत्र करून अगदी बारीक वाटावे. वापरत असाल तर चायना ग्रासही त्यातच वाटावे.
वाटताना अगदी जरुरीपुरतेच पाणी वापरावे.
३) त्यात साखर मिसळून घ्यावी.
४) आता यात जरुर असेल तर थोडे पाणी मिसळावे. मिश्रण भज्यासाठी बेसन भिजवतो तितपत पातळ हवे.
( चायना ग्रास वापरले नसेल, तर मात्र ते त्यापेक्षा थोडे घट्ट ठेवावे लागेल ) या मिश्रणातच वेलची / केशर वगैरे मिसळून घ्यावे.
४) एका घट्ट झाकण असलेल्या डब्याला आतून थोडा तूपाचा हात लावून घ्यावा.
Kkh mould madhe.JPG

मी यासाठी एक खास पुडींगचे भांडे वापरलेय. या भांड्याचे झाकण क्लिप्स च्या सहाय्याने घट्ट बसते. त्याला रबर लायनींग नसते. पण त्याच्या खास डीझाईनमूळे आत पाणी जात नाही.
५) एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात खाली जाळी ठेवून किंवा कूकरमधे शिट्टी न लावता हे मिश्रण २० मिनिटे वाफवून घ्यावे.
६) भांडे पुर्ण थंड झाले कि याच्या वड्या किंवा तूकडे कापावेत.

Kkh baher.JPG

वाढणी/प्रमाण: 
८/९ तूकडे होतील
अधिक टिपा: 

Kkh close up.JPG

मिश्रण अगदी बारीक वाटणे गरजेचे आहे.
चायना ग्रास किंवा अगर अगर याच नावाने बाजारात मिळते. फोटोत दिसताहेत तसे त्याचे धागे असतात. एरवी ते कात्रीने कापून बारीक करून घ्यावे लागतात ( याची पावडरही मिळते ) या कृतीत मात्र ते कापायची गरज नाही.
हे समुद्री वनस्पतीपासून मिळवतात आणि शाकाहारी आहे. पण याला जिलेटीन म्हणणे चूक आहे.
जिलेटीन प्राण्यांच्या हाडापासून मिळवतात आणि माझ्या कल्पनेप्रमाणे ते सध्या भारतात वापरात नाही.
चायना ग्रास वापरून मिल्क पुडींग, खरवस, जेली वगैरे प्रकार करता येतात. याला स्वतःची चव, वास वा रंग नसतो.

माहितीचा स्रोत: 
त्यांना माहित आहे.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाॅव ! मस्त पाकृ ! चायना ग्रास कुठे मिळेल शोधल्यावर ते घालून करुन पाहीन पण त्याआधी बिगर अगर अगर करुन पाहण्यात येईल. भांड पक्क्या झाकणाच हव ना ? पाण्ययाच्या एवजी दुधात वाटलं तर ...

६) १ टिस्पून चायना ग्रास म्हणजेच अगर अगर ( ऐच्छिक.. टिप पहा )
चायना ग्रास किंवा अगर अगर याच नावाने बाजारात मिळते. फोटोत दिसताहेत तसे त्याचे धागे असतात. एरवी ते कात्रीने कापून बारीक करून घ्यावे लागतात ( याची पावडरही मिळते ) या कृतीत मात्र ते कापायची गरज नाही. <<<<

कृपयाच, याच्या पॅकेजचा फोटो द्यावा, म्हणजे तो छापुन घेऊन मार्केटमधे शोधता येईल.
आजवर मला हे मिळालेले नाहीये. प्लिजच पॅकेजचा फोटु द्या.

आभार पद्मावती,
मंजुतै, साध्या दुधापेक्षा नारळाचे दूध वापरून पहा.
लिंबू, रात्री घरी गेल्यावर देतो फोटो.

आभार...

सामी, चव थोडीफार तशीच लागते. अगदी ताजा चीक मिळाला तर त्याचा खरवस खुप घट्ट होतो ( तो किसणीवर किसता येतो ) तसा लागतो हा.
पण आपण सहसा करतो तो दुसर्‍या तिसर्‍या दिवशीच्या चिकाचा, तसा पोत यायला हवा तर अगर अगर वापरणे गरजेचे आहे. आणि मिश्रणही थोडे पातळ करावे लागेल.

मस्त दिसतोय काजूचा खरवस.

चायना ग्रास वापरून मिल्क पुडींग, खरवस, जेली वगैरे प्रकार करता येतात. याला स्वतःची चव, वास वा रंग नसतो.
<<

जर या चायना ग्रासला स्वतःची चव, वास वा रंग नसतो तर हा पदार्थ वापरण्याचा नेमका उद्देश काय आहे?

प्रसाद, याने द्रव पदार्थ एकत्र बांधला जातो. आणि चायना ग्रास वापरून फ्रिज न वापरता देखील पदार्थ "सेट" करता येतो.

पण मिळतात काजू त्यामूळे भारतातून आणलेले असे खास डिशेस साठी ठेवतो._____तसे नव्हे हो दिनेशदा.काजू नुसते खायलाही मस्त लागतात.माzyaकडे लगेच संपून जातात त्यामुळ असे राखून ठेवण्याऱ्याबद्दल मला नवल+आदर आहे.

असो.

मी पण नाही करणार. काजु म्हंटले की मला पुलाव्/बिर्याणी नाहीतर काजुकतलीच दिसते. नाहीतर नुसतेच खाते. खोबर्‍याचा काय उद्देश आहे ह्या रेसिपीत. चव इमॅजिन करुन पाहिली तर खोबरे नको वाटले. वेगन साठी खरवसाला छान पर्याय आहे मात्र.

छान दिसतोय.

>>अजुन एक छळ :रागः
सोपं आहे की स्वतः करून खायला. प्रॉब्लेम काय आहे मग? बर्‍याच रेसिप्यांवरच्या कॉमेंटस् पाहून रहावलं नाही Happy

मस्त दिसतंय.
चायना ग्रासचे प्रकार लहानपणी आमच्याकडे व्हायचे अधूनमधून. तेव्हा ते आवडायचेही. आताही चायनाग्रास वापरलेले विकतचे पुडींग वगैरे मजेने खातो तसे पण खरवस म्हटले की चिकाचाच हवा ... प्रॉब्लेम आहे की आजी गेल्यापासून घरी बनणे बंद झालेय आणि बाहेरूनच घ्यावा लागतो. मध्यंतरी झब्बूझब्बू खेळताना एक फोटो घेऊन टाकलेला मायबोलीवर, तेच इथे टाकायचा मोह आवरत नाही.. कारण खरवस नुसते बघूनच तोंडाला पाणी सुटते Happy
पण ते फोटोत दिसणारे पाणी माझ्या तोंडचे नाही, ते खरवसाला सुटलेले आहे Happy

kharwas.jpg

तूमच्याकडे दूधाचा करतात खरवस ? मला वाटलं चीकाचा करतात>> माझ्या अल्पमतीनुसार चीकाचे दुधच असते ना.

असो. तर काजु काय ते चायना ग्रास ते काय. वरीजनल ते वरीजनल. Happy चीकाच्या दुधापासुन मी बनवलेल्या खरवसाचा फोटो. Happy (दक्षीला अजुन त्रास Wink )

दिल जलता है तो जलने दो...

जलता है जिया मेरा भिगी भिगी रातों में अशी काय पण गाणी आठवायला लागली आहेत खरवसाचे फोटु पाहुन. चायना ग्रास नक्कीच मिळेल. करुन बघता येईल. पण दिनेशजी खोबर्‍याचे प्रयोजन नाही समजले, ते टाकले नाही तर चालेल का?

बाकी सारे फोटु माधुरी दिक्षीत आहेत.

Pages