वजन कस वाढवु

Submitted by BH on 7 March, 2017 - 00:42

माझीमुलगी दिड वर्षाची आहे तिवा किती वेळात आणि काय खायला द्याव? तीला 8 दात खालच्या वरच्या 2-2 दाढा आल्यात...सारख शी सर्दी चालु असत..वाढलेल वजन लगेचपटकन कमी होत...मी खाण्याच वेळात्रक वगैरे नाही केल कधी..क्रुपया मला मदत करा कि भी आता तरी व्यवस्थित वजन , विकास घडवण्यासाठी काय काय पौष्टीक देऊ

Group content visibility: 
Use group defaults

माझीमुलगी दिड वर्षाची आहे तिवा किती वेळात आणि काय खायला द्याव? >>> मुलीची pediatrician वगैरे नाही आहे का?

सध्या मुलीचं वजन किती आहे? खाण्याची आवड कशी आहे? झोप चांगली आहे का? दुध पिते का? वरच दुध/बाकीचे पदार्थ द्यायला कधी सुरुवात केली. काय खाण्यात आलं कि शी जास्त होते? शी-सर्दी आणि तिचे वजन यावर pediatrician चे मत काय आहे.
http://www.maayboli.com/node/54431 ह्या धाग्यावर तुम्हाला बर्‍याच गोष्टी वाचायला मिळतील. जसा वेळ होईल तसे लिहिनचं.

धन्यवाद मुग्धा. & स्वाती
pediatrician आहेत नापण त्यांनी कधीच अस हे द्या वगैरे सांगीतल नाही... ते म्हणतात तुम्ही जे खाता तेच द्या ...दिवसातुन 4 वाळा द्या...बस....वजन growth chart nusar ठीक आहे अस म्हणतात.border ला आल कि टेन्शन घ्यायच अस म्हणता...आता आम्ही pediatrician बदलणार आहोत.... कारण आम्ही नेमी विचारतो कि वजन वाढत नाही ..व ते बोलता ति खेळते . अॅक्टीव्ह आहे ना तर बस..

तुमची पेडी जे सांगते तेच लिहायला आलेलो. मुल आनंदी आहे, खेळतंय, वया प्रमाणे दात, आवाज काढणे, उभे राहणे, चालायला लागणे या क्रिया करत असेल तर कशाला काळजी? आपण जे खातो ते त्याच्या समोर ठेवा. हाताने खाऊ द्या. झालेला पसारा साफ करायची तयारी ठेवा.
टीव्ही बघत भरवून खात असेल तर अधे मध्ये लावा टीव्ही, खाणं ही होईल, आणि भरपूर खाल्लं की तुमची चिडचिडही होणार नाही. तुम्ही आयाडींअल नाही. तुमचं मुलही असणार नाहीये. हे लक्षात ठेवा.
कधी कधी मुलाला खायला न देता तुम्हीच खायला बसा. मुल रांगत/ धावत तुमच्या अंगावर येईल आणि खायला मागेल. मग जरी तुम्ही अरबट चरबट खात असाल तरी ते त्याला द्या आणि लगोलग सिरीयल किंवा त्याला जे काय देता ते लगेच द्या.
पेडीच्या ह्या सल्ल्या वरून तो अजिबात बदलू नका.

माझ्या मुलिच्या वेळेस एकदा पेडिने मला २ प्र्शन विचारले "तुला ओबेस मुलाचे प्रॉब्लेम माहित आहेत का? " , तुला तुझ मुल हेल्दी असायला हवय कि जाड दिसायला हवय ?
तुझा concern समजु शकते, माझी दोन्ही मुल पिकी इटर आहेत , पिडायला होत वैताग येतोप, ग्रोथ चार्ट वर खुप मस्त ग्राफ नसतो पण इअरली व्हिजिट आणी सर्दी खोकल्याशिवाय पेडिला फोन नसतो म्हणजे डुइन्ग गुड! हे अ‍ॅक्सेप्ट करायला वेळ लागतो.
आणी मुख्य म्हणजे तिच्या वयाच्या दुसर्‍या मुलाशी, मुलिशी कपेअर करु नकोस, इट विल नॉट अ‍ॅड अप एनिथिन्ग !
बाकी अमित +१ , तु खातेस ते सगळ मुलिला देवु शकते. वेळापत्रक केलस तर तुलाच सोयिच पडेल.
वजन वाढवणारे घटक--- बटर्,चिझ, छोले-हमस, अव्हाकाडो, कणीक , किडनी बिन्स्,फावा बिन्स, पनिर्,कॉटेझ चिझ, अन्डि
सर्दी-खोकला-शी मागे एखादी अ‍ॅलर्जी असु शकते!