आयपीएल-१०

Submitted by फेरफटका on 20 February, 2017 - 12:23

आयपीएल - १० चं रणशिंग फुंकलं गेलय. कालच्या लिलावात बेन स्टोक्स ने विक्रमी १४.५ कोटी चा आणी टायमल मिल्स ने १२ कोटी चा बार उडवलाय, तर बहूचर्चित जेसन रॉय १ कोटी (फक्त?) च्या बार्गेन डील मधे गुजराथ लायन्स कडे गेलाय. ईरफान पठाण, ईशांत शर्मा वगैरे भारतीय खेळाडू आणी अ‍ॅलेक्स हेल्स, जॉनी बेअरस्ट्रॉ, ईम्रान ताहीर शॉन अ‍ॅबॉट, रॉस टेलर सारखे टी-२० मधले तगडे परदेशी खेळाडू ह्या वेळी 'अनसोल्ड' आहेत. अन्कॅप्ड कॅटेगरीमधे भारताचे नटराजन, थंपी, गौथम आणी सिराज ह्यांना लॉटरी लागलीये तर अंकित बावणे चा सुद्धा यंदा लिलावात नंबर लागलाय.

पुन्हा एकदा ह्या रणधुमाळी मधे मायबोलीकरांच्या चर्चा, विचार, व्यंगचित्रं, मत-मतांतरं ह्या सगळ्यांसाठी हा धागा सुरू करतोय. होऊ दे चर्चा!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदीच चुकीची संघनिवड आणि टॅक्टीक्टस... रॉय, स्मिथ, फिंच, मॅकुलम, चारही ओवरसीज प्लेअर.. बॉलर्स वा ऑलराऊंडर्समध्ये कोणी नव्हतेच की एंज्यर्ड होते. टीम बघूनच मी म्हणालेलो, यांनी २०० मारले तरी कमी पडतील. बेंगलोरचेही मागे कधीतरी असे व्हायचे. शेवटी सर्वात महत्वाचे संतुलन. अन्यथा चेस करणे हाच बेस्ट पर्याय. जे आज टॉस हरल्याने झाले नाही आणि कलकत्याने सामना कल्पनेच्याही आरपार सहजेतेन खिशात टाकला. त्यातही गंभीर एका साईडने फिफ्टी मारणार ही भविष्यवाणीही माझी आज खरी ठरली. जरा जास्तच मारले त्यानेही.

गंभीर बॉलिंग चेंजेस मस्त करतो राव. >>> +७८६ .. नेहमीच. तरी त्याचा हुकुमचा एक्क्क नारायण गंडलाय. नाहीतर त्याला तर तो बेस्ट वापरायचा.

"क्रीस काय खाऊन उतरला? देव जाणे" - त्यापेक्षा सुद्धा, रैना ने काय खाऊन टीम सिलेक्ट केली होती? सगळे बॅट्समेन घेताना बॉलर्स घ्यायला विसरून गेला की काय? सगळे टांग्याचे घोडे किंवा तट्टु?

दिल्ली - हिल्फेनहौस,
पुणे - वॉशिंग्टन सुंदर
बंगळुरू - विष्णु विनोद

नवीन आयपीएल चेहेरे.

गेल्या वर्षीही बर्‍यापैकी हाच बॉलिंग अ‍ॅटॅक होता गुजराथचा (+ जाडेजा ) बहुतेक. धवल नि प्रवीन गेल्या वर्षी मस्त बॉलिंग करून गेले होते.

जडेजा, ब्राव्हो, फॉकनर ही होते रे. प्रवीण आणी धवल ला बाकी वर्षभर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव काहीच नसतो. त्यामुळे बराच फरक पडतो.

दोनतीन चांगले असले तर त्यांचा योग्य वापर करून बाकीचे दोन तीन अध्येमध्ये वापरता येतात. पण सगळीकडूनच उजेड असेल तर गेमप्लान बनवणे कठीण जाते. रैना तर पुरता गंडलेला. प्रवीण कुमारची पहिली ओवर पाहता त्यालाच पॉवरप्लेच्या तीन द्यायला हव्या होत्या.

जडेजा, ब्राव्हो, फॉकनर ही होते रे. प्रवीण आणी धवल ला बाकी वर्षभर आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव काहीच नसतो. त्यामुळे बराच फरक पडतो. >> जडेजा नि ब्राव्हो दोघेही injured असल्यामूळे बाहेर आहेत. गेल्या IPL मधे जर मला नीट आठवत असेल तर धवल कुलकर्णी ने पॉवर प्ले मधे सगळ्यात जास्त विकेट्स घेतले होते नि प्रवीण कुमारचा economy rate सगळ्यात चांगला होता. ब्राव्हो नि फॉकनरला गेल्या वर्षीची IPL अजिबात चांगली गेलेली नव्हती. शिविल कौशिक County Stint वर होता म्हणून घेतला असावा. स्टेन ला release केले. बेसिकली त्यांनी नत्थु सिंग, जाकाती नि गोनी मधे यंदा invest केलेय. त्यांचा approach बॅटींग चा वापर असा वाटतोय.

रैना पेक्षा मॅक्मल्लम कॅप्टन हवा लायन्स चा असे माझे मत आहे.

ड्युमिनीची रिप्लेसमेंट हिल्फेनहौस आणि मुरली विजयची रिप्लेसमेंट इशांत शर्मा!
ही काय स्ट्रॅटेजी आहे म्हणे!

जिंकायला १६४..... Very good come back by Pune
स्टोक्स त्याचा प्राइस टॅग जस्टीफाय करतोय!
तिवारी पण अपेक्षेपेक्षा चांगला खेळला

"ड्युमिनीची रिप्लेसमेंट हिल्फेनहौस आणि मुरली विजयची रिप्लेसमेंट इशांत शर्मा! ही काय स्ट्रॅटेजी आहे म्हणे!" - कायद्यात जसा आधी दिलेला एखादा निकाल 'प्रेसिडेन्स' सेट करतो, तसा ह्या बाबतीत प्रेसिडेन्स सेट झालाय. ह्या प्रकाराला ऑफिशियली 'नोएल डेव्हिड रिप्लेसमेंट स्ट्रॅटेजी' नाव देता येईल. Happy

मला वाटतं हे थोडसं हैद्राबाद सारखं आहे. स्ट्राँग बॉलिंग थियरी. काल गुजराथ जिथे कमी पडले, किंवा बंगळुरू नेहेमीच जिथे कमी पडतं - टी-२० बॉलर्स ने जिंकून देण्याचा खेळ होतोय. २-३ बॅट्समेन क्लिक झाले तरी बर्यापैकी काँपिटीटीव्ह स्कोअर होऊ शकतो. जर बॉलिंग स्ट्राँग असेल, तर तो डिफेंड करण्याचे चान्सेस वाढतात. अन्यथा कितीही मोठा स्कोअर चेस होऊ शकतो (छोट्या बाऊंड्रीज, मोठ्या बॅट्स ई.) जेव्हा रबाडा आणी मॉरीस अनुपलब्ध असतील, तेव्हा कमिन्स आणी हिल्फेनहौस खेळू शकतील. झहीर आणी शामी पूर्ण सीझन टिकण्याचे (फीटनेस) चान्सेस पण कितपत आहेत ह्याबद्दल साशंकता आहेच.

पंजाब जिंकले. प्रीती खुश!! वीरू खुश!

मला त्या राहूल चहर ची बॉलिंग आवडली. थोडा वेवर्ड आहे, पण डिसगाईज मस्त आहे.

वॉट्सन ने ट्रविस हेड ला ड्रॉप केले .. कैच्याकै. एक तर त्यांच्या कडे बॅट्समन कमी त्यात त्याने मागील सामन्यात चांगला खेळणारा हेड ला काढले.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास

राहुल, कोहली, एबीडीच्या अनुपस्थितीत केदार जाधवला की बॅटसमन बनायची संधी होतीच. आणि एकदा भारतीय संघात चमकल्यावर त्याचा आत्मविश्वासही वाढला आहे. युवराजही स्वतःबाबत नेमके हेच म्हणाला त्या दिवशी..

दिल्ली रॉयल मेस करतय एका छोट्या टारगेट चं. संजु सॅमसन हा नेक्स्ट रोहीत शर्मा बनतोय. 'टॅलेंट' 'भरपूर संधी' वगैरे.

संजु सॅमसन बालक होता तेव्हा त्याचे कौतुक होते. मोठा झाल्यावर तो एका लेव्हलच्या पुढे गेलाच नाही. सध्या तर मी त्याला फलंदाजांच्या गिणतीतच पकडत नाही. शर्माच्या पंकीत बसवू नका त्याला. शर्मामध्ये टॅलेंटही आहे आणि कुत्र्याचे शेपूट वाकडेच टाईप दोषही आहेत. पण जी स्ट्रेंथ आहे त्याचा फॉर्मनुसार वापर करत त्याने काही उच्चांकही गाठले आहेत. एकदिवसीयमध्ये दोन द्विशतक, सर्वोच्च धावसंख्या आणि ईतरही काही मोठ्या खेळ्या वगैरेंच्या जीवावर रेकॉर्डबूकमध्ये नाव नेणार्‍याने आपली कारकिर्द फुकट घालवली असे नाही म्हणू शकत. तसेच कसोटीच्या स्पर्धेतून तो बाहेरच फेकला गेला आहे असेही नाही म्हणू शकत. पण तिथे त्याच्याकडून फारश्या अपेक्षाही नाहीत.

नोहीट ने (फायनली) परफॉर्म केलं हे कौतुक आहे. पण ईतक्या संधी मिळाल्यावर कपिल शर्माने सुद्धा थोडं परफॉर्म केलं असतं. असो, तो ह्या धाग्याचा विषय नाहीये.

दिल्ली त्यांच्या लौकिकाला जागली.... They need a pinch at start and known to learn their lessons in hard way!
कालची मॅच फारच आवाक्यतली होती.... चिन्नास्वामीवर एव्हढे कमी टारगेट क्वचित मिळते.... नुसते टिकुन राहीले असते तरी रन्स झाल्या असत्या
काल खर तर दिल्लीची टीम एकदम सेन्सिबल होती.... बॅलन्सपण परफेक्ट होता.... एक मिश्रा सोडला तर बाकी बॉलर्सनी एकदम नीट बॉलींग केली होती..... Mishra really had a bad day!
नदीमने पण अफलातून स्पेल टाकला
झहीरही छान लयीत आला होता
रिषभ पंतचे करावे तितके कौतुक कमीच आहे... नुसता दांडपट्टा फिरवत होता पट्ठ्या.... कुठलेही टारगेट आरामात अचीव्ह करेल अश्या फॉर्ममध्ये होता तो!
आउट झाल्यानंतर फारच भावूक झाला होता तो
एक दोघांनी जरी साथ दिली असती तरी मॅच काढली असती त्याने!

असो!.... पुढील मॅचसाठी डीडीला शुभेच्छा

अरे हो!.... मॉरीसबद्दल लिहायचेच राहीले.... डेथ ओव्हर्समध्ये डोळे झाकून भरवसा ठेवावा अस बॉलर आहे तो!
काय अफलातून टाकल्या काल शेवटच्या दोन ओव्हर्स त्याने!

काल ची संपुर्ण मॅच "अमित मिश्रा" याने घालवली ते ही दोन्ही इनिंग्स मधे. असे टी-२० मधे दुर्मिळ होते. Wink
पहिल्या इनिंग मधे अत्यंत सुमार बॉलिंग करून धावा लुटवल्या. तर दुसर्‍या इनिंग मधे ऐन मोक्याच्या क्षणी बॉल्स वाया घालवून ऋषभ पंत ला स्ट्राईक दिला नाही परिणामी ऋषभ मोठ्या फटक्याच्या नादात आऊट झाला. जेव्हा संघासाठी विकेट टिकवणे महत्त्वाचे नसून स्कोर करणे महत्त्वाचे होते अशा वेळी अमित ने तब्बल १४ चेंडू खेळले आणि अवघ्या ८ धावा काढल्या. (टी-२० वर्ल्ड कप मधील युवराजची संथ फलंदाजी आठवली)

कालचा दिवस अमित मिश्राचा अत्यंत वाईट दिवस होता

"काल ची संपुर्ण मॅच "अमित मिश्रा" याने घालवली ते ही दोन्ही इनिंग्स मधे. असे टी-२० मधे दुर्मिळ होते." - सहमत. बॅटींग मधे त्याने क्रिकेटींग जजमेंट च्या अभावाचा नजराणा पेश केला. असो.

गुजराथ ची बॉलिंग आजही कमकुवत वाटतेय. ४ विकेट्स ही लवकर गेल्या आहेत. हैद्राबाद फेवरेट वाटतायेत.

मुंबई-कोलकता चुरशीची होईल ही अपेक्षा आहे.

हैद्राबादला स्वतःचा नेटरनरेट वाढवण्याची सुवर्णसंधी आहे.
पहिल्या नंबरवर कोलकताचा नेटरनरेट प्रचंड आहे. १८२ धावा त्यांनी अवघ्या १४ ओवर मधे पुर्ण केलेल्या ते ही विकेट न गमवता ३०-३२ चेंडू राखल्याने रनरेट वाढला

आजही गुजरात वाल्यांचा स्कोर १३० पर्यंत जाईल. १५ ओव्हरच्या आत हैद्राबादने पार केला तर चांगले आहे.

हर्षद शामकांत बर्वे
7 April at 14:31 ·
-शेन वॉटसन बापाचे रन असल्यासारखे उधळतो
-सचिन बेबीला बेबी-सीटरची गरज आहे
-वॉर्नरच्या बॅटमध्ये काहीतरी चिप असावी
-युवीला बंगलोरला झोडायला नेहमीच आवडते
-भुवी महाचिकट आहे, रन द्यायला पाहिजे अजून
-विराट ये बाबा लवकर
-एबिडी बास झाल्या बिड्या फुंकणे, लवकर या
-तरी तो मेला मुस्तफिझुर नव्हता
-बटलर नाव आहे तुझे , बुचर नाही
-पोलार्डला बॅटींग द्यायची नसते तर घेतात कशाला
-पांड्या, वेडा झाला का बे
-स्मिथुडी, मस्त मस्त मस्त
-धोनी हरवणार पुण्याला
-------
पाव डझन क्रिकेट एक्सपर्ट्स बायकांसोबत बरोबर मॅच बघण्यापेक्षा क्रिकेट बघणार नाही अशी भीष्म-प्रतिज्ञा घ्यावी म्हणतोय

Pages