आज हि दिवस गेला निघुनी ........

Submitted by पोलेकर प्रसन्न on 8 March, 2017 - 05:44

हळूच उतरते हि पिवळी झळाळी...लखलखती हि दुनिया सारी ....
घिरघिर परतती थव्याने पाखरे.मोकळाल्या दिशाच चारी...
दिवस पाहता दिनकर त्या..दिसे जणू तो माणिक मोता .
कसा बरे मोठा वाटतो ? सांजवेळी....तो जाता जाता ...
मनास पसरे एकांत हा....दूर दूर भासते शांतता ...
क्षणात पुन्हा हे आठवून येते ...
आज हि दिवस गेला निघुनी
....

पहाट होते रोज रोज हि...दिवस नव्याने पुन्हा सुरु हा ..
ठरवुनी पुन्हा आज मनी या...जे कधी नाही केलं ते आज करा ..
पण इथे ...स्वप्नांना तर जागाच नाही ...
धावते हि दुनिया ..म्हणून आपंणही ....
हरवून जातो ओघात ह्या ..
आठवणच रहात नाही जगण्याची
क्षणात पुन्हा हे आठवून येते ...
आज हि दिवस गेला निघुनी ....

कधी मायेची,कधी आशेची ,
उरात बसल्या त्या भावनांची ..
सोबत झटकतो जाणिवांना ...
काही सुखाच्या हव्यासापोटी ...
मुळीच नसते आठवण हि पाप आणि पुण्याची ...
दिवस मागून दिवस निघून जातो ..
आज हि दिवस गेला निघुनी........

आपल्याला ज्यांनी निर्माण केलय त्याची आपल्याला जाणीवच नसते ..
लोभाच्या पोटी तर वासनेच्या घोटी ...
माणसा मधली मणुकीचं संपते ....
कुणी जगडतो न्यायासाठी तर मरतो अन्याया हाती ...
जग हे कुठे तरी संपणारच आहे ...त्यासोबत माणूसही ...
करा असे कर्म आज काही ...
जग आठवेल 'आज 'गेला निघुनी...जरी ...

Group content visibility: 
Use group defaults