सावळी पाऊले

Submitted by mrsbarve on 27 February, 2017 - 16:58

सावळी पाऊले
ठायी टेकिलें माथे ,
अव्याहत नाद
अंतरात !

क्षणोक्षणी डोळे,
पाहती रुपडे.
निर्गुण तरी
सुंदर अमाप !

भेटली माऊली
झालो निशब्द ,
पिसावाणी जीव
झालासे हलका!

तिथे उभा विटेवर,
बोलावितो आता मज,
पुरे झाले व्याप ताप
संसाराचे !

हसला हसला मजपाशी विठ्ठल ,
आता माझे जाणे, केवळ सार्थक!

उरले का मागे काही ?
शेवटचे श्वास दोन!
काय करू आता त्यांचे?
नाम गहिरे त्यावरी,
नित्य कोरलेले!

Group content visibility: 
Use group defaults