मी तुला सांगू कसे

Submitted by द्वैत on 6 March, 2017 - 23:27

मी तुला सांगू कसे

मी तुला सांगू कसे मी कोणत्या विश्वात आहे
चाळूनी प्रारब्ध बघतो मी हि त्या शोधात आहे

दीन ह्या प्रश्नांची मिळतील जी हवी ती उत्तरे
पण मर्म भेदायाची ऐपत कोणत्या प्रश्नात आहे

ग्रहदशा नक्षत्र सारे जाणतो जो सर्वज्ञानी
कुंडली वाचून अडतो तो कुठे निष्णात आहे

पोट भरूनी ह्या जगाचे पोट माझे का रिकामी
उकल ह्या कोड्याची हल्ली शोधतो फासात आहे

जन्म हि जणू वेदना अन मृत्यू देखील वेदना
वेदनांचे भास सारे सार ह्या भासात आहे

- द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त !!