मॄत्युनन्तर ?

Submitted by स्वामी विश्वरूपानंद on 7 March, 2017 - 02:08

http://www.maayboli.com/node/61904 या धाग्यावरून प्रेरणा

१. मॄत्युनन्तर एखाद्या व्यक्तीला परलोकात मुक्ती मिळाली की नाही? त्याची सध्याची अवस्था काय आहे? त्याला काही क्लेश होत आहेत का? बन्धने आहेत का? हे समजण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत?

२. अशा मुक्ती न मिळालेल्या अथवा परलोकात सद्गती / मोक्ष , मुक्ती , पुनर्जन्म न मिळालेल्या दुर्दैवी आत्म्यासाठी त्याच्या नातेवाईक / सुह्रुदाना काय , कुठे व कसे करता येईल?

३. आधुनिक विज्ञानाने स्किझोफ्रेनिया असे लेबल लावले असले तरी काही व्यक्तीना खरेच परलोकीय दुष्ट शक्ती / दुरात्म्यांकडून त्रास होत असल्याची उदाहरणे आहेत , त्यानी काय उपाय करावेत?

मला माहित असलेले उपाय नन्तर सान्गतो. आपणास माहित असलेले उपाय जरूर सांगावेत

आगावू धन्यवाद

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देऊ पाहिले, तर "अंधश्रद्धानिर्मुलनवाल्यांच्या हातात कोलित" दिल्यासारखे होउन निधर्मीवाद्यांच्या झुंडीच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागु शकते.
याव्यतिरिक्त, दिलेल्या उत्तराच्या पोस्टी कोणतेही कारण न देता/ किम्वा कोणतेही सबळ कारण नसतानाही उडविल्या जाऊ शकतात.
सबब मी तुमच्या प्रश्नांस उत्तर देत नसुन, केवळ वरील प्रश्नांबाबतचे माझे बुद्धिस पटलेले, व प्रश्न वाचल्याने त्यामुळे माझे मनात उद्भवलेले "माझे वैचारिक मत मांडीत" आहे. वाचकांस सुचना आहे की हे माझे मत आहे, व "त्याप्रमाणेच वागा" अशी कोणतीही प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सूचना या पुढील मजकुरात अपेक्षित नाही.

>>>>> १. मॄत्युनन्तर एखाद्या व्यक्तीला परलोकात मुक्ती मिळाली की नाही? त्याची सध्याची अवस्था काय आहे? त्याला काही क्लेश होत आहेत का? बन्धने आहेत का? हे समजण्याचे कोणते मार्ग उपलब्ध आहेत? <<<<<
हा तुमचा प्रश्न, व त्यावरील माझे मनात उद्भवलेले माझे विचार असे:
मुळात अशी मुक्ति वगैरे काही असते का, वा हे केवळ थोतांड आहे याचा विचार करु पहाता, भगिरथाच्या कथेपर्यंत मागे जावे लागते, व हिंदू कथा/पुराणांत/वेदांगात, जन्म/पुनर्जन्म यामधली अवस्था वर्णन केलेली आढळते.
अमुक व्यक्तिस मुक्ति मिळाली वा कसे हे आजच्या "उपलब्ध/ज्ञात स्मृतित असलेल्या" शास्त्रावरुन सांगणे अवघडच नव्हे, तर अशक्य आहे. मात्र पूर्विचे काळी हे ज्ञान नव्हतेच असे म्हणणेही धाडसाचे ठरेल, कालौघात या बाबी विस्मृतीत गेल्या वा नष्ट करण्यात आल्या.
मात्र, तरीही, आजही, कुंडलीतील विशिष्ट ग्रहयोगांमार्फत, जिवंत व्यक्तिच्या पूर्वजांमध्ये कोणी अतृप्त राहिले असल्यास ते दृगोच्चर होते, व त्यावरील उपाय (पितरांस तर्पण) वगैरे केले न गेल्यास पुढील पिढ्यांमधिल कुंडलीमध्ये ते दृगोच्चर होत रहाते.
याव्यतिरिक "प्लँचेट" वगैरे उपाय असू शकतात, पण मला त्यात तितकीशी गति नाही.

>>>>> २. अशा मुक्ती न मिळालेल्या अथवा परलोकात सद्गती / मोक्ष , मुक्ती , पुनर्जन्म न मिळालेल्या दुर्दैवी आत्म्यासाठी त्याच्या नातेवाईक / सुह्रुदाना काय , कुठे व कसे करता येईल? <<<<<
हा तुमचा प्रश्न, व त्यावरील माझे मनात उद्भवलेले माझे विचार असे:
अशांसाठीच नव्हे, तर एकंदरीतच धर्मशास्त्राने, पूर्वजांकरीता, नियमितपणे पाण्याचे तर्पण सांगितले आहे. सूर्यास अर्घ्य द्यायचे वेळेस, त्यानंतर पूर्वजांकरताही अर्घ्य द्यावे. इतकेच नव्हे, तर "काकबळी" मार्फत त्यांना अन्न/पाणी पुरवावे असेही सांगितले आहे. शास्त्र इतकेही म्हणते की, एखादी जिवित व्यक्ति आर्थिक विपन्नावस्थेमुळे यातिल काहीच करु शकत नसली, अगदी वेळेस चार पळ्या पाणीदेखिल सोडू शकत नसली, तरी, दिवसाच्या ठराविक वेळेस पूर्वजांचे आंतरीक स्मरण देखिल त्या त्या पूर्वजांचे मुक्तिस सहाय्यभूत ठरू शकते.

>>>>३. आधुनिक विज्ञानाने स्किझोफ्रेनिया असे लेबल लावले असले तरी काही व्यक्तीना खरेच परलोकीय दुष्ट शक्ती / दुरात्म्यांकडून त्रास होत असल्याची उदाहरणे आहेत , त्यानी काय उपाय करावेत? <<<<<<
हा तुमचा प्रश्न, व त्यावरील माझे मनात उद्भवलेले माझे विचार असे:
श्री दत्तगुरुंचे /श्री स्वामी समर्थांचे जाग्रुत देवस्थानी जावे, श्री दत्त उपासना करावी. याव्यतिरिक्त मुटके ओवाळून टाकणे, दृष्ट काढणे, वगैरे परंपरागत उपाय असतातच.

धन्यवाद लिम्बाजीराव
खूप खूप आभार
अन्धश्रद्धावाल्याना भ्यायचं कारण नाही

असो, आणखी काही प्रतिसादांच्या प्रतीक्षेत

समजा मुक्ति मिळालीच नाही तर काय होते? म्हणजे आत्मा भूत बनून लोकांना त्रास देतो का? कुणाला?
मला हा प्रश्न विचारण्याचे कारण आमच्याकडे उगीचच आळशीपणाने (हो आळशीपणामुळेच) काही जास्त धार्मिक सोपस्कार करायचे नाहीत असे गेले दोन पिढ्या चालू आहे. आमच्यानंतरच्या पिढीला काहीच माहीत नाही नि करून घेण्याची इच्छा नाही.
तेंव्हा लवकरच मी मेल्यावर माझ्या आत्म्याचे काय होणार?
माझ्या मते माझ्या आत्म्याचे काय करायचे ते मलाच जिवंतपणी करावे लागणार. तर मी दररोज आपला गणपति स्तोत्र, रामरक्षा वगैरे म्हणतो. मनापासून म्हणायचे जमले तर कदाचित फायदा होईल नाहीतर माझा आत्मा भविष्यातले नवे काँप्युटर, परग्रहावरील वस्ति, असे काही काही बघेल, अत्यंत वेगाने जाणारी रॉकेट्स यांच्यात बसून मज्जा करत बसेल. अणुयुद्धा झाले तरी माझा आत्मा तसाच.
मग कधीतरी जगबुडी झाली, सगळे आत्मे एकत्र झाले की मी पण जाईन.

>>> माझ्या आत्म्याचे काय होणार? <<<<
(तुम्ही २००५ मध्ये प्रत्यक्ष भेटीत या वा तत्सम विषयास स्पर्श केला होता, व त्यावेळच्या माझ्या अपुर्‍या ज्ञानानुसार काही एक उत्तरे दिली होती, आजही तसाच प्रयत्न करीत आहे, आशा आहे, की २००५ मधिल माझ्या उत्तरांपेक्षा आताची उत्तरे अधिक अचुक ठरावित. )

शास्त्रामध्ये, व्यक्तिस स्वतःचे श्राद्ध स्वतःच करण्याची सोय आहे, व बहुधा ते "गया" क्षेत्री करुन दिले जाते.

याव्यतिरिक्त, मनुष्यास चार आश्रमातुन जगण्याचा प्रवास करण्याचे सांगितले आहे, त्यातिल शेवटचा सन्यस्त/वानप्रस्थाश्रम निवडताना, (सन्यास घेताना) स्वतःचे श्राद्ध करण्याचे सांगितले आहे.
अर्थात, वरील विधी हे "तंत्रविधी" असुन, ते , त्या त्या व्यक्तिस, चालू जीवनातील षडरिपु/वासना या पासुन स्वतःचे मनास अलग करण्यास सहाय्यभूत ठरावेत इतकाच त्यांचा उपयोग.

हे विधी न करताही व्यक्ति चालु जीवनापासुन, मनोविकारांपासुन, षडरिपुंपासुन, वासनांपासुन, दैहिक जाणिवा/गरजा/आसक्तिपासुन, अलिप्त/अलग /तटस्थ जगु शकायला लागली असेल, तर ती ती व्यक्ति (किंबहुना व्यक्तिचा आत्मा) जिवंतपणीच "मुक्त" स्वरुपात आहे असेही मानले जाते. अर्थात, अशा व्यक्ति सापडण्याचा प्रसंग विरळाच.

याव्यतिरिक्त, (आधी कशीही जगली असली तरी) प्रत्यक्ष मृत्युसमयी, जर इशचिंतन घडले, तरी देखिल ती व्यक्ति मुक्ततेस पात्र होते असे शास्त्र सांगते. अडचण इतकीच असते, की आधीच्या कशाही जगण्याच्या संस्कारांमुळे, व्यक्तिस मृत्युसमयी इश्वर आठवेलच याची खात्री देता येत नाही, अन म्हणून शास्त्रांनी अजपाजप स्वरुपात इश्वराचे "नामस्मरणाची" सवय लावुन घेण्यास सुचविले आहे. अनेकानेक संतमहंत/वारकरी संप्रदाय नामस्मरणाचे उच्चरवाने समर्थन करतो तो याच कारणाने.

शास्त्र असेही मानते, की मृत्युनंतर, व्यक्तिचा "आत्मा" षडरिपु/वासना/दैहिक जाणिवा /दैहिक आसक्ति, यापासुन वेगळा होत नाही, किंबहुना, या बाबी त्याचेबरोबर चिकटुन रहातात, व त्यामुळे त्यास मुक्ति मिळणे अशक्य होऊन, जन्मपुनर्जम्नाच्या फेर्‍यात तो अडकतो. त्यातुन मुक्त होण्यास त्यास सहाय्यभुत ठरण्याकरता मृत व्यक्तिबाबत श्राद्ध / तर्पण आदी विधी अन्य जिवित व्यक्तिंनी करणे अपेक्षित असते.

या "षडरिपु/वासना/दैहिक जाणिवा /दैहिक आसक्ति," यासच "मायास्वरुप" मानले गेले आहे. मी संपत्ती कमावली, घरदार केले, कपडे लत्ते केले, जमिनजुमला घेतला, पैशांच्या थप्प्या घरात लावल्या, तरीही मृत्युसमयी मी त्यातिल कवडीही बरोबर घेऊन जाऊ शकत नाहि, हे समजुन घेतले तर बरेच जणांना सहज पटते. पण याचबरोबर, या दृष्य स्थावर/वस्तुरुपातील मालमत्ते बरोबरच, आपण रोजच्या जगण्यात असंख्य "मानसिक स्वरुपातिल आसक्तिंचाही" संग्रह केलेला असतो, त्यात जीव गुंतवलेला असतो. मृत्युसमयी, इतक्या असंख्य बाबींमधुन आपली आसक्ति/गुंतलेला जीव वेगळा करुन घेणे अशक्य होते, व त्या त्या आसक्ति मृत्युनंतरही सोबत येतात व व्यक्तिस परत जन्ममृत्युच्या फेर्‍यात अडकण्यास भाग पाडतात. तेव्हा जिवंत असतानाच, कर्तव्ये करत राहुनही, जीव कशातच आसक्ति रुपात न अडकवणे, याकरता विशेष प्रयत्न करावे लागतात. सूक्ष्मपणे विचार करता कळते की याच प्रयत्नांवर आधारित हिंदु धर्मातील विविध रितिरिवाज्/विधी/मंत्र-तंत्र/कृत्ये आहेत आणि व्यक्तिने ते व्यक्तिशःच अंमलात आणणे आवश्यक असते (अन याचमुळे हिंदू धर्मावर एक आरोप केला जातो की हा धर्म "केवळ व्यक्तिच्या भल्याची उठाठेव करतो, समुहाचि नाही - पण इथे असे आहे, की गाणे शिकायचे, तर व्यक्तिस स्वतःलाच घसा मोकळा करुन सराव करुन सूर लावल पाहिजे, ते गायकीचे ज्ञान स्वतःलाच मिळवावे लागेल, इतरजण फार फार तर दुरुन सहाय्य करतील, तोच प्रकार पोहोणे शिकण्याचा, प्रत्यक्षात स्वत: पाण्यात उतरल्याखेरीज पोहोणे येणे अशक्य, तेव्हा हिंदु धर्मातील ही संकल्पना समजुन घेण्यास्/घेतल्यावरही, स्वतः स्वतःकरताच प्रत्यक्ष प्रयत्न न करताच काही एक होणे ही अपेक्षा चुक आहे ).

जसे सुचले, तसे मांडले, हिंदु धर्मशास्त्र अभ्यासकांनी चु.भु.द्या.घ्या.

लिंबूटिंबू. अनेक धन्यवाद. तुमची हरकत नसेल तर मी हे माझ्या इतर मित्रांनाहि सांगेन.
अन म्हणून शास्त्रांनी अजपाजप स्वरुपात इश्वराचे "नामस्मरणाची" सवय लावुन घेण्यास सुचविले आहे.
म्हणूनच मी रामरक्षा इ. म्हणतो, पण काहीतरी साधे सुटसुटित नाव घ्यावे असे मनात येते. ओं नमः शिवाय, श्री राम जयराम, श्री हरी श्री हरी यातले काय म्हणावे असा आधी प्रश्न होता, मग लक्षात आले की काय हा वेडपटपण! या सगळ्यात काही फरक आहे का? जेंव्हा जे मनात येईल तेंव्हा ते म्हणावे. बरोबर ना?
आपण रोजच्या जगण्यात असंख्य "मानसिक स्वरुपातिल आसक्तिंचाही" संग्रह केलेला असतो,
पूर्ण दुजोरा, अनेक टाळ्या.
त्या त्या व्यक्तिस, चालू जीवनातील षडरिपु/वासना या पासुन स्वतःचे मनास अलग करण्यास सहाय्यभूत ठरावेत इतकाच त्यांचा उपयोग.
अगदी पटले. लोक उगाचच हिंदू धर्माला हसतात, नावे ठेवतात की ही एव्हढी रिच्युअल्स कशाला? पण समजून घेत नाहीत. अनेक वर्षे पूजा करताना सुद्धा कधी कधी आज रात्री चिकन कर बरं का म्हणणारे लोक पाहिले आहेत.
कसली डोंबलाची पूजा ती? त्यापेक्षा न केलेली बरी! म्हणूनच श्राद्ध इ. करणार्‍यांबद्दलहि शंका येते की हे खरेच मनापासून करताहेत, की कधी एकदा संपवतो नि दारू प्यायला मोकळा होतो असा विचार करताहेत. मग का, माझा आत्मा म्हणेल, मला विसरू नका बरं का. मीहि आहे इथेच!
स्वतः स्वतःकरताच प्रत्यक्ष प्रयत्न न करताच काही एक होणे ही अपेक्षा चुक आहे
पूर्ण खरे.
हा धर्म "केवळ व्यक्तिच्या भल्याची उठाठेव करतो, समुहाचि नाही
साफ खोटा आरोप! दोन्ही करता येते पण दुसर्‍याला सुधारण्या आधी किंवा बरोबर स्वतःला सुधारणे तितकेच आवश्यक आहे.

पण अखंड नामस्मरण हे अगदी सोपे व सहज करता येण्याजोगे आहे, आठ दहा तासात निदान एक दोन मिनिटे तरी मनाचे कॉन्सेन्ट्रेशन झाले, ऐहिकाचा विसर पडला, तरी भले होईल. हळू हळू मिनिताचे तास होतील.
श्री राम जयराम जयजय राम, श्री हरी जय हरी जयजय श्रीहरी, ओं नमःशिवाय!

आत्मा म्हणजे चैतन्य म्हणजेच उर्जा !
उर्जा कधी नष्ट होत नाही, तिचे केवळ रुपांतर होते. जर हे सायन्स चुकीचे नसेल तर आत्मा भटकतो हे नक्की.
जगात देव असो वा नसो. बहुतेक नाहीयेच. उगाच कोणीतरी आपल्याला पोसायला बसलाय अश्या भ्रामक समजूतीत जगण्यात काही अर्थ नाही. असो, पण आत्मा हा मात्र असतोच.

आता हा शरीरातून बाहेर पडल्यावर जातो कुठे? माझ्या तर्कानुसार हा अश्या जागी जातो जिथे हवा, पाणी, उजेड, उष्णता यापैकी काहीही नसते. जर तिथे त्याला काही कारणाने जाता नाही आले तर तो अडकतो.

उर्जा म्हणजे पदार्थविज्ञान शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उष्णता, विद्युत इ.? की आणखी काही वेगळीच? हे जर नक्की सांगता येत नसेल तर उर्जा म्हंटले काय नि चैतन्य काय नि आत्मा काय, नुसते शब्द.
आणि मग ती उर्जा अडकते ती जिथे अडकते तिथे काय करते, म्हणजे उर्जा आहे तर काहीतरी, कुठेतरी फरक पडेलच.
हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार न झाल्याने तशी बरीचशी उर्जा इकडे तिकडे अडकली असेल, ती जमा करून काही उपयोगात आणता येईल का?
तसे जमले तर कचरा सरसकट फेकून देण्या ऐवजी कायद्याने रिसायकल करतात तसे कायद्याने अंत्यसंस्कार बंद करून सगळी उर्जा रिसायकल करावी.
सरकार इकडे लक्ष देईल का?

उर्जा म्हणजे पदार्थविज्ञान शास्त्रात सांगितल्याप्रमाणे उष्णता, विद्युत इ.? की आणखी काही वेगळीच? हे जर नक्की सांगता येत नसेल तर उर्जा म्हंटले काय नि चैतन्य काय नि आत्मा काय, नुसते शब्द.
आणि मग ती उर्जा अडकते ती जिथे अडकते तिथे काय करते, म्हणजे उर्जा आहे तर काहीतरी, कुठेतरी फरक पडेलच.
हिंदू धर्माप्रमाणे अंत्यसंस्कार न झाल्याने तशी बरीचशी उर्जा इकडे तिकडे अडकली असेल, ती जमा करून काही उपयोगात आणता येईल का?
तसे जमले तर कचरा सरसकट फेकून देण्या ऐवजी कायद्याने रिसायकल करतात तसे कायद्याने अंत्यसंस्कार बंद करून सगळी उर्जा रिसायकल करावी.
सरकार इकडे लक्ष देईल का?

आधुनिक विज्ञानाने स्किझोफ्रेनिया असे लेबल लावले असले तरी काही व्यक्तीना खरेच परलोकीय दुष्ट शक्ती / दुरात्म्यांकडून त्रास होत असल्याची उदाहरणे आहेत , त्यानी काय उपाय करावेत? >>>>>
यावर काही लिहीणं म्हणजे........
तरी लिहीतो

विज्ञान ठरवतं स्किझोफ्रेनिया! लोकं म्हणतात, वेड लागलंय वा डोक्यावर परिणाम झालाय. प्रत्यक्ष वेगळंच घडल-घडवलेलं असतं.

आपल्या तंत्र, मंत्र, यंत्र इ. मार्गांचा वापर करून घेऊन असल्या व्यक्तीच्या सप्तचक्रांना (एखाद्यादुसर्या तसेच कधीकधी सर्वच) नियंत्रित केलेलं असतं किंवा त्यांच कार्य बंद पाडलेलं असतं.

असं केल्यावर काय घडतं याची उदाहरणे―

१. एखादा चांगला हुशार माणूस काहीतरी अनाकलनीय बोलू वागू लागतो.
२. आईचे, गायांचे दुध देणारे स्तन एकाएकी आटतात.
३. एखादा माणूस बुद्धि भ्रमित होऊन घरदार सोडून निघून जातो.
४. एखाद्याला असाध्य पोटदुखी जडते.
५. घरातील मुलं कधी नव्हे ती म्हतार्या आईबापाला मारझोड करायला लागतात. आईबाप हतबल होऊन सहन करायला शिकतात.
६. सामान्य शरीर असलेली व्यक्ती वेडाचा झटका आल्यानंतर पंधरा विस जणांना आवरत नाही.
७. एखाद्याला स्वप्नं पडतात, ज्यात कोणीतरी दिसतं ते म्हणत असतं, 'आठ दिवसांत तुझा खेळ संपला.' , 'मी तुला न्यायला आलोय', 'तुला घेऊन जाणार' आणि खरोखरच चार आठ दिवसांत काहीतरी निमीत्त होऊन ती व्यक्ती मरण पावते.
८. एखाद्याचं अचानक दुखायला लागतं ,असाध्य रोगाचं निदान होऊन उपचार सुरू होतात तरीही केवळ दोनचार महीन्यांत तो सडून मृत्यु पावतो.

उपाय―

आहेत, असतात.

त्या उपचारांचे मार्गही वेगवेगळे आहेत.

तुमचं दुसर्याला द्यायचं की सहन करत संपवायचं हे आपल्या सद्विवेक बुद्धीनं ठरवायचं असतं.
ज्यानं केलंय त्यालाच द्यायचं ठरलं तर मग झटक्यात गुण!!!!!

जिवावरचं नसेल तर भोगून संपवायचं ? , 'धन्य तो पुण्यात्मा!'

खर्चं―
काहीही येत नाही. पण,
[जगातल्या यच्चयावत भोंदूगिरीचं मुळ पैसा आहे. Lol ]

जनसामान्यांचा, वरील उदाहरणांतील दीनदुबळ्यांचा, हतबल जिवांचा कळवळा बाळगणार्या गुरूशिष्य परंपरेतून चालवल्या जाणार्या नाथपंथाच्या नि: स्वार्थी गाद्या ह्या पिडीत जिवांना पिडेतून सोडवायचं काम करतात.
आता बाजारूपणा वाढलाय, पण जगाच्या कल्याणाकरता शाबरी विद्या निर्माण करणार्या नवनाथ सिद्धांना 'नि: स्वार्थ जिवसेवा' हाच एकमेव उद्देश्य अभिप्रेत होता-आहे. नवनाथ सिद्ध आजही हे कार्य घडवून घेतात.

[तळटिप- मी कसलंही मार्केटिंग करत नाहीये. जे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलंय, अनुभवलंय तेच मांडलंय.]

यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : ||

अर्थ

जीवनात सुखेनैव जगावे. गरज पडल्यास कर्ज काढून तूपरोटी खावी. एकदा देहाची राख झाल्यावर परत कोण येणार आहे?
हा चार्वाकाचा श्लोक असून त्यात संपूर्ण इहवादी तत्वज्ञान सांगितले आहे.

"यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् |
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुत : ||"
याचा या धाग्याशी काय सम्बन्ध असावा बरे???????

याचा या धाग्याशी काय सम्बन्ध असावा बरे??????? >>>
घाटपांडे सरांनी तो प्रतिसाद माझ्या पोस्टीवर दिलेला असावा, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी!!!

"घाटपांडे सरांनी तो प्रतिसाद माझ्या पोस्टीवर दिलेला असावा, अंधश्रद्धा निर्मुलनासाठी!!!"
राहुलजी,
तुमच्या पोस्ट मध्ये कुठली अन्धश्रद्धा असावी बरे ?

मला वाटतं, श्रद्धा-अंधश्रद्धा व्यक्तीसापेक्ष असतात. एखाद्याची श्रद्धा दुसर्याला अंधश्रद्धा वाटू शकते किंवा याऊलट. मी मुळ लेखातील ज्या प्रश्नावर पोस्ट लिहीली आहे, तो मुळ मुद्दा काही लोकांच्या दृष्टीने पुर्णत: अंधश्रद्धा ठरतो आहे. म्हणून मला तसं वाटलेलं...
असो.

लिम्बूटिम्बूजी , नन्द्या ४३जी आणि राहुलजी खूप खूप धन्यवाद ...
बर्‍याच दिवसानी माबोवर आल्याने आज धागा वर आलेला पाहिला
चांगली चर्चा चाललीय ...

कुणाला मृत्युनंतरचा काही अनुभव आला असेल तर इथे शेअर करा.

आमच्या आश्रमातील एक साथी संन्यासी १९९८ मध्ये ट्रेन मधून कुर्ला ते ठाणा प्रवास करत होता . आसनगाव ट्रेन आणि सन्ध्याकाळी ८ ची वेळ . त्यामुळे तुफानी गर्दी होती . कसाबसा चढून दारात लटकून राहिला. त्यावेळी बहुधा प्लाट्फॉर्म छोटे असल्याने ट्रेन ठाण्याला दोनदा थाम्बायची, हे माहित नसल्याने उतरताना गडबड होवून मित्र ट्रेनच्या दारातून प्लॅटफऑर्म वर आदळला व डोके जोरात आपटून बेशुद्ध पडला . नाकातोन्डातून पाणी येत घोते पण रक्त येत नव्हते. बाकीच्यानी बाजूला घेवून पाणी मारले तेव्हा पन्धरा मिनिटानी शुद्धीवर आला .

नन्तर त्याने सान्गितले की पडल्यावर काही सेकन्दात त्याला डोक्यावर आपटले एवढेच समजले आणि त्या धक्क्यासरशी तो (आत्मा)शरीरातून बाहेर पडला . आपले शरीर वरून सुमारे १० फुटावरुन तो पाहू शकत होता . लोक त्याला जागे करण्याचा प्रयत्न करत होते हे त्याला दिसत होते. तसेच तो ठाण्याला ज्या ब्रह्माण्ड सोसायटीत जाणार होता त्या मार्गाने तो काही मिनिटात जावुन आला आणि परत शुद्धीवर आल्यावर जेव्हा रिक्शाने ब्रह्मान्ड ला गेला तेव्हा हा सर्व मार्ग मी आधी पाहिला आहे व आत्ताच काही वेळापूर्वी मी इथे येवून गेलो ,असे त्याला जाणवत होते .(प्रत्यक्षात तो त्याआधी कधीच ठाण्याला अथवा ब्र्ह्मान्ड ला गेलेला नव्हता कारण तो दिल्लीकर होता.

अशा अनुभवाना NDE Near Death Experience किंवा Astral Projection अशाही संज्ञा आहेत

मी खाजगी स्वत:चे अनुभव विचारले. इतरांचे नव्हे
>> खरेच इंटरेस्ट आहे का खुस्पटे काढायची आहेत? थोतांडच आहे हे स्वत:ला पटवायचे आहे?
वेगवेगळी उत्तरे येतील त्यानुसार.

स्वत: चे असेल तर त्या काही महत्त्व असते.
त्या माणसाला रस्ता माहीत नव्हता तर त्याचा आत्मा कसा ब्रम्हांड सोसायटीला जाऊन आला? असेही म्हणता येईल.

म्हणून कोणी प्रत्यक्ष अनुभवले असल्यास त्याला शंका विचारून उत्तरे मिळवता येईल

"म्हणून कोणी प्रत्यक्ष अनुभवले असल्यास त्याला शंका विचारून उत्तरे मिळवता येईल"
हा विनोद म्हणायचा आणखी काहि? असे म्हणतात कि स्वत: मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाहि . . . . . . तेव्हा या अशा प्रश्णाची उत्तरे फक्त सद्गुरु नाही तर सन्त महात्मे देउ शक्तील असे वाटते.

"मी मुळ लेखातील ज्या प्रश्नावर पोस्ट लिहीली आहे, तो मुळ मुद्दा काही लोकांच्या दृष्टीने पुर्णत: अंधश्रद्धा ठरतो आहे. म्हणून मला तसं वाटलेलं..."

राहुलजी,
सहमत . . .

Astral Projection व OoBE या विषयांवर इंग्रजीत प्रचंड प्रमाणात लिखित व नेट साहित्य उपलब्ध आहे .