चौकोन

Submitted by सेन्साय on 3 March, 2017 - 07:17

चार कोनांनी बनतो तो चौकोन पण ते काटकोनात असणे दर्शवते निटनेटकेपणा - परफेक्शन ! साधी सरळ पण आवश्यक रचना जसे मनुष्यास आवश्यक असतात दोन हाथ आणि दोन पाय… ह्यातील एखाद्याचे अस्तित्व नाकारणे म्हणजेच व्यंग अर्थातच जीवन जगताना मूलाधार चक्राच्या चारही पाकळ्यांचे यथायोग्य पालन म्हणजे परीपूर्णता आणि ते सध्या घडत नाहीये म्हणून येतेय मानसिक आणि शारीरिक व्यंग. …. व्यक्तिगत व सामाजिक !!

समाज बनतो चार वर्णांनी ज्यात जातीयतेचा लवलेश नसून समाज हितासाठीच आवश्यक असतात हे चार वर्ण मात्र त्यातील असमतोल बिघडवतो पूर्ण समाज व्यवस्था म्हणून हा चौकोन येथेही परफेक्ट असावाच लागतो. मनुष्याचे मुलभूत गुणधर्म हि चारच - आहार -निद्रा- भय - मैथुन. ह्याचा चौकोन बिघडला कि मनुष्य स्वताचे मानवपण सुद्धा हरवून बसतो व पशु बनतो. म्हणून हा चौकोन येथेही परिपूर्ण असावाच लागतो.

कर्म करत असताना उचित विश्रांतीही आवश्यकच आणि त्यासाठी बनलेले आसन दर्शवते हाच चौकोन. भक्तीमार्गातील साधनेस आवश्यक असते ते आसनही चौकोनीच आणि आपले इष्ट दैवत विराजमान असते तो चौरंगही चौकानीच. मनुष्याला विवाह वेदीवर अडकवणारा हाच आंतरपाट रुपी चौकोन आणि त्याला मरणोत्तर सामावणारी रचनाही हाच चौकोन. देशाचा अभिमान असलेला ध्वज हासुद्धा चौकोन आणि महाभारतात पांडव द्यूत हरले तो हि एक चौकोनच … कुठल्याही गृहाच्या खिडकी दरवाजे म्हणजे हाच चौकोन ! आणि घराला घरपण देणारी भिंत उभारते ती वीट सुद्धा एक चौकोन ! विद्यार्थी दशेतील वहीचे पान म्हणजेही चौकोन तर गृहस्थाश्रमिसाठी आवश्यक चलनी कागद सुद्धा चौकोनच … सर्व जीवन चाकोरी बद्ध जगण्यासाठी चौकोन आवश्यक आहे आणि नेहमीच असणार.

- अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिगुणात्मक त्रिमूर्ति दत्त हां जाणा.... त्रिकोणावर सुद्धा बरेचसे लिहून तयार आहे आणि शून्याणां शून्य साक्षिणी .... वर्तुळावर सुद्धा लिहिलय फक्त पोस्टायला चालढकल होतेय Lol
कावेरी आणि च्रप्स प्रतिसादाबद्दल दोघांनाही धन्यवाद