महिला दिन

Submitted by snow_white on 9 March, 2017 - 09:10

शुभेच्छा देण्या- घेण्यात गेला
कालचा वेळ सारा,
मोठ्या थाटात केला
आम्ही महिलादिन साजरा...

कुठे स्त्रियांचं कौतुक झालं
कुठे खोचक टोमणे,
वूमन्स डेच्या निमित्ताने लिहिलं
कुणी भरून पाने...

काही स्त्रिया मुक्त,
काहींचा स्वैराचार,
आधुनिकतेच्या नावाखाली
काहींचा हाहा:कार...

काही प्रगतीच्या शिखरावर,
काहींची यशस्वी वाटचाल,
काही अजूनही बंधनात,
बदलला जरी काळ...

काही जणींची उत्तुंग भरारी
आकाशाला भिडते,
कुठे अबोल कळी अजूनही
गर्भातच खुडली जाते...

परिस्थिती सगळी पाहून
मन गोंधळून गेलं,
स्त्रीचं सामर्थ्य खरंच
तिला तरी आहे का कळलं?

पुरुषांशी चढाओढ
म्हणजे सक्षम असणं
की बिकट प्रसंगात
एकमेकींना बळ देणं?

परंपरांना वाईट म्हणून
कुणी मॉडर्न होत नाही,
जुन्या-नव्याचा मेळ बसवणं
अजूनही आपल्याला जमत नाही...

सासू-सून मालिका अजून
घराघरात रंगतात,
पुरुष बिचारे काय करणार,
तेही गंमत बघतात...

आपलंच आपल्याला शोधायचंय
उत्तर सगळ्या प्रश्नांचं,
यांच्याशिवाय काय वेगळं
प्रयोजन महिला दिनाचं?

एकमेकींना देऊ आधार,
घडवूया नवा इतिहास,
पुरुषही आहेतच सोबत, एकदा
घेऊया तरी नव्या बदलांचा ध्यास...

-पल्लवी

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपलंच आपल्याला शोधायचंय
उत्तर सगळ्या प्रश्नांचं,
यांच्याशिवाय काय वेगळं
प्रयोजन महिला दिनाचं?
......१११+

bhari