फोटो

Submitted by द्वैत on 14 February, 2017 - 06:22

valentine day special

फोटो

तस कविता चारोळ्या लिहीन मला फार काही जमत नाही
तरी तुझा हसरा चेहरा पाहून प्रयत्न करतो काही लिहिण्याचा
अर्थात जाणीव असते मला एवढी प्रतिभा ह्या पामरापाशी नाही
तरीही प्रयत्न करत राहतो
तुझा तो फोटो पुन्हा पुन्हा पहातो
एखाद रूपक एखादी उपमा
नजरेसमोर सतत तुझीच प्रतिमा
शब्दांची जुळवाजुळव तरीसुद्धा जमत नाही
पण फोटो पाहिल्याशिवाय तुझा मला मुळीच करमत नाही
ना ह्या शब्दांना गती ना काव्याला दिशा
तरीही कवी बनण्याची हि एक वेगळीच नशा
सुचते कधी काही तुझ्या डोळ्यांकडे पाहून
मग हरवून जातो त्यात जाते लिहायचे राहून
माझी ही धडपड बघून फोटो मधून हसतेस
अन सोडून दिला हा छंद तर उगाच खोट रुसतेस
कविता लिहिण्यासाठी तुला पाहावे की,
तुला पाहण्यासाठी म्हणून कविता लिहावी
ह्याचा खुलासा करण्याची खरंच तुला गरज आहे
अन नसेल कळला अर्थ ह्याचा
तर माझे कवी बणने व्यर्थ आहे
माझे कवी बणने व्यर्थ आहे....

कवी - द्वैत

Group content visibility: 
Public - accessible to all site users