पुढेच जाणे शक्य असावे फक्त नदीला

Submitted by सुप्रिया जाधव. on 2 March, 2017 - 21:21

डोंगराकडे पाठ फिरवते उगमघडीला
पुढेच जाणे शक्य असावे फक्त नदीला

निसर्गासही ऋतुचक्राची वारी घडते
चुकला आहे प्रवास कोणाच्या राशीला ?

वीज मुक्याने अंधाराला कापत जाते
गडगडून ढग जाहिर करतो मर्दुमकीला

आपुलकीचा बांध घालुया मनामनांवर
विचार राहू दे सामायिक वहिवाटीला

लाटेवरती स्वार होउनी वारा येतो
आतुरलेला नवरदेव जणु लग्नघडीला !

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>वीज मुक्याने अंधाराला कापत जाते
गडगडून ढग जाहिर करतो मर्दुमकीला>>>मस्तंच!

अवांतर—माझा एक शेर आठवला...

‘उगाच नव्हती वीज चमकली...
ढगांत चकमक झाली होती!'