लहानपण ...

Submitted by मिता on 6 March, 2017 - 08:52

लहापणात प्रत्येकानेच न चुकता अनुभवलेलं असत ते म्हणजे रडणं ... उगाचचच हं ... अगदी आठवून आठवून .. मधेच लिंक जाते , समोर काही तरी दिसत .. बोळक्या तोंडातून दोन इटुकले पिटुकले किडलेले दात बाहेर येतात.. अन क्षणात स्वारीची लिंक जुळते.. मग मात्र जरा चेवच चढतो .. अगदी बेंबीच्या देठापासून.. अन त्यात जर कुणीच लक्ष नाही दिल तर मात्र हैदोस ...
हेच असत न प्रत्येकाचं बालपण .. कुठे भातुकलीचा डाव तर कुठं लिंबू चमचा .. कुठं छिन्नी दांडू तर कुठं काचा कवड्याचा डाव .. गॉड खाऊन माखलेलं तोंड , त्यावरच बसलेली थोडी धूळ (हा हल्ली सिटी मध्ये थोडं वेगळं चित्र आहे ).. आई शाळेला मस्त तयार करून पाठवायची .. परत येताना मात्र हे कारटं आपलंच का इतपत शंका यावी अशी अवस्था ...

पण बालपण होत ते .. यातच खरी मज्जा होती .. माणूस निरागस असण्याचा आयुष्यातील एकमेव टप्पा .. क्षणात हसायचं क्षणात रडायचं , श्रावणातल्या ऊन -सावल्यांचा लपाछपीप्रमाणं ...

पण अनेकांची बालपण खूप कठीण पण असतात .. सगळ्यांच्याच वाट्याला गोड गोड आई बाबा येतात असंच नाही .. मग घरातल्या भांडणाचा विचित्र परिणाम होतो त्या छोटुश्या जीवावर ... काहीवेळा तो अबोल बनतो , तर कुणी आक्रमक होत , कुणी तरी आपल्याच विश्वात पोरांच्या गलक्यापासून दूर राहणं पसंद करत , कुणी तरी मात्र अगदीच वात्रट होऊन डोक्यावर मिऱ्या वाटू लागत .. एखाद्या लहान मुलाला बघून हे मूल फार ऍक्टिव्ह आहे , हे खूपच शांत आहे असं आपण परीक्षण करत राहतो .. पण त्या मागची कारण जाण्याचा प्रयत्न खूपंच कमी जणांकडून केला जातो .. याचा परिणाम म्हणजे एक तर बुजलेला मूल किंवा एक तर बहरलेलं मूल ..

थोडेच जण हा विचार करतात .. हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात .. खूप कमी मुलांचं पालनपोषण सर्व बाजूनी होतं .. , म्हणजेच मूल घडण्यात मुलाचा कमी वाटा अन बाकींच्यांचा हातभार खूप असतो .. आपल्याला हे कळायला हवं इतकंच .. अन मुलांना बहरायला मदत करायला हवी प्रत्येकाने आपापल्या परीने .. कारण हेच संस्कार पुढं त्याच विश्व उभं करतात....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप छान.
>>मूल घडण्यात मुलाचा कमी वाटा अन बाकींच्यांचा हातभार खूप असतो-- हो नक्कीच.