आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता एक गोष्ट जाणवली. अँडरसन बॅटींग ला आला तेव्हा १८.२ ओव्हर्स मधे १६६/४ स्कोअर होता. शेवटी दिल्ली चा २०५/५ स्कोअर झाला आणी अँडरसन ४ बॉल्स मधे २ रन्स काढून नॉट-आऊट राहीला. सॅमसन आणी मॉरीस ने केव्हढं डॉमिनेट केलं!!

अँडरसन बॅटींग ला आला तेव्हा १८.२ ओव्हर्स मधे १६६/४ स्कोअर होता. >>> मॉरिस बॅटींग ला आला तेव्हा १८.२ ओव्हर्स मधे १६६/४ स्कोअर होता. अँडरसन आला पंत आउट झाल्यावर १५.२ ओव्हर्स १२४/३ असताना. (तुझा मुद्दा अजूनच अंडरलाईन होतोय, म्हणून म्हणतो.)

"थोडक्यात काय तर अँडरसन अजून बॅटींग झोन मधे आलेला नाही" - Happy

आज त्याने एक ओव्हर सुद्धा टाकली. जर तो बॅटींग झोन मधे आला, बॉलिंग सुद्धा करायला लागला तर दिल्ली ला एक जबरदस्त ऑप्शन मिळेल.

अँडरसन हा किवीजचा इरफान पठाण आहे Happy

उद्याची मॅच बघायला मजा येईल. मक्लेशान च्या ऐवजी जॉह्न्सन नि पोलार्ड च्या जागी (हवे तर त्याला फिल्डींगला आणा Happy ) गुणरत्ने असे बघायला मजा येईल. राणाला तीन नंबरवर उद्या पण पाठवला पाहिजे.

"पोलार्ड च्या जागी गुणरत्ने" - लेंडल सिमन्स पण आहे ना मुंबईकडे? तो खूप जास्त रिलायबल वाटतो मला तरी. अर्थात तो मिडल ऑर्डर बॅट्समन नाहीये पोलार्ड सारखा, पण त्याने जर फारसा फरक पडणार नसेल (बटलर खाली खेळू शकतो. ईंग्लंड कडून तो खालीच खेळतो), तर सिमन्स सुद्धा पोलार्ड ला चांगला पर्याय होऊ शकतो.

उद्याची मॅच खूप चुरशीची होण्याची शक्यता आहे.

मुंबई - हैद्राबाद मॅच सुरू झाली आणी ईथे एकही पोस्ट नाहीये? कुठे गेले सगळे क्रिकेट / आयपीएल प्रेमी?

हैद्राबादकडून अपेक्षेप्रमाणे मुस्तिफिझूर खेळतोय. मुंबईने काही बदल केले नाहीयेत.

IPL अंपायरींग really sucks. If Sanjay Manjrekar thinks batsman is out then it has to be out.

अजून तरी मुंबईची फिल्डींग टॉप क्लास आहे.

"If Sanjay Manjrekar thinks batsman is out then it has to be out." - काय झालं? मी बघत नाहीये. फॉलो करतोय.

मुंबई ने चांगलं रोखून धरलय हैद्राबाद ला.

कुमारचा राणाला पडलेला बॉल कसला भारी आणि टेक्स्टबुक आहे. फक्त बेल्स उडाल्या. कुमार कधी कधी अशक्य बॉल टाकतो.

केदार +१.

रशिद खानने रोहितची काढलेली विकेटही अशक्य सुंदर होती. व्हॉट अ पीच ऑफ अ डिलीव्हरी.

बघितली मॅच..... नितेश राणा आणि कृणाल पंड्याने मजा आणली.... कसले एफर्टलेस शॉट्स होते दोघांचे!
मध्ये उगाच पोलार्डला घुसडलेले
फिझ काही चालला नाही..... निदान पहीली मॅच तरी

भुवी ची आजची बॉलिंग मस्तच होती. रशिद खान पेक्षा भारी वाटली.

नितेश राणा चे composure मस्त आहे, क्लास पे करतो इनिंग. रायुडुला सॉलिड ट्फ होणार आहे. पोलार्ड तापदायक आहे.

रशिद खानला भारतीय नागरिकत्व द्या. Happy अफगाण क्रिकेट खेळून तो मोठा होऊ शकणार नाही.
>>>>>>>

अगदी हेच मी आमच्या व्होटसपग्रूपवर बोल्लो. भारतात घ्या किंवा एखाद्या प्रमुख देशात घ्या. त्याची गूगली पिक करेपर्यंतची पहिली काही वर्षे तो गाजवू शकतो. या आयपीएलमध्ये पर्पल क्यापचा प्रमुख दावेदार असणार तो. तुर्तास विकेट द्या किंवा ईज्जत द्या फॉर्म् चालूय त्याचा..

>>स्वरूप चे काल चे सगळे अंदाज बरोबर आले.
Happy

>>आता उद्या मुंबई वि. हैद्राबाद! हैद्राबाद फॉर्म च्या बाबतीत फेव्हरिट्स असले तरी उद्या मुंबई मेजर अपसेट करेल (हैद्राबाद ला) असं वाटतय.
आणि हा तुझा अंदाज पण बरोबर आला!

"फे फे हायलाईट्स बघ." - हो नन, नक्कीच बघणार आहे.

केदार, स्लिंग कशावरून बघतोस? वर्णनावरून Chromecast वाटतय.

भुवनेश कुमार हा एक जबरदस्त बॉलर आहे. शांतपणे येऊन चांगली बॉलिंग टाकून जातो.

"त्याची गूगली पिक करेपर्यंतची पहिली काही वर्षे तो गाजवू शकतो" - गूगली चा अतिरेक केला तर पियुष चावला होऊ शकतो त्याचा.

"हा तुझा अंदाज पण बरोबर आला!" - हो ना. Happy

उद्या कोलकता वि. पंजाब. दोन्ही टीम्स चांगल्या फॉर्म मधे आहेत. पण कोलकता ला होम अ‍ॅडव्हांटेज मिळेल का?

केकेआर ने टॉस जिंकून बॉलिंग घेतलीये. उमेश यादव आणी न्यूझिलंड चा कॉलिन ग्रँडहोम खेळतोय. जर खरच बॉल स्विंग झाला, तर कोलकता चा बॉलिंग अ‍ॅटॅक जबरदस्त वाटतोय. कोलकता कडे बरेच खास आयपीएल स्टार्स आहेत - युसूफ पठाण, पियुष चावला, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणी कदाचित गौतम गंभीर सुद्धा.

पंजाब ने ईशांत शर्मा ला घेतलय. पिटेल असा माझा अंदाज आहे. कधीतरी पंजाबकडून अरमान जाफर आणी करिअप्पा ला खेळताना बघायला मिळालं तर आवडेल. आयपीएल हा नवोदितांसाठी प्लॅटफॉर्म आहे हे तत्व, द्रविड वगळता कुणीच फारसं पाळताना दिसलेलं नाहीये.

"स्लिंग लॅपटॉप किंवा फोन वरून बघतोय." - स्लिंग आणी Chromecast चा प्रॉब्लेम माहीत आहे, पण फोन / लॅपटॉप वर लोड व्हायला प्रॉब्लेम व्हायला नकोय खरं. स्ट्रेंज!

गेल्या दोन विकेट्स पंजाबच्या!

करीअप्पाला खेळवले KKR ने दोन वर्षापूर्वी.... फार काही ग्रेट नाही वाटला.... कर्नाटका प्रिमियर लीग गाजवून आला होता तो त्यावर्षी त्यामुळे खुप उत्सुकता होती त्याच्याविषयी!

आता आज ग्रॅंडहोमचा खेळ बघायची उत्सुकता आहे.... फार घोषा लावला होता त्याच्या नावाचा cricinfo वर लोकांनी (जेंव्हा त्याला auction मध्ये घेतले नव्हते कुणीच)

करीअप्पाला खेळवले KKR ने दोन वर्षापूर्वी.... फार काही ग्रेट नाही वाटला.... कर्नाटका प्रिमियर लीग गाजवून आला होता तो त्यावर्षी त्यामुळे खुप उत्सुकता होती त्याच्याविषयी! > +१ तू लिहिलेले आठवतेय. कुलदीपबद्दल पण लिहिलेलेस बहुतेक.

खास आयपीएल स्टार्स आहेत - युसूफ पठाण, पियुष चावला, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा आणी कदाचित गौतम गंभीर सुद्धा. >> गंभीर ला कदचित का रे ? ह्या लिस्ट पेक्षा तो जस्त कन्सिस्टंट आहे कोलकत्त्यासाठी.

आज मिलर खेळला तर मजा येईल.

"गंभीर ला कदचित का रे? ह्या लिस्ट पेक्षा तो जस्त कन्सिस्टंट आहे कोलकत्त्यासाठी" - म्हणूनच 'कदाचित' म्हटलय. पण ह्या लिस्ट सारखाच गंभीर हळू हळू आयपीएल पुरता मर्यादित रहातो की काय असं वाटून गेलं. असं न व्हावं हीच ईच्छा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नाही कदाचित, पण डोमेस्टीक मधे तरी त्याने अजून काही वर्ष गाजवावीत. दिल्ली च्या यंगस्टर्स ना खूप फायदा मिळू शकेल.

Pages