२६ जानेवारी २०१७ प्रजासत्ताक दिन परेड @ राजपथ,दिल्ली ,भाग 3

Submitted by sariva on 19 March, 2017 - 09:22

तोफांची सज्जता

मुख्य कार्यक्रमाची वाट बघणारे आम्ही


हा कार्यक्रम यशस्वी करण्यात केवळ संरक्षण मंत्रालयाचाच नव्हे,तर दिल्ली पोलीस,CPWD व अनेक सरकारी कार्यालयांचा सहभाग असतो.कार्यक्रमाची पूर्वतयारी दोन-अडीच महिने आधीच सुरू होते.
या कार्यक्रमात मान्यवरांपैकी कुणी केव्हा यायचे,कोणी कोणाचे कोणत्या क्रमाने स्वागत करायचे वगैरेचे सर्व प्रोटोकॉल्स तंतोतंत,अगदी शिस्तीत पाळले जातात.
राजपथाच्या पूर्वेला आहे इंडिया गेट,तर पश्चिमेला राष्ट्रपतीभवन.कार्यक्रमाची वेळ जवळ येऊ लागताच पंतप्रधानांच्या व इतर गाड्यांचा ताफा इंडिया गेटकडे आमच्या समोरून दिमाखात रवाना झाला. आम्ही त्याची व्हिडिओ क्लीप काढली.
इंडिया गेटचा पाया 1921 साली रचला गेला व 1931 मधे व्हाइसरॉयने ते राष्ट्राला सुपुर्त केले.याची उंची 42 मीटर असून त्याचा वरील भाग सांचीच्या स्तुपाच्या घुमटाशी साम्य दर्शवितो.त्याखालील भाग आयताकार आहे. पहिल्या महायुध्दातील व अफगाणी युद्धातील शहीद जवानांची नावे यावर कोरली आहे. भारत-पाक युध्दानंतर पंतप्रधान इंदिरा गांधीच्या काळात सतत तेवत असलेली अमर जवान ज्योतही इथे आली. उलट्या बंदुकीवर असलेल्या हेल्मेटची प्रतिकृती येथे आहे.
ज्यांच्यामुळे आपण सुखाने रहात आहोत,अशा सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंतप्रधान, तिन्ही संरक्षणलांचे अधिकारी तिथे गेले.गार्ड ऑफ ऑनर नंतर शहिद सैनिकांना 2 मिनिटांचे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.नंतर तेथील ceremony book मधे पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व स्वाक्षरी केली व मग हा ताफा मुख्य मंचाकडे परतला.या सर्वाचे काही स्क्रीन शॉटस्.







त्याच वेळी इकडे राष्ट्रपतीभवनातून प्रमुख पाहुण्यांसह कार्यक्रमाकडे येण्यासाठी सन्मानपूर्वक निघाले होते.त्यांच्या गाड्यांसोबत उमद्या घोड्यांवर आरूढ झालेल्या त्यांच्या अंगरक्षकांचा खास ताफा होता.
तोपर्यंत इकडे उपराष्ट्रपतींचे आगमन झाले होते. तेवढयात 'अथ स्वागतम्..सुखस्वागातम्' या गाण्याचे सूर ऐकू येऊ लागले व त्यांनी राष्ट्रपतींच्या आगमनाची वर्दी दिली. त्यांचे आगमन होताच पंतप्रधांनी त्यांचे व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.नंतर पंतप्रधानांनी त्यांना संरक्षण मंत्री,संरक्षण राज्य मंत्री,तिन्ही सेनादलांचे प्रमुख व संरक्षण सचिव यांचा परिचय करून दिला. मग सर्व जण मंचाकडे गेले व स्थानापन्न झाले.त्याचे काही स्क्रीन शॉटस्.


3



7
8

मग राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. त्याच वेळी राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांनी राष्ट्रीय सलामी दिली,बँडवर राष्ट्रगीताची धून वाजवली गेली,21 तोफांची सलामी देण्यात आली व उपस्थित सर्वांनीच झेड्याला अभिवादन केले.हे क्षण अतिशय रोमांचकारी होते.देशप्रेमाने व अभिमानाने ऊर अगदी भरून आला!

1अंगरक्षक ताफा
३ बँड पथक
४ फडकणारा झेंडा
५ राष्ट्रध्वजाला सलामी
६ २१ तोफांची सलामी


नंतर प्रेझेंटेशन सेरेमनी झाला.अतिशय प्रतिष्ठेचे असलेले highest peace time gallantry award अशोकचक्र हवालदार हंगपन दादा यांना कुपवाडा येथील अतिरेक्यांशी लढताना अतुलनीय साहस व शौर्य दाखविल्याबद्दल मरणोत्तर प्रदान करण्यात आले. ते वीरपत्नी श्रीमती चेसन लुवंग दादा यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारले. तो क्षण अभिमानास्पद असला,तरी अतिशय भावुक होता! त्याचे काही स्क्रीन शॉटस्.



नंतर वायुसेनेच्या MI 17 V 5 या प्रकारच्या 4 हेलिकॉप्टर्सनी 80 किमी च्या वेगाने येऊन,उलट्या वाईन ग्लासच्या आकारात formation करत कार्यक्रम स्थळी पुष्पवृष्टी केली! सर्वात पुढच्या विमानाला राष्ट्रध्वज लावला होता,त्याच्या मागे स्थलसेना,मग नौसेना व वायुसेना यांचे ध्वज असे क्रमाने उरलेल्या तिघांना लावले होते.

काही मोबाईल क्लिक्स १



अशा प्रकारे 26 जाने.च्या परेडला प्रारंभ झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच.