आठवण

Submitted by गवंडी ललिता on 15 February, 2017 - 01:58

आठवण

विसराव म्हटलं तर विसरताही येत नाही
तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही

काठोकाठ भरला मनाचा गडवा
हिंदोळयांपासून वाचविताही येत नाही

तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही

शिंपल्यात गुंफले आठवणींचे मोती
चातकाची तृष्णा भागविता येत नाही

तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही

आला गेला श्रावण बहरले ऋतु
मखमली स्पर्श अनुभवता येत नाही

तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही

सुख:दुखांच्या भोवऱ्यात गुंफले जीवन
किनाऱ्यावर कधी विसावता येत नाही

तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही

हसले ओठ उमलती फुले
काट्यांची वेदना लपविता येत नाही

तुझ्या आठवणींना सांभाळताही येत नाही
विसरावं म्हटलं तर विसरताही येत नाही..

-ललिता गवंडी, अकोले

Group content visibility: 
Use group defaults

किती छान लिहिलय....अग्दी साध्या सरळ शब्दात....
मस्त,हलक- फुलक... Happy

ताई,ते तेवढं 'सांभाळतही 'च्या जागी सांभाळताही असं पाहिजे का??