माणसे उलगडायची पूर्वी ( तरही )

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 February, 2017 - 14:33

तरही ...ओळीसाठी बेफिजींचे आभार !

उघड-उघडच नडायची पूर्वी
( माणसे उलगडायची पूर्वी )

मी तुझी फक्त आणि तू माझा
गोड स्वप्ने पडायची पूर्वी

आजही चमकते मुक्याने ती
वीज जी कडकडायची पूर्वी

पाट - पाणी महिरप उदबत्ती
काय पंगत झडायची पूर्वी !

हार मानून गोठली इच्छा
केवढी धडपडायची पूर्वी

येत नव्हतास वाटणीला पण ;
आठवण कडमडायची पूर्वी

राम-सीता असोत दंतकथा
जाम श्रध्दा जडायची पूर्वी !

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान!

खूपच सुरेख !

स्पेशली ........
मी तुझी फक्त आणि तू माझा
गोड स्वप्ने पडायची पूर्वी