काव्य झुरळ is back

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

होळीचे औचित्य साधून,गुलमोहरावरील एक नव कवी तुषार शिंतोडे ह्यांची एक ज्वलंत कविता (म्हणजे ज्वलंत प्रतिसाद मिळवणारी कविता ) फॉलो करण्याचा एक प्रयत्न. ह्या प्रयत्नांमागे कुणालाही दुखावण्याचा किंवा सुखावण्याचा कुठलाही अंत्यस्थ (का अस्वस्थ) हेतू नाही. कृपया हलक्याने घ्यावे. )
------------------------------------------------------------------------------------
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई
.
राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला
.
ते पोर गुळांबी , जणू रानतल अळंबी
मन मह्ये बोन्साय हे खुळांबी झाले
.
छळ छळ छळीता काव्य धारा गळीता
जणू तमाखू मळीता होय भुई थोडी पळीता
.
थांब ना वासू जरा थांब ना वासू
अरे अश्या कविता पाडणे गून्हा आहे
आज जरी तुला टाळल तरी
भोग हा माझ्या नशीबी पून्हा आहे.
.
श्री तुषार शिंतोडे
(नवकविंच्या भय कवितांमधून एक झलक. मूळ संग्रह गेल्या होळीत भस्मसात Sad )
------------------------------------------------------------------------------------ प्रतीक्रीया :
.
दूतोंडी ११ मार्च २००९ - ०७-२६
वा वा सुरेख कविता. दिवसाची आल्हाददायी सुरूवात
.
सुकांता ११ मार्च २००९ - ०७-३२
खासच. विशेषत: २ आणि ४ फारच आवडल
.
गणपुले ११ मार्च २००९ - ०७-४२
एक प्रामाणिक प्रयत्न Happy
.
तिरसट ११ मार्च २००९ - ०७-४९
एक तर सकाळी सकाळी बस चुकली आणि त्याय आयला हे असल दळभद्री काव्य वाचायला लागतय
.
बाष्कळ ११ मार्च २००९ - ०७-५७
प्रयत्न चांगलाय. पण तरीही मला कवितेच अधिक विवेचन करुन घ्यायला आवडेल
उदा: राज्याभिषेक झाला सिंहासनावर बसलो आम्ही
पर त्यातही दुर्दैव हे आमुचे सिंहासन कमोड निघाला >>>>
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही
तसेच ...
आम्ही टीकांना भीत नाही धमक्यांना घाबरत नाही
करतो कवने आम्ही होई समीकक्षकांचा हिरमोड होई>>>
'समीकक्षकांचा' हा शब्द विशेष आवडला.
.
डांबरट ११ मार्च २००९ - ०८-३३
ह्यात कवी स्वत: सिंहसनावर बसतो इतरांना तुच्छ लेखतो असा अर्थ अभिप्रेत आहे. पण केवळ ओळी मीटर मध्ये बसण्या साठी कवीने स्वत : कमोड वर बसावे हे पटत नाही >>>>>> Rofl
.
पळसुले ११ मार्च २००९ - ०८-४८
एक प्रामाणिक प्रयत्न Happy
.
डांबरट ११ मार्च २००९ - ०८-५७
अहो गणपुले/ पळसुले : नाव बदलत किमान पक्षी प्रतिसाद तरी बदला Rofl
.
हिरवा ११ मार्च २००९ - ०९-३७
मला कविता बिलकूल पचली नाही. प्रयत्न तोकडा पडलाय Sad Light 1
.
मानसकन्या ११ मार्च २००९ - ०९-५१
अय्या. ते दिवा चिन्ह कस द्यायच कळेल का ?
.
मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - १०-१२
अहो मानसकन्या 'दिवा' चिन्ह देण्यासाठी ह्या पानाच्या तळाशी मदत सूची आहे त्याचा लाभ घ्या. किंवा ': दिवा :' अस मोकळी जागा न सोडता लिहा.
मला २ कडव हे बिलकूल आवडल नाहीये. विशेषतः 'कमोड' हा शब्द खटकला. त्या ऐवजी 'परस' हा शब्द वापरला असता तर कविता अधिक मराठी झाली असती. अर्थात हे माझ स्वतःच वैयक्तीक मत झाल.
.
डांबरट ११ मार्च २००९ - ११-०७
हे माझ स्वतःच वैयक्तीक मत झाल >>>> Lol
.
मी मराठी, तू मराठी ? ११ मार्च २००९ - ११-३७
डांबरट : दूसर्‍याचे प्रतिसाद डकवून त्यावर हास्य करण्यापेक्षा स्वतःची बुद्द्धी वापरून काहीतरी लिहा Angry
.
डांबरट ११ मार्च २००९ - ११-४४
अहो 'परस' काय किंवा 'कमोड' काय भावना समजून घ्या ना Rofl
.
मानसकन्या ११ मार्च २००९ - ११-५७
Rofl
Lol
Light 1
अय्या. कधी पासून प्रयत्न करतेय चिन्ह द्यायचा आत्ता कुठेशी जमतय . Proud
.
तुषार शिंतोडे ११ मार्च २००९ - १२-००
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार.
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन
.
दूतोंडी ११ मार्च २००९ - १२-०२
प्रयत्न फसलाय
.
डांबरट ११ मार्च २००९ - १२-२६
माझ्या पुढच्या काव्य झुरळात मी अधिक काटेकोर प्रयत्न करेन >>>>
अरे बापरे
------------------------------------------------------------------------------------चु भू द्या घ्या

विषय: 

लोकशाहीला फसवून
तुम्ही कितीही मारा साहेब
अच्छे दिनाच्या बाता !

कष्टकऱ्यांचं होतंय मात्र,
आनं मलिदा खातेय सत्ता !!

साहेब ,सत्तेच्या मदतीने
तुमचा मुलगा वर्षाला
करोडोचा टर्नओव्हर घेतो !

आमचा भाऊ फी ला पैसं,
बहीण नोकर भरती,आनं
बाप कर्जापायी जगच सोडून जातो !!

सत्तेवर येण्याआधी
कोणी जाहीरनामा,तर
कोणी वचननामा जाहीर करतो !

खुर्ची मिळाली कि कसला
जाहीरनामानं, कसलं वचन?
नेता फक्त पकोडा विकण्याचा
सल्ला देतो !!

आता तर कहर झाला
लोकशाहीच्या मंदिरात
उंदीरांनी धुमाकूळ केला !

या उपद्रवी प्राण्याला
संपविण्यासाठी व्यवस्थेतील
बोक्यांनी करोडोचा घोळ केला !!
रचना-के.के.केंद्रे
मो-9594660136