रितं रितं

Submitted by आरपार on 6 March, 2017 - 17:44

किती साचलेलं, किती बोचलेलं,
बोलायचं आहे.

काही तुटलेलं, काही फुटलेलं,
फेकायचं आहे.

काही बांधलेलं, काही गुंतलेलं,
सोडवायचं आहे.

काही न पचलेलं, न रुचलेलं,
ओकायचं आहे.

बाकी उरलेलं, काही जपलेलं,
घेऊन चालायचं आहे...
जरा रितं रितं, जरा शांत शांत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

छान !